✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गं...!

प — प्राची अश्विनी, Mon, 05/20/2024 - 10:45
कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'! मागचे "सा रे" विसरायला लावणारा, पुढलं "मा प" ओलांडू न देणारा, "धा नी" रंगात मोहरवणारा, पायाला हळूच मिठी मारणारा ठेहरावसा उंबराच जणू.. थोडासा सरळ, थोडासा वळणदार.. पण आतल्या गाठीचा मात्र बिलकुलच नाही. कान्याला टेकून आपला ऐटीत उभा. सुबक, कमनीय, गोजिरा अगदी! आणि जेव्हा तो तुझ्या तोंडून ऐकते ना, त्याचा लगाव, लहेजा आणि लगन...किती रे कातील! तुझ्या ग च्या लडीवाळ चक्रव्यूहात मी कधी कशी ओढली जाते कळतच नाही.. गोल गोल गोल गोल, तिथंच फिरत रहाते मी. आजुबाजुचे शब्द विरून जातात. ऐकू येतात ती फक्त आणि फक्त तुझ्या गंधाराची निर्गुण आवर्तनं.. धुपाचा कर्पूरचंदनी गंध ल्यालेली.. एकांत एक गुंफलेली, कोमल नी शुद्ध, माझ्या गंभीर "रे" ला वेढून टाकणारी... .. अशावेळी माझा अभिमन्यू नाही झाला तर नवल

प्रतिक्रिया द्या
2427 वाचन

💬 प्रतिसाद (9)

एकदम भारी!

Bhakti
Mon, 05/20/2024 - 11:30 नवीन
एकदम भारी! प्राची ताई पहिल्या ओळीत वाचून माझ्या डोक्यातही "रे" वर पण कविता होईल असं आलं.शेवटच्या काही ओळी "रे" आलाच :) माफी असावी पण हा घ्या माझा "रे"! अ"रे" माझ्या उंचावलेल्या भुवयांच्या कमानी ऊतू गेलेले आश्चर्यमिश्रित हसू... तुला आवडत म्हणूनच अ"ग" असं"ग" करीत उगाच गोष्टी पेरत बसतो.. "रे"चा धागा घरंगळत पसरल्यावर "गं" चा वेटोळा माझ्याभोवती घालत तुझा ऐक "ना" माझ्या रूसलेल्या जा"ना" ता"ना"शाहीत मी "ना" "जा" करत तुझा श्वासं तगमगतो " ना" "रे" आता कोणतं महाभारत होणार विचारात माझा अर्जून होतो रे...
  • Log in or register to post comments

आहा! अर्जुन... मस्त

प्राची अश्विनी
Mon, 05/20/2024 - 19:38 नवीन
आहा! अर्जुन... मस्त गंमत म्हणजे मी पण "रे" लिहिलीय. करते पोस्ट इथे.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

कवीता वाचून डोक्यात पहिला विचार आला तो मुळी....

कर्नलतपस्वी
Mon, 05/20/2024 - 12:23 नवीन
प्रभाकर कारेकर, रामदास कामत द्वयींनी गायलेल्या खालील गाण्याचा, तुझी मूर्त सुंदर देवा,सजवितो सुरात https://youtu.be/idAshwnegjw?si=gDuanGPERqObDTxQ कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'! मागचे "सा रे" विसरायला लावणारा, पुढलं "मा प" ओलांडू न देणारा, "धा नी" रंगात मोहरवणारा, पायात पडलेली मोह मायेची मिठी हळूच सोडवून या दिठी चा सहर्ष, सहज स्वीकार करणारा जणू लोक परलोका मधला उंबरठाच.. कवीता आवडली. प्रथम दर्शनी वाटणारी प्रेम कवीता कुठल्या कुठे घेऊन जाते. माझा विठुराया आहेच मुळी चक्रव्यूहा सारखा. भक्त एकदा आत मधे घुसला की त्याचा अभिमन्यू होणार हे नक्कीच.
  • Log in or register to post comments

वाह! हे गाणं माहीत नव्हतं.

प्राची अश्विनी
Mon, 05/20/2024 - 19:40 नवीन
वाह! हे गाणं माहीत नव्हतं. शब्द देखील किती अर्थवाही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

मस्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/20/2024 - 14:35 नवीन
आवडली रचना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर!

प्राची अश्विनी
Mon, 05/20/2024 - 19:40 नवीन
धन्यवाद सर!
  • Log in or register to post comments

सुं - द - र ....... !

चौथा कोनाडा
Mon, 05/20/2024 - 22:45 नवीन
सुं - द - र ....... !
  • Log in or register to post comments

वाव! सुंदर काव्य. आणि वर

भागो
Mon, 05/20/2024 - 23:56 नवीन
वाव! सुंदर काव्य. आणि वर भक्ती ताईंची "अरे" रावी.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल सर्व रसिकांना

प्राची अश्विनी
Tue, 05/21/2024 - 09:33 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्व रसिकांना मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा