Skip to main content

अराजकीय घडामोडी - सप्टेंबर २०२३

लेखक निनाद यांनी बुधवार, 13/09/2023 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक बातम्या
  • मोरोक्को मध्ये भूकंप अनेक ठार
  • युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाश्चात्य देशांना धमकी दिली आहे की जर शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद केला तर त्या देशात राहणारे लाखो युक्रेनियन हिंसक होऊ शकतात.
  • लीबिया हा जागतिक पटलावर विसरून गेलेला देश आहे. पण लीबियामध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर झाली आहे. तेथे अचानक आलेल्या पुरामध्ये २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • विमानच बंद पडल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात अडकले आहेत.
  • अ‍ॅपलने नवीन फोन मॉडेल आयफोन १५ रिलीज केले आहे. आता USB-C चा वापर यात केला गेला आहे.
  • भारतातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हनोई येथे पोहोचले आहेत. आता व्हिएतनामसोबत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी करण्याचा प्रयत्न आहे. चीनी कारखान्यांना पर्याय म्हणून व्हिएतनाम वेगाने पुढे येत आहे.

वाचने 12600
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी इस्लामिक देशांमध्ये धार्मिक छळाचा सामना केल्यानंतर भारतात स्थलांतरित झालेल्या १०८ हिंदूंना कायमस्वरूपी भारताचे नागरिकत्व दिले. अहमदाबाद जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संघवी यांनी अहमदाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या १०८ हिंदूंना “भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र” प्रदान केले. स्थलांतरित झालेले १०८ हिंदू शेजारील अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतून आलेले आहेत.

१०८ हिंदूंना “भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र” प्रदान केले. भारताने हे योग्य पाऊल उचलले आहे अभिनदंन याला हिंदुत्वच प्रसार वैगरे म्हणणार्यांनी हे हि बघावे कि सौदी ने काय केले ते जर्मनी मध्ये https://www.independent.co.uk/news/world/europe/saudi-arabia-offers-ger…

In reply to by चौकस२१२

इतर कोणत्याही देशाच्या देश सोडून जाणार्‍या मुस्लीम लोकांना कोणत्याच आखाती देशाने थारा दिलेला नाही. सौदीने जर्मनीमधे मशिदी बांधण्यासाठी पैसे दिले पण सिरीयन नागरीकाना आमच्या देशात या असे बोलावले नाही.

In reply to by विजुभाऊ

इतर कोणत्याही देशाच्या देश सोडून जाणार्‍या मुस्लीम लोकांना कोणत्याच आखाती देशाने थारा दिलेला नाही. हीच तर गोम आहे अर्थात सोयीस्कर रित्या त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आशियातील अजून एक उदाहरण युरोप ला उत्तर आफ्रिकेतून किंवा उत्तर अम्रेकेला दक्षिण अमेरिकेतुन तसे जाणे जवळ आहे त्यामानाने ऑस्ट्रेल्या दूर असल्यामुळे असे "घुसणे" अवघड आहे पण तरी सुद्धा अनेक वर्षे आखाती देशातून "शरणार्थी" म्हणून बोटीने ऑस्ट्रेल्याच्या पश्चिम उत्तेरल असलेलय इंडोनेशिया जवळ;ली ख्रिसमस बेटावर बोटी ने असे घुसखोर येतात . असे भासवले जाते कि ओह "हे बघा इतकं वैगरे वरून कसे कष्ट सोसून इथपर्यंत आलेत.".. खर असे असते कि पैसे जमवून ते "विमानाने" मलेशिया किंवा इंडोनेशियात येतात ( तेवढे पैसे असतात ) आणि मग तिथून स्मगकरांना पसे देऊन "बोटीचा खडतर प्रवास करून ख्रिसमस बेटावर येतात पण मुळात हा प्रशन असतो कि मलेशिया किंवा इंडोनेशिया हे एक तर इस्लामी देश आहेत + त्यामानाने शांत आणि समृद्ध आहेत मग तिथेच का राहत नाहीत सीरिया किंवा इराक पेक्षा निश्चितच जास्त सुरक्षित .... पण खरे हे असते कि यात दोन हेतू असतात १) केवळ अर्थाइक उन्नती साठी पाश्चिमात्य देशात जाणे आणि ते राजमार्गाने जाण्याची पात्रता नसल्याने असे घुसणे २) हळू हळू गैर इस्लामिक देशांत आपली लोकसंख्या वाढवणे आता १०० पैकी १० खरे शरणार्थी असतील हि .. पण हा वरील आरोप केला जातोच अर्थात असे आरोप करणाऱ्यांना लगेच इस्लामोफोबिक म्हणून "कॅन्सल " केलं जाते हे आहेच हे राम .....

