कॉफी___2
अनोळखी भाषेच्या शहरातल्या म्युझियमच्या लांबलचक संगमरवरी पाय-या चढता चढताच आपण थक्क होऊन जातो.
आतल्या दालनांतली रेंम्ब्रां आणि कार्व्हाजिओ आणि विंची आणि कोणन् कोणाची चित्रं शिल्पं पहाताना कळतं यांना फोटोत बंद करणं केवळ अशक्य .. आणि आपोआप मोबाईल पर्समध्ये जातो.
..….
फिरून फिरून पाय दुखायला लागले असतात, दुपार उलटून चालली असते,
आता एक शेवटचं दालन मग बाहेर पडायचं असं आपण ठरवतो. आणि...
आणि तिथंच तो दिसतो.
संगमरवरी शिल्पासमोर ऐसपैस फतकल मारून बसलेला...
मांडीवरच्या वहीत पेन्सीलनं, समोरची पहुडलेली हर्माफ्रोडाइट चितारणारा..
त्याचं लक्षंच नसतं आजूबाजूच्या वाहत्या माणसांकडं..
हनुवटी झुकवून तो ते वरवर सोप्पे वाटणारे कर्व्स शांतपणे कागदावर उतरवत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या कोप-यातल्या क्रोलाईन्स मधेच थोड्याशा थरथरतात इतकंच..
इतक्यात त्याच्या मनाप्रमाणं स्ट्रोक जमतो आणि त्याच्या मुडपलेल्या ओठांच्या कोप-यात हलकं हसू उमटतं.
कामात रंगून गेलेल्या माणसाइतकं देखणं दुसरं काहीही नसतं अगदी ते बर्निनीचं आखीव रेखीव शिल्प सुद्धा..
.....
डोळ्यात हे चित्र भरून घेऊन आपण जड पावलांनी तिथून निघतो.,
तिथल्याच रेस्तराँमध्ये आपण शांतपणे काफे ओ ले भुरकत असताना कुणीतरी ऑपं..विचारतं
ते न समजून आपण बावळटासारखं वर मान करून अं? करतो तर समोर मगासच्याच त्या हस-या क्रोलाईन्स !!!
आता मात्र अनोळख्या जागेतली , भाषेतली ती कॉफी एकदम ओळखीची गोड गोड होऊन जाते..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3388
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
Borghese, Louvre, Uffizi , Palazzo Massimo मधील हर्माफ्रोडाइट
चित्र सुंदर.
In reply to Borghese, Louvre, Uffizi , Palazzo Massimo मधील हर्माफ्रोडाइट by चित्रगुप्त
ही ही ही ... पण तसं नव्हं पंत.
In reply to चित्र सुंदर. by बाबुराव
हां
In reply to ही ही ही ... पण तसं नव्हं पंत. by चित्रगुप्त
आधी कबरीत गेलेल्या कवितेला वर
In reply to Borghese, Louvre, Uffizi , Palazzo Massimo मधील हर्माफ्रोडाइट by चित्रगुप्त
कॉफी आवडली.
धन्यवाद. :)
In reply to कॉफी आवडली. by कंजूस
ती 'स्त्री' ची नसून 'अर्धनारी' ची आहे.
कामात रंगून गेलेल्या माणसाइतकं देखणं दुसरं काहीही नसतं अगदी ते ब
खूप खूप धन्यवाद कर्नलसाहेब. (
In reply to कामात रंगून गेलेल्या माणसाइतकं देखणं दुसरं काहीही नसतं अगदी ते ब by कर्नलतपस्वी
प्रेमगीत च आहे....