हट्टी व्यक्ती, समुह किंवा संस्थेची समजूत काढणे कठीण जाते तेव्हा आग्रहाची जागा हट्टाने घेतली असे म्हणता येऊ शकते का? आधी ऊस तोडून मागणार आणि तुटलेला ऊस आधीसारखा करून हवा म्हणून हट्ट धरल्यामुळे, राज हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट या पैकी बाल हट्ट अवघड कसा याची आपण सर्वांनीच कथा ऐकलेली असते. हट्ट आणि हट्ट करणार्यांचे हे तीनच प्रकार आणि उपप्रकार असतात की आणखीही?
या चर्चेचा उद्देश कोणत्याही विशीष्ट हट्टाचे नकारात्मक मूल्य जोखण्याचा (value judgement) किंवा हट्ट केलेल्यांच्या हट्टांना कमी लेखण्याचा नाही तर केवळ हट्टांचे प्रकार शक्य तेवढे स्थल- काल- परिस्थिती निरपेक्षपणे लक्षात घेण्याचा आहे. (अर्थात कुणालाही दुखावण्याचा उद्देश्य निश्चितपणे नाही त्यामुळे त्यामुळे कोणत्याही विशीष्ट हट्टाबदल चर्चा घसरून हायजॅक होणार नाही याची काळजी घेण्याचे सहकार्याचे आवाहन आहे.)
* राज हट्ट
* न्याय संस्था हट्ट
* कायदा हट्ट वेगळा असतो कि राज-न्याय संस्था हट्टाचा प्रकार असतो? याचे शब्द-प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्याशी नाते काय असते?
** कर्मठता हट्ट वेगळा की हट्टाचेच वेगळे नाव? लकीर के फकीर असणारा कर्मठता-हट्ट वेगळा कि शब्द-प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य आणि कायदा हट्टाशी निगडीत असतो? (# कर्मठता शब्दात केवळ धार्मिक नव्हे तर धर्मेतर बाबतीतील कर्मठता ही गृहीत धरल्या आहेत)
* उपद्रवमुल्य-दर्शन हट्ट असतात तसे शांतता-दर्शन केवळ आग्रह असतो की समजूत न घालता येणार्या हट्टाचीही जागा घेऊ शकतो?
* भांडवलशहांचे हट्ट असं काही असते असे तुम्हाला वाटते का? असेल तर काही उपप्रकारही शक्य आहेत का?
* मध्यवर्ती बँका (आरबीआय, आयएमएफ) च्या आग्रहांना हट्ट म्हणावे का?
* समुह हट्ट किंवा जनहट्टाचे किती उपप्रकार असू शकतील? जसे की संघटनांनी धरलेले हट्ट अजून काही सुचततात का?
* व्यक्ती हट्टांचे कोणकोणते उपप्रकार असू शकतील? नेतृत्व हट्ट, बॉस हट्ट हे एकच की वेगवेगळे? गुरुजन हट्टांना व्यक्ती हट्टात धरावे कि संस्था हट्टात? संस्थासंचालक हट्ट व्यक्ती हट्टाचा प्रकार की संस्था हट्टाचा? कुटुंब प्रमुख किंवा टिम लिडर हट्ट हा संस्थात्मक हट्ट कि व्यक्तीगत हट्ट असतो?
** पितृ हट्ट, मातृहट्ट, मोठ्या भावा बहीणीचे हट्ट लहान भावा बहींणंचे हट्ट, जावई हट्ट सासूहट्ट सूनहट्ट सासराहट्ट पतिहट्ट पत्नी हट्ट, पुत्रहट्ट, कन्याहट्ट,
** भाई-दादा-डॉन हट्ट
* न्यायाधिश, स्थानिक नागरी संस्था विधान सभा ते लोक-राज्य सभांच्या अध्यक्ष सभापतींचे हट्ट हे व्यक्ती हट्टाचे प्रकार की संस्था हट्टाचे?
* व्यक्ती हट्ट, संस्था हट्ट आणि समुह हट्टांचे नाते कसे असते?
* संस्था हट्टांचे स्वरूप आणि उपप्रकार काय असतात?
* तुम्हाला अजून काही हट्टांचे प्रकार-उपप्रकार सुचतात का?
* उद्देश्य विषयास धरून अभ्यासपूर्ण चर्चेचा आहे.
* व्यक्तिगत आणि समुह टार्गेट करणार्या टिका, विषयास धरुन नसलेल्या आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
वाचने
8726
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>उद्देश्य विषयास धरून
:) चर्चा रंग भरण्याची शक्यता
In reply to >>>उद्देश्य विषयास धरून by अहिरावण
पुरोगांमींना ओढूनताणून कशातही
In reply to >>>उद्देश्य विषयास धरून by अहिरावण
खळ्ळ फट्याक
In reply to पुरोगांमींना ओढूनताणून कशातही by अमरेंद्र बाहुबली
उत्कृष्टतेबद्दलचा स्वहट्ट
'उत्कृष्टतेबद्दलचा स्वहट्ट', व्वा क्या बात है!
In reply to उत्कृष्टतेबद्दलचा स्वहट्ट by चित्रगुप्त
हट्ट सामाजिक असतात. एक दोन
१०० टक्के सत्य
In reply to हट्ट सामाजिक असतात. एक दोन by कंजूस
नाही. चित्रगुप्तांनी
In reply to १०० टक्के सत्य by माहितगार
हो असेही ग्राहकवर्तन बर्
In reply to नाही. चित्रगुप्तांनी by कंजूस
अनुरूपता हट्ट आणि गैर-अनुरूपता हट्ट
अजून काही हट्ट प्रकार
एखाद्या उद्दीष्टासाठी त्याग
In reply to अजून काही हट्ट प्रकार by माहितगार
जीवनशैली हट्ट
In reply to अजून काही हट्ट प्रकार by माहितगार
याचक हट्ट, अतिथी हट्ट
वचनपुर्ती हट्ट
In reply to याचक हट्ट, अतिथी हट्ट by माहितगार
प्रतिसाद हट्ट लेख हट्ट
>> प्रतिसाद हट्ट - असा हट्ट
In reply to प्रतिसाद हट्ट लेख हट्ट by अहिरावण
जिलेबी हट्ट :)
In reply to प्रतिसाद हट्ट लेख हट्ट by अहिरावण
नफा हट्ट
सरकार अल्पमत किंवा त्रिशंकु
स्वतःचा जुना धागा
:)) हा असा हट्ट करणे मला
In reply to स्वतःचा जुना धागा by अनन्त्_यात्री
कंफर्ट (comfort) हट्ट…
सुसह्य असणे. प्रवासात कुणाला
In reply to कंफर्ट (comfort) हट्ट… by टर्मीनेटर
कंफर्ट हट्ट = आरामदायी सुविधांसाठीचा हट्ट?
In reply to कंफर्ट (comfort) हट्ट… by टर्मीनेटर
माझ्या इच्छेप्रमाणे इतरांनी वागावे
या हट्टाचे कमी अधिक सौम्य
In reply to माझ्या इच्छेप्रमाणे इतरांनी वागावे by चित्रगुप्त
सहमत आहे.
In reply to माझ्या इच्छेप्रमाणे इतरांनी वागावे by चित्रगुप्त