लिबीया ह अदेश मुअम्मर गडाफी असताना बर्‍यापैकी स्थितीत होता. ओपेक मधे काड्या करून का होईना वर्चस्व गाजवायचा. इराक देखील सद्दाम हुसेन असताना खूपच चांगल्या स्थोतीत होता. मुख्य म्हणजे इराक हा सद्दम हुसेन सत्तेत असताना खूपच मोकळा देश होता. सद्दाम हुसेन ची राजवट अमेरीकेने मोडकळीस आणल्यानंतर मात्र तेथे आय एस आय एस ने डोके वर काढले. आणि वाटोळे झाले. जिथे जिथे अमेरीकेने ढवळाढवळ केली आहे तिथे तिथे देशाची वाटच लागली आहे.

In reply to by विजुभाऊ

जिथे जिथे अमेरीकेने ढवळाढवळ केली आहे तिथे तिथे देशाची वाटच लागली आहे. चार्ली विल्सन'स वॉर हा चित्रपट पहावा

चीनच्या मालमत्तेच्या मंदीमुळे अनेक विकासकांना प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडले गेले आहे. अनेक विकासक दिवाळ्खोरीत गेले आहेत. याचा अर्थ अनेक लोक चीन आता दिवाळखोरीत गेला असा काढत आहेत. पण मला तसे वाटत नाही. चीन त्यांच्या अर्थव्यवस्थेतील खराब भागाचे ऑपरेशन करत आहे. काही काळात चीनी व्यवस्था परत जागेवर आणली जाईल. कदाचित आधी इतकी नसेल पण नक्कीचे परत येईल. चीनी सत्ताधारी सीसीपी फार धूर्त आहे. अशीतशी सत्ता जाऊ देणार नाही याची मला खात्री आहे. पण अर्थ व्यवस्थेवर कशी पकड परत आणेल हे पाहणे रोचक असेल.

जुनी बातमी: कंबोडियाच्या सत्ताधारी पक्षाने एकतर्फी निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. कंबोडियावर ३८ वर्षे राज्य करणारे हुन सेन यांनी त्यांचा अनभिषिक्त उत्तराधिकारी आणि ज्येष्ठ पुत्र हुन मानेट कडे सत्ता सुपूर्त केली आहे. अशा रितीने वडिलांकडून मुलाकडे सत्ता हस्तांतरित झाली. निवडणूकीआधी मीडिया आणि विरोधक यांचा आवाज शांत केला गेला होता. मुख्य विरोधी पक्षावर बंदी घालण्यात आली होती. कंबुज किंवा कंबोज हे कंबोडियाचे प्राचीन संस्कृत नाव आहे. कंबोडिया एकेकाळी शक्तिशाली हिंदू कंबोज साम्राज्यातून उदयास आला. जयवर्मन, सूर्यवर्मन, जयवर्मन सातवा, अकराव्या आणि चौदाव्या शतकादरम्यान संपूर्ण प्रदेशावर एकछत्री हिंदू साम्राज्य उभे केले होते. याचे पुरावे अंगकोर वाट मंदिराच्या रुपाने पहायला मिळतात.

नसीरुद्दीन शाह आजोबा परत चर्चेत आले आहेत. भीड सारख्या चित्रपटांपेक्षा “द काश्मीर फाइल्स” आणि “गदर २” सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांच्या पसंतीबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, हा कल पूर्णपणे चिंताजनक आहे. याच प्रकारचे मत अमीरखान ची माजी पत्नी किरण राव ने व्यक्त केला आहे. त्याअर्थी हे बहुदा टूल कीट चा भाग असाभागासे मानायला जागा आहे. हे लोक कोणतेही विधान किंवा चिंता अशीच वाटली म्हणून कधीच व्यक्त करत नाहीत. सगळ्यामागे वेळ साधलेली असते. मात्र यामागे विधानामागे काय कारस्थान हे लवकरच बाहेर येईल अशी आशा आहे.

In reply to by निनाद

नसीरुद्दीन शाह आजोबा अनि बारामतीचे काका या दोघांनी आता सन्यास घयावा .. रागा जिथे ध्यान धारणेला जातात तिथे जावे

स्मशानात वाढदिवस साजरा केला https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/celebrating-birthdays-i... स्मशानात लोक अंत्य विधीसाठी येतात.तिथे वाढदिवस साजरे करणे कितपत योग्य. दुसरा तिथे येणारे अधिकांश व्याधीग्रस्त असतात. अंधविश्वास दूर करायला लहान मुलांना ही तिथे नेणे याचा एकच अर्थ निघतो अनिस मानसिक विकृतीने ग्रस्त संस्था आहे.

