✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार - एक चर्चा महत्वाची

ह
हेमंत सुरेश वाघे यांनी
Fri, 03/22/2024 - 22:09  ·  लेख
लेख
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार म्हणजे केंद्रशासित करणार का ? मुंबई केंद्रशासित केली तर मुंबई मध्ये दारू चे दर गोवा / दमण सारखे स्वस्त होतील का ? कि गुरुग्राम ( गुरगाव ) सारखे स्वस्त होतील ( अधिक माहिती साठी - मला गुरुग्राम चे दर गोव्या हुन कमी वाटले ) मुंबई केंद्रशासित म्हणजे नवी मुंबई , ठाणे पण त्या मध्ये येणार का ? की ती मानखुर्द , मुलुंड , भांडुप , दहिसर मधीलच होईल ? जर मुंबई वेगळी होवून स्वस्त दारू झाली आणि नवी मुंबई , ठाणे तीत नसेल तर चेक अप जोरदार होईल का ? रेल्वे मध्ये पण बाटल्या चेक करतील का ? अशी चेक अप जवळपास अशक्य नाही का ? बॉर्डर वर स्वस्त बार उघडतील किंवा लोक रेडोमिक्स करून पितील आणि सेप्रेट मुंबई ची बॉर्डर क्रॉस करतील त्यांस कसे थांबवणार ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7390 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

मुंबईची काळजी नवी मुंबईत

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/22/2024 - 22:57 नवीन
मुंबईची काळजी नवी मुंबईत राहनार्यांनाच का असते?? (काही लोक तर नवी मुंबईत राहून मुंबईत राहतो सांगतात, असा एक सानपाड्यात राहनारा पण मुंबईत राहतो सांगनार्याला मी रंगेहात पकडले होते.) :)
  • Log in or register to post comments

कर्जत खोपोली खर्डी कसारा

अहिरावण
Sat, 03/23/2024 - 07:15 नवीन
कर्जत खोपोली खर्डी कसारा रहाणारे लोक सुद्धा आम्ही "मुंबईत" रहातो असे म्हणतांना ऐकले आहे. तीच गोष्ट राजगुरुनगर, चाकण, लोणावळा, कात्रज बोगद्यापलीकडले लोक आम्ही "पुण्यात" रहातो असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खरी मुंबई....

मुक्त विहारि
Sat, 03/23/2024 - 07:25 नवीन
ही फक्त फोर्ट विभागा पूरतीच आता, जिथ पर्यंत लोकल जाते, तिथ पर्यंत मुंबई....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

घ्या ! म्हणजे आता मेमू कल्याण

अहिरावण
Sat, 03/23/2024 - 10:37 नवीन
घ्या ! म्हणजे आता मेमू कल्याण ते पुणे आणि कल्याण ते नाशिक चालवायचा घाट चालला आहे तर पुणे आणि नाशिक सुद्धा मुंबईतच येईल की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हो ना....

मुक्त विहारि
Sat, 03/23/2024 - 12:47 नवीन
तशीही, मुंबई आणि पुणे, ही सख्खी भावंडे आहेतच आणि नाशिक हे, मुंबई आणि पुण्याचे सावत्र भावंडं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

अगदी अगदी....

मुक्त विहारि
Sat, 03/23/2024 - 07:28 नवीन
सागरली, पाथरली, ह्या गावातली माणसे देखील, आम्ही डोंबिवलीत राहतो, असेच म्हणतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

मुंबई , महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ती तशीच असेल...

मुक्त विहारि
Sat, 03/23/2024 - 07:22 नवीन
निवडणुका जवळ आल्या की हे प्रश्न ऐरणीवर येतो. आणि जी गोष्ट कधीच होणार नाही, त्या गोष्टीवर फुकाची चर्चा कशाला?
  • Log in or register to post comments

जिथपर्यंत म ना प....

कर्नलतपस्वी
Sat, 03/23/2024 - 08:50 नवीन
ची बस सेवा देते तेथपर्यंत पुणे. या न्यायाने राजगुरुनगरकर असुनही प्रसंगी पुणेकर.
  • Log in or register to post comments

काही लोक.....

