मित्रानो
दिवाळी अंकांची तयारी बहुतेक ठिकाणी चाललेली आहे.
लेखक सगळे सामान सुमान घेऊन लेखांच्या चकल्या जिलेब्या पाडायच्या तयारीत आहेत.
या पार्ष्वभूमीवर मिपाचा दिवाळी अंक कधी येणार आहे याची संपादक मंडळाकडून काहीच उद्घोषणा आलेली नाहिय्ये.
मिपाचा दिवाळी अंक नेहमीच आगळावेगळा असतो. देखणा आणि उत्तमोत्तम मजकूराची भरपूर मेजवानी असा असतो.
यंदाच्या वेळेस दिवाळी अंकात काय असेल याचा केवळ अंदाजच आपण बांधू शकतो. कारण अजून विषयदेखील माहीत नाहिय्ये.
मिपा दिवाळी अंकात काय काय असावे असे तुम्हाला वाटते ?
माला विचाराल तर माझी अपेक्षा सांगतो.
किमान तीन मस्त रहस्य कथा.
दोन रोमँटीक कथा
एक शास्त्रीय माहितीपूर्ण लेख.
एक नव्या जगाची सफर घडवणारे भौगोलीक प्रवासवर्णन
ऐतिहासीक लेख.
चुरचुरीत आणि फर्मास अशा कविता.
आज्जीचे लेख.
बालकथा
आणि काही भन्नाट किस्से आणि कोडी.
व्यंगचित्रे आणि अर्कचित्रे.
संगीताचा खजिना खुला करणारा एक ललीत लेख.
तुम्हाला काय वाटते "काय काय असायला हवे या वेळच्या दिवाळी अंकात?"
प्रतिक्रिया
पाकृ
आणि आकर्षक मुखपृष्ठ तिमीर
वर्ल्ड कप
खुप काही...
वर्ल्ड कप
व्यंगचित्रे असतील तर छान !
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या