ब्रिटनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहराने दिवाळखोरी घोषित केली आहे. बर्मिंगहॅम सिटी कौन्सिल मध्ये २०११ मध्ये सुमारे २१% एका धर्माचे लोक होते. हे वाढून सुमारे ३०% झाले आहेत - यातले लोक प्रामुख्याने पाकिस्तानी वंशाचे आहेत. येथे राहत असलेले बहुतेक पाकिस्तानी लोक काहीही काम करत नाहीत आणि त्यांना अनेक अपत्ये असल्याने सरकारला त्यांना भत्ते द्यावे लागतात. यामुळे येथे व्यवसाय कोलमडला आहे आणि बर्मिंगहॅम सिटी कौन्सिल दिवाळखोर झाले आहे.

In reply to by निनाद

आपण कोणत्या आधारावर काढला आहे? बाकी कोरड्या दिवसांमध्ये देखील किलकिल्या दाराआडून मद्य विक्री होते हे जसे पोलिसांना माहिती असते त्याप्रमाणे अराजकीय धाग्यांवर व्यवस्थित अजेंडे चालविले जातायत हे संपादकांना माहीत असावे असे समजतो. मूळ प्रतिसाद उडविला जावा अशी अपेक्षा आहे.

In reply to by सर टोबी

पण परदेशात रिफ्युजी स्टेटसवर राहणारे विशिष्ट जमातीचे लोक आपल्या बायकोला सतत गर्भार ठेवुन सरकारी अनुदाने लाटत राहण्याचे प्रकार करीत असतात असे ऐकुन आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पण परदेशात भारतासारखी सरकारी अनुदाने वगैरे प्रकार नसतात असे परदेशात यशस्वी झालेले मुले (ज्यांचे पालक भारताच्या अशा धोरणांमुळे भारतामधे अस्यशस्वी असतात ) सांगत होते ब्वा !

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

छे बुवा. मनाई कसली ? आजिबात नाही. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून बघा तुमच्या समाज,धर्माबद्दल असली पिंक टाकली तर तुम्हाला कसे वाटेल. आणि त्यानंतर परीघ कमी करत करत आपला देश, राज्य, गाव, कुटुंब आणि स्वतः तुम्ही ह्यांच्यावर इतरांनी खखोदेजा डिस्क्लेमर देऊन तुम्ही टाकली आहे तश्याच पिंका टाकल्या तर काय वाटेल विचार करा. आणि मग तरीही चालत असेल तर अजून चार पिंका माराच.

In reply to by कॉमी

काॅमी लगेच “त्यां“च्या साठी धावून येतात. एकवेळ द्रौपदी ला साडी पोहोचवायला कृष्ण पोहोचनार नाही पण “त्यां”च्या वर काही टिका झाली की काॅमी १२० च्या स्पिड ने पोहोचनार.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एकवेळ द्रौपदी ला साडी पोहोचवायला कृष्ण पोहोचनार नाही
द्रौपदीला कृष्णाने खरोखर साड्या पुरवल्या होत्या का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

होय. कोणत्याही "ते" किंवा "हे" यांना विनाकारण टार्गेट केले जात असेल तर येणार मी. तुम्हाला काही प्रॉब्लेम ?

In reply to by निनाद

शहराचे दिवाळखोरी काढण्याचे प्रमुख कारण म्हणजे शहराच्या काऊन्सिलचे मिसमॅनेजमेंट आहे. मुस्लिम लोक किंवा त्यांची अपत्ये हे त्याचे कारण नाही. शहराचा मेयर हिंदू चमन लाल आहे. गो वोक गो ब्रोक ह्या न्यायाने इथे कारभार चालला आहे. ह्या शहराच्या पाठोपाठ ग्लासगो, नॉटिंगहॅम इत्यादी शहरांचा नंबर लागेल. एकूणच चांगली गोष्ट आहे, पुढच्याला ठेच मागचा शहाणा.

In reply to by साहना

गो वोक गो ब्रोक हे एक मिथ आहे. पक्क्या भांडवलशाही व्यक्तीने अश्या पोरकट मिथ वर विश्वास ठेवावा हे मजेशीर आहे. उलट गो वोक गेट रीच म्हणा.

In reply to by साहना

>>>शहराचे दिवाळखोरी काढण्याचे प्रमुख कारण म्हणजे शहराच्या काऊन्सिलचे मिसमॅनेजमेंट आहे. अच्छा. मला असे वाटले की मिसमॅनेजमेंट फक्त भारतातच असते. काही दिवसांपूर्वी असेच पाढे शिकवले जात होते मिपावर. कोण शिकवत होते ते आता लक्षात नाही. आणि ते एवढं महत्वाचं पण नाही. असो.