कर्नलतपस्वी
Sat, 03/23/2024 - 08:51 नवीन
पुण्यात राहून आम्ही पुणेकर नाही असे छातीठोक पणे सांगतात.
  • Log in or register to post comments

एम एच १४ वालेही पुण्याचे आहोत

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/23/2024 - 10:40 नवीन
एम एच १४ वालेही पुण्याचे आहोत असे छातीठोकपणे सांगतात. :)
  • Log in or register to post comments

कांदा पोह्यावर सांबार मारून

भागो
Sat, 03/23/2024 - 12:29 नवीन
कांदा पोह्यावर सांबार मारून खाणारे तेथे पुणेकर जाणावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आणी इडलीवर केचप !!

अहिरावण
Sat, 03/23/2024 - 13:06 नवीन
आणी इडलीवर केचप !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

हळू हळू मुंबई वरुन पुणे

अहिरावण
Sat, 03/23/2024 - 10:42 नवीन
हळू हळू मुंबई वरुन पुणे विरुद्ध इतर असा सामना होणार !!
  • Log in or register to post comments

या उलट

सर टोबी
Sat, 03/23/2024 - 10:45 नवीन
शिवाजी पार्कच्या एका टोकाच्या कट्ट्यावर बसून “आज दादरला जाऊन येणार आहे” असे बाणेदार वाक्य ऐकले आहे.
  • Log in or register to post comments

सहमत आहे. माझा एक मित्र

अहिरावण
Sat, 03/23/2024 - 10:48 नवीन
सहमत आहे. माझा एक मित्र दादरमधे रहायचा. त्याला कधी चल जरा कुलाब्याला जाऊन येऊ म्हटले की कशाला मरायला मुंबईत जायचंय? जा तु एकटा मी नाही येत असं म्हणून वाटी लावायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

आमचं पुणं....

कर्नलतपस्वी
Sat, 03/23/2024 - 14:42 नवीन
केन्द्रशासीत होऊ शकेल काय? दारू,कार सारख्या मुलभूत गरजा स्वस्त होतील.......
  • Log in or register to post comments

आम्ही ठाण्यात राहतो .....

नठ्यारा
Sat, 03/23/2024 - 14:53 नवीन
आम्ही ठाण्यात राहतो असं ओवळ्याची लोकं म्हणतांना ऐकलंय. हां, तो ठाणे महापालिकेचा भाग आहे हे खरंय. पण घोडबंदर मार्गास ठाणं म्हणणं कसंसंच वाटतं. आगरा रोड आणि हायवे एक झाले की ठाणं संपलं अशी आमची लहानपणी समजूत होती. घोडबंदर रोडाच्या पत्त्यांचा पिन ४००६०७ लिहिला तर पत्र येत नसे. पण ठाणे मुख्य कार्यालयाचा पिन ४००६०१ लिहिला तर बरोबर पोहोचंत असे. यावरून घोडबंदर मार्गास ठाणे म्हणण्यास टपालखात्याचा छुपा पाठिंबा होता असं दिसतंय. स्वकीयांचा घाव अधिकंच वर्मी लागतो, नाही? ;-) -ना.न.
  • Log in or register to post comments

केजरीवाल वाला धागा वाचनमात्र

टर्मीनेटर
Sat, 03/23/2024 - 15:17 नवीन
केजरीवाल वाला धागा वाचनमात्र केल्याचे बघून वाईट वाटले… असो… आता इथे यायचे की नाही हा विचार करण्यास प्रवृत्त झालो आहे! जय हिंद! जय महाराष्ट्र!
  • Log in or register to post comments

तरी पण या....

मुक्त विहारि
Sat, 03/23/2024 - 15:30 नवीन
केजरीवाल, राहूल गांधी, ममता आंटी, ही काही मिपा सोडण्याची कारणे नाहीत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

तरी पण मिपा भ्रष्टाचाऱयांचे

टर्मीनेटर
Sat, 03/23/2024 - 15:38 नवीन
तरी पण मिपा भ्रष्टाचाऱयांचे समर्थन करणाऱ्यांसाठीचे व्यासपीठ ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत असेल तर ते स्विकारणे मला तरी अशक्य आहे… कळावे, लोभ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

असे एकांगी कसे काय तुम्ही??

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/23/2024 - 16:14 नवीन
असे एकांगी कसे काय तुम्ही?? कशा वरून डायरेक्ट भ्रष्टाचारी ठरवले त्यांना? असो. इथे अवांतर नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

कशा वरून डायरेक्ट भ्रष्टाचारी ठरवले त्यांना?

