गालावरी हसू, मुखावरी दाढी ।
राजकारणे गुढी, बांधू पाहे ।।
दाढीचे वजन, दाढीचेच भजन ।
करू आम्ही नमन, दाढीचेच ।।
दाढीचाच फोटो, दाढीचीच मूर्ती ।
सांगावी अपकीर्ती, नेहरूंची ।।
पाजू आमुचे रक्त, आम्ही अंधभक्त ।
करू मशागत, दाढीचीच ।।
कपिला गाय, करोनिया माय ।
गळ्यातच पाय, आमच्याच ।।
ईडीचाच टेकू, घेऊनिया फेकू ।
विरोधकांचे दमन, करू पाहे ।।
जे का ईडीसी घाबरले, त्यांसी म्हणे जो आपुले ।
समीप येता म्हणावे, शुद्ध जाहले ।।
चोरावे धनुष्य, लांबवावे घड्याळ ।
हाती द्यावे टाळ, जनतेच्या ।।
प्राणप्रतिष्ठेचा कावा, विरोधकांचा चावा ।
दाढीतल्या उवा, ठेचू पाहे ।।
मस्तवाल खोंड, पाळोनिया गुंड ।
निर्भयांचे तोंड, फोडू पाहे ।।
जनता अडानी, मतदार अडानी ।
अडानीच अडानी, चहूकडे ।।
हुकूमशाहीचा वास, येताच डास ।
राष्ट्रप्रेमाची गुणगूण, करू पाहे ।।
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6189
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक नंबर रम्या भाऊ !!!
माननीय मोदींवर हुकूमशाहा
+१
In reply to माननीय मोदींवर हुकूमशाहा by महिरावण
अरे व्वा. लैच भारी. स्वागत.
बाझीगर यांच्या अशाच पण
In reply to अरे व्वा. लैच भारी. स्वागत. by अमरेंद्र बाहुबली
जनता अडानी, मतदार अडानी ।
विडंबन भारी,
पाजू आमुचे रक्त, आम्ही
आमच्या पण चार ओळी....
करी भ्रष्टांना पावन, तोच आमचा
In reply to आमच्या पण चार ओळी.... by मुक्त विहारि
जन पळभर म्हणतील, हाय हाय...
In reply to करी भ्रष्टांना पावन, तोच आमचा by अमरेंद्र बाहुबली
तथास्तू
In reply to आमच्या पण चार ओळी.... by मुक्त विहारि
मस्तच
In reply to तथास्तू by बाजीगर
अरे व्वाह मु.वी.जी...
(No subject)
गालावर खळी डोळ्यात धुंदी
आमच्या पण दोन ओळी....
In reply to गालावर खळी डोळ्यात धुंदी by वामन देशमुख
हा हा
आशय छान आहे. भिडली रचना.
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्यासारख्या गद्य-गर्दभाने
In reply to आशय छान आहे. भिडली रचना. by वामन देशमुख
तो प्रतिसाद तुमच्या ओळींना नसून
In reply to आशय छान आहे. भिडली रचना. by वामन देशमुख
ED, बाबतीत सुप्रीम कोर्ट देखील EDच्या पाठीशी...
सत्यवचन आहे.
उपसर्ग राहिला वाटते