सगळ्याच प्रश्नांना उत्तरे व्यर्थ शोधु नकोस,
सगळेच संदर्भ नाकारायचा वेडेपणा करु नकोस्,
उमलणारं प्रत्येक फूल हारातच गुंफलं जाईल,
असंही नाही.
काही धुळीतदेखील मिसळ्तील
तो सार्वभौम सूर्यसुध्दा
आयुष्याच्या प्रत्येक संध्याकाळी,
समुद्रात आत्महत्या करतो,
नि:शब्दपणे !!!
आयुष्यभर फुले मिळाली, असे भाग्यवान थोडेच!!!!!
बहुतेक आपल्यासारखेच,
ऊन सावल्यातुन प्रवास करणारे,
तू स्वतःला कमळाच्या पानासारखं
अलिप्त करुन जगावसं असही नाही,
फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवलसं
तरी खुप झालं.
स्वप्नयोगी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1586
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
अपरिहार्यता..
सही!
छान लिहीली
धन्यवाद
In reply to छान लिहीली by जागु