थोडी गंमत.
ओळखा पाहू.
खालीलपैकी एक विधान (स्टेटमेंट) सत्य आहे. पहा
तुम्हाला ओळखता येत आहे का.
१.तुम्ही घेतलेल्या प्रत्येक श्वासात एक अणू मधुबालाने(इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही
नटाचे/नटीचे/व्यक्तीचे नाव टाकू शकता. उदा. शााहरुखखान) टाकलेल्या निश्वासातला असतो.
२.एक द्रव्य (liquid) असेही आहे की जे उतारावर वाहण्याऐवजी चढावर वाहू शकते, म्हणजे नदी
सागराला मिळण्याऐवजी हिमालयाकडे माहेरी परत जाते जणू.
३.लग्न करताना तळमजल्यावर काम करण्याऱ्या मुला/मुलीशी पहिली पसंती द्या कारण त्यांचे वय हळू
हळू वाढतेे (इतरांच्या तुलनेत) . तसेच पहिल्या मजल्यावरची सदनिका घ्या. म्हणजे तुम्ही बरीच वर्षे तरुण रहाल.
४. अणु एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकतो. (म्हणजे तुम्ही ऑफिसात काम करा. आणि त्याच
वेळी प्रिये बरोबर थियेटर मध्ये सिनेमा बघू शकता. असे आहे का? ओह माफ करा, सध्या हे आपल्या
सारख्या मर्त्य मानवांना शक्य नाही. पण अणु हे करू शकतात. आणि आपण सरते शेवटी अणुनेच बनलो आहोत. तेव्हा भविष्यात हे शक्य होईल. मग उगाच एक सिक लिव वाया जाणार नाही.)
५.संपूर्ण मानव जात एका शुगर क्यूब मध्ये सामावू शकेल.
६.बिग बँग तुमच्या दारी! टेलीविजन मध्ये कधी कधी पावसाच्या धारा किंवा अनेक ठिपके ठिपके दिसतात. त्याला static म्हणतात. त्यातला काही भाग हा बिग बँगचा अवशेष असतो. (cosmic microwave background CMB)
७. विज्ञानाचे नियम टाईम ट्रॅवेलची शक्यता नाकारत नाहीत.
८.गरम कॉफीने भरलेला कप हा थंड कॉफीने भरलेल्या कपाच्या तुलनेत जास्त वजनदार असतो.
९.तुम्ही जेवढ्या वेगाने प्रवास कराल तेव्हढी तुमची अंगकाठी शिडशिडीत राहील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
सुलताना सुलताना
Tunneling Effect
बाकी
फक्त कन्सेप्ट लक्षात घ्यायचा.
आता मी ओरिजिनल English
माझ्या नाकाच्या शेंड्यावरची
दूरस्थकलाप
आईनस्टाईन ह्यांनी आयुष्यात
मी माझ्याच बाकड्यावर शेजारी
हे आवडले