In reply to by अहिरावण

म्हणजे स्त्री आणि पुरुष कर्मचारी यांच्यातील वेतनातील असामानता विषयक खटला स्त्रियांच्या बाजूने लागला आणि त्यापोटी द्यावयाची रक्कम बरीच मोठी आहे. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाचा खर्च वाढत चालला आहे. एकूणच कर्मचारी आणि तंत्र पुरवठादार यांनी त्यांना येणं असलेल्या पैशावर पाणी सोडावं म्हणून दिवाळखोरी जाहीर करण्यात आली आहे असे दिसते.

आखाती देशात नोकरीच्या आमिषाने महिलांचा छळ; राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नांमुळे चार महिला मायदेशी परतल्या https://www.loksatta.com/pune/harassment-of-women-with-the-lure-of-jobs… कोण म्हणतो की महिलांचा छळ फक्त भारतात होतो,सगळीकडे होतो. फक्त ते मान्य करण्ञाची हिम्मत हवि. भारतात सगळ वाईट आणि आम्ही आलो तिथे सगळ भारी अशी दळभद्री मानसिकता असली की ... देव त्यांचे भले करो

खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये नवी दिल्लीचा सहभाग असल्याच्या जस्टिन ट्रुडो यांच्या निराधार आरोपांमुळे भारत आणि कॅनडा यांच्यात वाढता राजनैतिक तणाव तयार झाला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत भारतावर कोणताही पुरावा न देता निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला आहे. भारताने कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके याची हकालपट्टी केली आहे.

In reply to by निनाद

जर भारताने हत्या केली असेल तरीही काहीच चुकीचे नाही केलं. फक्तं होणाऱ्या परिणामांची तयारी ठेवली पाहिजे.

अझरबैजानने नागोर्नो-काराबाख प्रदेशात लष्करी कारवाई सुरू केली आहे. आर्मेनियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने काराबाख विरुद्ध अझरबैजानी आक्रमकतेचा निषेध केला आहे. अवांतरः आर्मेनियन नरसंहार क्रूर ऑट्टोमन साम्राज्याने, येथील प्राचीन आर्मेनियन संस्कृती नष्ट करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले होते. पहिल्या महायुद्धादरम्यान आर्मेनियन लोकांचा पद्धतशीरपणे नरसंहार करण्यात आला. टर्कीच्या सत्ताधारी नेतृत्वाखाली, सीरियन वाळवंटात आर्मेनियन निर्वासितांना अन्न आणि पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. सुमारे दहा लाख आर्मेनियन लोकांच्या सामूहिक हत्या केल्या गेल्या. महिला आणि मुलांचे सक्तीचे इस्लामीकरण केले गेले होते. टर्की ने आजवर झालेल्या नरसंहाराचा इन्कार केला आहे. पण खाजगीत टर्की लोकांना या कृत्याचा अभिमान असल्याचे दिसून येते. (माझ्याकडे पुरावे नाहीत पण भाषणे शोधा हे बोलले जाते.) प्राचीन आर्मेनिया हे एके काळी हिंदू राष्ट्र होते. उज्जैन येथून गेलेल्या शासकांनी याची स्थापना केली होती. येथे गणेश पूजन होत असे. सुमारे इ.स पूर्व तिसर्‍या शतका पर्यंत येथे किमान सात मोठी शहरे होती. व्यापार भरभराटीचा होता आणि जन जीवन आनंदी होते. हा भाग सध्याच्या टर्कीने गिळंकृत केलेल्या भागापैकी आहे. नंतर अर्मेनियामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला. पाकिस्तान हा जगातील एकमेव देश आहे जो आर्मेनियाला मान्यता देत नाही.

In reply to by निनाद

> पण खाजगीत टर्की लोकांना या कृत्याचा अभिमान असल्याचे दिसून येते. (माझ्याकडे पुरावे नाहीत पण भाषणे शोधा हे बोलले जाते.) हे सत्य आहे. -- अर्मेनिया प्रदेशांतील सर्वांत जुनी वस्तू म्हणजे "विशाप" आहे हा शब्द वृषभ ह्या संस्कृत शब्दाशी संबंधित आहे. वेदिक आणि पर्शियन लोकांत जे भांडण होते त्याचे प्रतिबिंब तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आर्मेनियन लोकांचा देव म्हणजे मित्र होता. शेवटी पारसी धर्म प्रचलित झाला तेंव्हा त्यांनी सर्व वेदिक गोष्टींना हराम ठरवले. मित्र हा पारसी देव झाला आणि तो वृषभ चा संहारक झाला (वृषभ म्हणजेच शिवाचा नंदी). https://pparihar.com/2016/06/27/the-temple-of-garni-in-armenia-the-vedi…