मुक्त विहारि
Sat, 03/23/2024 - 17:55 नवीन
अगदी अगदी.... न्यायालयाचा अंतिम निर्णय, बाकी आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 03/23/2024 - 20:13 नवीन
कशा वरून डायरेक्ट भ्रष्टाचारी ठरवले त्यांना
बीफ निर्यात करणारे शिवसेना-भाजपाला देणग्या देत होते आणि ह्यांचे कार्यकर्ते कोणीतरी बीफ खल्ले म्हणुन टाळकी फोडतात. गंंम्मत म्हणजे बीफ निर्यात करणारे जेवणात कांदा-लसूण न खाणार्या कॅटॅगरीमधील आहेत. निवड्णुक रोखे प्रकरणात सुप्रिम कोर्टाने सगळ्यानाच उघडे पाडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सुप्रिम कोर्टाने सगळ्यानाच उघडे पाडले.

मुक्त विहारि
Sun, 03/24/2024 - 00:41 नवीन
न्यायालय, ह्या संस्थेवर माझा , पूर्ण विश्वास आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

पुर्णपणे सहमत.

अहिरावण
Sun, 03/24/2024 - 10:41 नवीन
पुर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बीफ निर्यात करणारे शिवसेना

अहिरावण
Sun, 03/24/2024 - 10:42 नवीन
बीफ निर्यात करणारे शिवसेना-भाजपाला देणग्या देत होते आणि ह्यांचे कार्यकर्ते कोणीतरी बीफ खल्ले म्हणुन टाळकी फोडतात. गंंम्मत म्हणजे बीफ निर्यात करणारे जेवणात कांदा-लसूण न खाणार्या कॅटॅगरीमधील आहेत.
आणि
निवड्णुक रोखे प्रकरणात सुप्रिम कोर्टाने सगळ्यानाच उघडे पाडले.
या दोन वाक्यांचा संबंध लावून देणा-यास बिनालसुनकांद्याचे चविष्ट जेवण लाभेल असा आशीर्वाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

केजरीवाल वाला धागा वाचनमात्र

अहिरावण
Sat, 03/23/2024 - 17:11 नवीन
केजरीवाल वाला धागा वाचनमात्र केल्याचे बघून वाईट वाटले… असो… आता इथे यायचे की नाही हा विचार करण्यास प्रवृत्त झालो आहे! जय हिंद! जय महाराष्ट्र!
काहीही हं.. टार्मीनेटर. असे टर्मिनेट होऊ नका.. भ्रष्टाचार सिद्ध होऊन अशा भ्रष्टाचा-यांना शिक्षा झाल्याचे शुभवर्तमान मिपावर आपल्या आयडी मार्फत मिळावे असा दैवी संकेत आहे हे विसरु नका. उज्वल भविष्याकडे पाहून सध्या शांत रहा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

काय ठरलं मग?

अहिरावण
Tue, 03/26/2024 - 19:54 नवीन
काय ठरलं मग?
  • Log in or register to post comments

मुंबई वेगळी झाली की इमानदार

विवेकपटाईत
Wed, 03/27/2024 - 11:17 नवीन
मुंबई वेगळी झाली की इमानदार माणसाला मुख्यमंत्री करा. एकावर एक दारूची बाटली फ्री मिळेल. शेकडो दारूची नवीन दुकाने उघडली जातील. काही म्हणा दिल्लीकर पिलेल्या दारूला जगत नाही. लाखो लोकांनी फ्री ची दारू प्राशन केली असली तरीही ईमानदार माणसाच्या समर्थांनात रस्त्यावर उतरले नाही.
  • Log in or register to post comments

पण

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 03/27/2024 - 11:45 नवीन
पण त्याला जेलमध्ये टाकायचे तर ई.डी.चे 'प्रामाणिक' आणि 'कनवाळू' अधिकारीही हवेत. 'कंबर दुखतेय' म्हणून शरद रेड्डीसारख्या माणसाला सोडणारे ई.डी.चे अधिकारी असले तर उद्धव, शरद पवार.. आदित्य.. कोणालाही निवड्णूकीच्या काळात तुरुंगात टाकता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा