महात्मा गांधीं म्हणालेत, "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल”
मी काल प्रो. देसायांना म्हणालो,
“रागाची भावना, रागाची जोमाने येणारी इर्षा,जंगली राग जो तुमच्या शरीरात फोफावतो तुमच्या मुठी घट्ट करून, तुमचं मन आसूरी करतं, तुमच्यातली श्वापदांची उत्कट प्रवृत्ती बाहेर आणतो. दुसऱ्यांवर दुःख ओढवण्याची अंगातली तळमळ,असं केल्यावर वाटणारी समाधानी आणि तृप्तीची तळमळ. या सर्व सूडाच्या भावना आहेत.
या सूडाच्या भावना,वैयक्तिक वेदना आणि दु:ख यांचा एक समूह आहे. या भावना, मनातली साठवण कडू, भ्रष्ट भावनांमध्ये एकत्रितपणे घर करून बसतात.”
भाऊसाहेब तुमचं काय मत आहे?”
प्रो देसाई म्हणाले,
“बदला हा प्रकार आपल्या अनुकूल नसलेल्या परिस्थितीला सहज प्रतिसाद देण्याची वृत्ती आहे.
घाव झटपट परत करण्याची इच्छा आहे आणि आपल्या स्वतःच्या वेदना दुस-यावर त्वरेने लादण्याची खुनशी वृत्ती आहे.
मला वाटतं की बदला घ्यायची इच्छा ही अशी गोष्ट आहे ज्याशी प्रत्येकजण संघर्ष करत असतो.पण मला वाटतं की समाज ह्या सूडापासून मुक्त असला पाहिजे.
बदला स्वीकारू नये. त्यापेक्षा मनात शांतता नांदायला हवी अशी भावना मनात प्रभाव करून, राहिली पाहिजे.
आपल्या सर्वांमध्ये एक प्रकारचा दयाळूपणा असतो.
मला वाटतं की, आपण समाजात असलेल्या अपूर्ण जीवनापेक्षा अधिक परिपूर्ण जग, अधिक परिपूर्ण समाज बनवण्यासाठी पराकाष्ठा केली पाहिजे.
माझ्या संपूर्ण आयुष्यात मी अपराधी आणि सूडाचा बळी होणं असे दोन्हीही अनुभव घेतलेली व्यक्ती आहे.
बदला म्हणजे बदला, स्व-संरक्षणाचा एक दुधारी प्रकार. ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांच्याकडून तुमची प्रतिष्ठा परत मिळवून घेण्याची, समान वेदना देण्याची आणि बरेच काही करण्याची स्वयंचलित अंतःप्रेरणा आहे.
बदला हा एक हिंस्त्र पशू सारखा माणसाच्या अंतर-मनात ठाम घर करून असतो.
जो आपले प्राणघातक पंजे दुसऱ्यामध्ये ओरबडण्यासाठी वाट पाहत असतो.
विजयाच्या त्या झटापटीत तो पिण्यासाठी, आणि भक्ष करण्यासाठी तयारीत असतो.
एकदा मी माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या
जीवनात असा लक्षात ठेवण्यासारखा प्रसंग उद्भवला का अशी पृच्छा केली असता,एकाने उठून त्याच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाचं वर्णन करून सांगितलं.
तो म्हणाला,
“माझा स्वतःचा मनातला पशू माझ्या भावनांच्या खोल अवस्थेतून बाहेर पडला. माझं वय लहान होतं. मी माझ्या पलंगावर पसरलो होतो,.माझी मांजर खोलीत आली.
तिचे गोल डोळे उत्साही उर्जेने भरलेले होते.माझ्याजवळ निमूट येऊन बसेल ह्या अपेक्षेत मी होतो.पण का कुणास ठाऊक ते मांजर माझ्यावर रागावलेलं मला भासलं. मांजराला एवहडं रागावताना मी प्रथमच पाहिलं होतं.माझ्या पायावर ओरबाडे काढताना पाहून मी अचंबित झालो.
त्या मांजराची पट्टेदार शेपटी पकडण्याची, त्याच्या पंजावर पाऊल ठेवण्याची, परतफेड करण्यासाठी काहीही करण्याची मला इच्छा झाली होती. मला तर्काने विचार करण्या अगोदर मला बदलाच्या भावनेने पछाडलं होतं.
पण मला माझी चूक समजली आणि अशा गोंडस, मांजराला हानी पोहोचवण्याचा विचार करणं किती मूर्खपणाचे आहे हे माझ्या लक्षात आलं.”
दुसऱ्या एका विद्यार्थ्याने तो लहान असताना त्याच्या जीवनातला एक प्रकार सांगितला.
तो म्हणाला,
“सॉकर,फुटबॉल, खेळताना मला अनेक वेळा, माझ्या विरूद्ध खेळणाऱ्या खेळाडूचा कुठल्या न कुठल्या कारणामुळे बदला घेण्याची माझ्यात प्रवृत्ती असायची.
बदला घेण्याची कोणतीही गमावलेली संधी तुम्हाला दीर्घकाळ त्रास देऊ शकते.अशी माझी
त्यावेळी समजूत झाली होती.
ते थंडीचे दिवस होते.
चेंडू मधल्या ओळीवर पास करत असताना एक धटिंगण मुलगा माझ्या समोर आला, माझ्याकडे धावत आला, आणि उभा राहिला.
मी माझ्या डावीकडे वळलो आणि मग शॉट घेतला.
बॉल गोलरक्षकाच्या बोटांच्या आडून गोलमध्ये जात असताना, त्या मुलाने मला खाली पाडून,तो माझ्या अंगावर पडला. मला श्वास घेणं कठीण झालं होतं.जसा मी उठलो तसा मला त्याचा राग आला आणि माझ्या मनात परतफेडीची हिंसक भूक मला जाणवली.मी त्याचा बदला घेतला, मी त्याला पायात पाय घालून पाडलं.
खेळ संपल्यानंतर अशा बालिश भावनांमध्ये मी गुंतणं, ह्या माझ्या कृत्याचा मला पश्चात्ताप न करणं मूर्खपणाचे वाटलं होतं .
तुमच्यातील सूडाच्या पशूला वश करा,कारण त्याशिवाय जीवन चांगलं होणार नाही.
महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे, "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल."
हे सर्व ऐकून मला बरं वाटलं.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान
"डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं
काही व्यक्ती काही बाबींसाठी सुप्रसिद्ध / कुप्रसिद्ध असतात.
काही पडीक वचनांना
क्रूर आणि हिंसक लोकांना वठणीवर कसं आणणार?
Mathematical fallacy
हे डोळा 'फोडण्या'बद्दल नसून डोळा 'मारण्या'बद्दल आहे
हसून हसून वाट लागली. :)
एक नंबर !!!
प्रा. व्यवहारे
हा .... हा .... हा .... !
अहिंसा परमो धर्मः
नवीन विभाग कराव. अंगडेटोपडे.
ह्याचे इतके अवडंबर वाजवले आहे
महाभारतात हा संपूर्ण श्लोक
धन्यवाद !
धन्यवाद प्रचेतस सर. भाजपा
अ बा .. तुझ्यासारख्या
धन्यवाद प्रचेतस साहेब .. चूक
प्रतिसाद मागे घ्यायची सोय
अ बा .. आमचं आम्ही बघून घेऊ .
तांत्रिकदृष्ट्या
काय फरक पडतो
महात्मा ???
+१राष्ट्रपिता महात्मा
+2
त्या मोहनदास वर म्हणे
तुम्हाला पटली नाही म्हणून
हो बरोबर, एकाचे 3 देश केले, 2
चांगलंच केले की मग. नाहीतर
मग कुणी केला संघाच्या लोकानी?
काँग्रेसच ठिकाय पण संघ आणी
तुम्हीच म्हणालात, संघाच्या
आणि या माणसाने देश स्वतंत्र
" बाबारे "
हे "तत्व " ब्रिटिश होते