In reply to by निनाद

अवांतर: काही भारतीय हिंदू, "हे पहा, कंबोडियामध्ये जगातील सर्वात मोठे शिव मंदिर आहे, अशी शिल्पकला इतर कुठेही सापडणार नाही. एकेकाळी हिंदू संस्कृती जगभर पसरलेली होती. हिंदू संस्कृती किती महान आहे!" (इतर वेळा कंबोडिया, मंदिर, शिल्पकला इ ऐवजी इतर देश, वस्तू, ज्ञान असे काहीतरी) अशी विधाने करत असतात. जर हिंदू संस्कृती खरंच महान होती तर तिचा विस्तार व्हायला हवा / व्हायला हवा होता / किमान ती एका विशिष्ट काळापूर्वी होती तितकी शिल्लक तरी राहायला हवी होती. ती शतकानुशतके आकुंचन का पावत आहे? हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहता येईल असा भूभाग वेगाने आकुंचन का पावत आहे? लोक झपाट्याने हिंदू धर्माचा त्याग का करत आहेत? हिंदू धर्माचा त्याग करण्यासाठी त्या लोकांवर कुणी जबरदस्ती करत असेल तर / कुणी प्रलोभने दाखवत असेल तर हिंदूंचे नेते काय करत होते / काय करत आहेत? --- हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

In reply to by वामन देशमुख

सहमत, जातीआधारीत समाज व्यवस्था, समुद्रबंदू, सिंधूबंदी अश्या बेड्या, बूळचट विचारसरणी, खायचे वांदे असूनही स्वतला विश्वगुरू समजणे, समोरचा मुस्लिम असेल तर मान देणे पण इतर जातीचा हिंदू असेल तर त्याला तूच्छ वागवणे, बायकांना सती प्रथेत जिवंत जाळणे, त्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ नये म्हणून ढोल बडवणे ह्यातले नेमके काय महान आहे कळत नाहीये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

केवळ एखादा शब्द तीन वेळा उच्चारून घरातील स्त्रीला थेट रस्त्यावर काढणे, तिच्याशी पुन्हा लग्न करायचे तर दुसऱ्या पुरुषाशी तिला तिला संभोग करायला लावणे, आपले म्हणणे न मानणाऱ्यांचा थेट शिरच्छेद करणे यातही काही फार महान असे काही नाही. प्रश्न हा आहे, जे स्वतःच्या धर्म-संस्कृती-परंपरा इ बाबींना महान मानतात, त्यांचे नेते त्या बाबी वाढवण्याची / किमान टिकवण्याची जबाबदारी का घेत नाहीत. जाऊ द्या, हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.

In reply to by वामन देशमुख

केवळ एखादा शब्द तीन वेळा उच्चारून घरातील स्त्रीला थेट रस्त्यावर काढणे, तिच्याशी पुन्हा लग्न करायचे तर दुसऱ्या पुरुषाशी तिला तिला संभोग करायला लावणे, आपले म्हणणे न मानणाऱ्यांचा थेट शिरच्छेद करणे यातही काही फार महान असे काही नाही.
बरोबर. ह्यात काहीही महान नाही, उलट घृणास्पद आहे. पण ही whataboutry झाली की हो सरळ सरळ.

In reply to by वामन देशमुख

कोणतीही संस्क्रुती जेंव्हा प्रगत होते. शिक्षीत होते.बौद्धीक दृस्ष्ट्या प्रगत होते . त्या वेळेस त्या संस्कृतीतील लोकांना आरामाची सौख्याची सवय लागते. सुरक्षीत जगण्याची सवय लागते. त्यांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही. परिणामी संहारक शारीरीक युद्धाची इच्छा / क्षमता कमी होत जाते. त्यांची युद्ध करण्याची सवय मोडते. ज्याना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो अशा अशिक्षीत , अस्थिर युद्धाची सवय असते. किंवा तेच त्यांच्या आस्तित्वाचा आधार असते. असे लोक आक्रमक असतात. क्षमाशील नसतात. आणि आक्रमक / युद्धखोर अशिक्षीत लोक प्रगत संस्कृतीला सहज जिंकून घेऊ शकतात. हे अनेक वेळा झालेले आहे. त्यामुळे महान संस्कृत्या लोप पावल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

तुमचा हाच सिद्धांत सध्याच्या परिस्थितीत पडताळून बघितला तर संस्कृतीवर आक्रमण करणारे अशिक्षित कोणी बाहेरचे नाहीत. आपलेच आहेत.

In reply to by वामन देशमुख

हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहता येईल असा भूभाग वेगाने आकुंचन का पावत आहे? अति सहिष्णुता अति शांतता अतिशोक्ती म्हणून

In reply to by निनाद

अझरबैजानच्या लष्करी आक्रमणाचा परिणाम म्हणून, नागोर्नो-काराबाखमध्ये किमान २०० लोक मारले गेले आणि ४०० हून अधिक जखमी झाले त्यापैकी १३ मुले आहेत. आर्टसखमध्ये हजारो लोक बेपत्ता आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अझरबैजानी राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्याशी दूरध्वनी संभाषणात, नागोर्नो-काराबाखच्या रहिवाशांना सुरक्षिततेची हमी देण्याचे आवाहन केले. मॅक्रॉन यांनी काल बळ वापरण्याच्या अझरबैजानच्या निर्णयाची निंदा केली.

In reply to by अहिरावण

ताळेबंद मांडल्यानंतर फक्त एकच तर गोष्ट हाती लागते - हिंदू अस्मिता. ती जागृत ठेवायची असेल तर अशा ओकाऱ्या आवश्यक ठरतात.

इराणच्या संसदेने सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या अनिवार्य पोशाखाचे उल्लंघन करणाऱ्या महिलांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने एक वादग्रस्त हिजाब विधेयक मंजूर केले आहे. हिजाबच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या महसा अमिनी या २२ वर्षीय महिलेचा गेल्या वर्षी पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या विधेयकात हिजाब कायद्यांचे उल्लंघन करणार्‍या किंवा हिजाबच्या नियमांवर टीका करणार्‍या व्यक्तींसाठी शिक्षेची आणि दंडांची तरतूद आहे. यात ऑनलाइन असो ऑफलाइन, सोशल मीडियावर किंवा इतरत्र हिजाबची खिल्ली उडवणे देखील आले आहे. एप्रिल १९७९ मध्ये इराण अधिकृतपणे इस्लामिक राज्य बनले. राज्य अस्तित्त्वात आल्यावर इस्लामिक कायद्याच्या गैरवर्तनाच्या आरोपावरून १९८८ मध्ये हजारो राजकीय कैद्यांना फाशी देण्यात आली होती. आजही इराणची शिया इस्लामिक राजवट, महिलांचा आवाज दाबण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे असे दिसून येते आहे. भारतात महिलांसाठी आरक्षणाचा कायदा मंजूर झाला त्याच वेळी इराण मध्ये असे वादग्रस्त हिजाब कायदे मंजूर केले जात आहेत हा केव्हढा विरोधाभास जगात दिसून येतो आहे.

विनिपेग कॅनडा मध्ये गँगस्टर सुखा उर्फ ​​सुखदूल सिंगची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. एनआयएने जाहीर केलेल्या ४३ वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत सुखाचे नाव होते. एनआयएच्या वॉन्टेड यादीत नाव आल्या नंतर एका दिवसात ही हत्या झाली आहे. सुखा २०१७ मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतातून पळून गेला होता. तो मूळचा पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील होता. त्याचा संबंध दविंदर बंबीहा टोळीशी होता.

In reply to by निनाद

शोले मधला एक डायलॉग आठवला.... लोहा लोहे को काटता है... लॉरेन्स बिष्णोई गँग ने त्याच्या हत्येची जबाबदारी घेतलीये---त्या लॉरेन्स गँग ला कोणी मदत पाठवली असेल का?....असो...औषध कोणते का असेना...खोकला बरा होण्याशी मतलब...काय?

In reply to by वडगावकर

निज्जर ह्यांचा खून खलिस्तानी मंडळींनीच केला आहे. भारताचा किंवा भारतीय यंत्रणेचा कुठलाही संबंध ह्या हत्येशी थेट किंवा आडमार्गाने नाही. इतर खलिस्तानी मंडळींच्या ज्या हत्या झाल्या त्यांत कदाचित असू शकतो पण इथे नाही. निज्जर विविध गुन्ह्यात भारतात गुंतले होते आणि त्यामुळे शिक्षेच्या भयाने कानडा मध्ये खोटा पासपोर्ट लावून पळून गेले. तिथे त्यांना पकडले गेले पण त्यानंतर त्यांनी एक खोटे लग्न करून कानडा मध्ये नागरिक बनण्याचा प्रयत्न केला. तिथे सुद्धा त्यांना पकडण्यात आले. शेवटी त्यांची ओळख पन्नू ह्या खलिस्तानी आणि अत्यंत हिंसक वकीलांशी झाली. त्यांनी आपले राजकीय वजन वापरून त्याला कनेडिअन नागरिकत्व दिले. हि व्यक्ती कधी नागरिक झाली हे खुद्ध कानडिअन सरकारला नीट ठाऊक नाही. निज्जर ह्याचा चेहरा वापरून सर्वत्र खलिस्तान जनमत कौल २०२२ मध्ये घेण्यात आला. हजारो अमेरिकन आणि कानडिअन सरदारांनी ह्या मूर्खपणात भाग घेतला. ह्याच वेळी भारतीय दूतावासातील एका व्यक्तीने निज्जर ह्यांच्याशी संपर्क साधला. ह्या संपर्काची पार्शवभूमी थोडी जुनी आहे. २०१८ पासून मोदी सरकार ब्रिटिश शीख समाजसेवकाच्या माध्यमातून कॅनडामधील कडव्या खलिस्तानी लोकांशी शांती वार्ता करण्याचा प्रयत्न करत होते. वानवा अशी आहे कि निज्जर ह्या शांतीवार्ते ला उत्सुक होते तर इतर कडवी मंडळी नव्हती. सेहवाटी त्रुदो सरकारने कडव्या लोकांची बाजू घेऊन ब्रिटिश समाजसेवकाला देशांत येण्यापासून मज्जाव केला. पण हि पार्श्वभूमी वापरून भारतीय दूतावासातील काही लोकांनी निज्जर ह्यांच्याशी थोडा संबंध ठेवला. पन्नू आणि इतर काही खलिस्तानी मूर्खांनी "जनमत कौल" घेतला. ह्या कौलांत सर्व मतदारांची माहिती गोळा करावी जेणेकरून ह्या लोकांशी भविष्यांत संपर्क साधता येईल हि मागणी निज्जर ह्यांची होती. त्या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे नाव, गाव इत्यादी गोळा केले गेले. असे सांगितले जाते कि पैसे आणि टोरांटो मध्ये एक फ्लॅट ह्या लाचेच्या बदल्यांत खलिस्तानी यंत्रणेतील कुणीतरी हे संपूर्ण लिस्ट भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याला दिले. कदाचित हि व्यक्ती निज्जर स्वतः किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीपैकी एक कुणी तरी होती. हे लिस्ट वापरून भारतीय यंत्रणेने खलिस्तानी समर्थकांतील काही लोक हेरून त्यांना पैसे देऊन आपले खबरी बनवले होते. ह्याची माहित कॅनेडियन गुप्तचर यंत्रणेला होती. निज्जर ह्यांचा खून शेवटी खलिस्तानी लोकांनीच केला आहे. आणि ते गुप्त पणे भारतीय दूतावासाला माहिती पुरवत होते ह्या शंकेवरून तो केला गेला आहे. त्रुदो ह्यांनी जो तथाकथित आरोप केला आहे त्यातील "लिंक" ते हेच आहे आणि ह्याची इत्यंभूत माहिती UK/US ला आहे त्यामुळेच ह्या देशांनी ह्या विषयावर बोलणे पसंद नाही केले. UK मध्ये तर Sunak ह्यांना SFJ (सिखस फॉर जस्टीस) वर आधीपासूनच रोष आहे. त्रुदो ह्या प्रकरणात आपली अब्रू घालवून बसतील ह्यांत शंकाच नाही.

In reply to by साहना

ही तुझी थियरी झाली साहने, आता आमची थियरी. निज्जर आणि ईतर दोन खलिस्तानी लोकांना भारतिय गुप्तचरांनीच संपवले असावे. केवळ निज्जर खलिस्तानी म्हणून नव्हे तर तो भारत विरोधी कारवाया करत असल्याची ठाम माहिती 'रॉ'ला मिळाली असावी. जस्टिन ट्रुडो, त्याना मूर्ख म्हणा किंवा आणी काही म्हणा- ते त्यांच्या संसदेत भारताचे नाव सरळ घेतात ह्याचा अर्थ कॅनडियन यंत्रणांच्या हाती भारताचा सहभाग असल्याचा बर्यापैकी पुरावा हाती लागला आहे. १००% खात्री केल्याशिवाय ट्रुडो असले विधान करणार नाहीत. पुरावे दिले नाहीत तर आपल्यावर राजिनामा द्ययची वेळ येईल आणि देशाचे नाव खराब होईल हे न कळण्याएवढे ट्रुडो मूर्ख नसावेत . आता ट्रुडोनी असले विधान का करावे? जूनमध्ये ह्या निज्जरची हत्या झाली आणि लगेच त्यात भारताचा सहभाग असल्याचा संशय तेथील अनेक शिख लोकांनी घेतला.(यु-ट्युबवर जून-जुलैमधील व्हिडियो पहा). निज्जरच्या अंत्ययात्रेची गर्दी/दृश्ये पाहुन ट्रुडोंचे टेन्शन वाढले नसते तर नवल(https://www.youtube.com/watch?v=HGFX9mBk9kw). जगमीत सिंग हा एन डी. पी पक्षाचा तेथील राजकारणी आहे. त्याने व शीख समुदायातील अनेकांनी ट्रुडो ह्यांच्यावर दबाव आणायला सुरूवात केली.ट्रुडो ह्यांनी भारताविरुद्ध बोलावे आणि ह्या प्रकरणावर बोलावे म्हणून दबाव आणला गेला. हत्येचे धागे भारतापर्यंत पोहचत आहेत ह्याची खात्री झाल्यावर जी-२० परिषदेत ट्रडो ह्यांनी ह्यावर भारताकडे तसे बोलुन दाखवले पण भारतिय यंत्रणांनी अजिबात प्रतिसाद दिला आहे. म्हणून मग नाईलाजने ट्रुडो त्यांच्या संसदेत बोलते झाले. शेवटी त्यांनाही खुर्ची वाचवायची आहे.! फक्त खलिस्तानीच कडवे आहेत ,बाकीचे शीख तसे नाहीत हा भ्रम आहे. गेल्या ४० वर्षात अनेक शीखांशी बोलल्यावर एक कळते की ह्यांचा खलिस्तानी लोकांना अप्रत्यक्ष पाठिंबा असतो. शीख समुदाय कॅनडात प्रभावशाली आहे. म्हणूनच त्रुडो ह्यांचावर दबाव आला.तसे नसते तर ही बोलणी पडद्याआडच झाली असती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फक्त खलिस्तानीच कडवे आहेत ,बाकीचे शीख तसे नाहीत हा भ्रम आहे. गेल्या ४० वर्षात अनेक शीखांशी बोलल्यावर एक कळते की ह्यांचा खलिस्तानी लोकांना अप्रत्यक्ष पाठिंबा असतो. यावर माझाही विश्वास गेल्या काही वर्षात पक्का झाला आहे एक अगदी साधे अनुभवलेले उदाहरण म्हणजे "शेतकरी संघर्ष" या नावाखाली ऑस्ट्रेलयातील दिवाळी सार्वजनिक समारंभामध्ये जे विरोधी फलक घेऊन होते ते बहुतांशी शीख होते ( प्रत्यक्ष तिथे खलिस्तानी पिवळे झेंडे नसले तरी ) याशिवाय हॅरिस पार्क सिडनी येथे हिंदूंवर हल्ला / मेलबर्न येथे १९८४ रेफेरंडम नावाखाली भर चौकात इतरांवर हल्ला .. देवळांची नास धूस हे सगळे होत असताना "खलिस्तानला समर्थन ना देणारे " शीख कुठे दिले नाहीत? भारताची तलवार / देशभक्त कौंम म्हणून खांदयावर बसवले तर कानात ....... लागले एकवेळ ओवेसी परवडला पण हे "पिवळे" अस्तनीतले साप झालेत

In reply to by चौकस२१२

शीख आणि गुरुद्वारा ह्यांच्याशी माझा जवळचा संबंध आहे. अनेक खलिस्तानी आणि खलिस्तान विरोधी दोन्ही शीख लोकांशी संबंध आहे. अमृतधारी (म्हणजे फेटा, कृपाण, शाकाहार ठेवणाऱ्या) लोक बहुतेक करून खलिस्तान समर्थक आहेत असे दिसून येते. काही बाही फलक घेऊन फिरणे, गाडयांवर चित्रे लावणे इत्यादी कामे हे करतात. ज्या लोकांनी धर्म, पगडी सोडून दिली आहे असे लोक विशेषतः खलिस्तानी असत नाही उदाहरण म्हणजे आपले कंवल रेखी सारखे लोक. पण जास्त खोल विचार केल्यानंतर जाणवते कि धर्मांधता आणि एक प्रकारचा मूर्खपणा ह्या दोन्ही गोष्टी इथे कारणीभूत आहेत. उदा माझ्या ओळखीच्या लोकांनी दिल्लीतील शेतकरी मोर्च्यात भाग घेतला होता. मी विचारले का तर ती सांगते कि पंचायतीने निर्णय घेतला कि प्रत्येक परिवारातील किमान एक सदस्य दिल्लीत गेला पाहिजे. नाहीतर एकूण १०,००० रुपये दंड होईल. मग मी विचारले कि मोर्चा कश्यासाठी आहे ? तिला काहीही विशेष माहिती नव्हती. पंचायतीने निर्णय का घेतला ? तर स्थानिक गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने निर्णय घेतला. त्यांनी का घेतला तर मोठी जी कमिटी आहे त्यांनी तसा निर्णय घेतला. शेवटी संपूर्ण धार्मिक शीख समाज हा ह्या गुरुद्वारा नावाच्या संस्थेच्या दावणीला बांधलेला आहे आणि चर्च ला सुद्धा लाजवेल अश्या केंद्रीकरणाने चालतो. ह्यांत कुणी रिफॉर्म वगैरे आणण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी हिंसा करून त्याला अद्दल शिकवली जाते. चतुर शीख लोकांना हे सर्व समजते नि हि मंडळी गुपचूप गुरुद्वारा संस्थेपासून चार हात लांब राहतात आणि फक्त कधी कधी सेवा करण्यात धन्यता मानतात. मागील काही वर्षांत धर्मांधता आणखीन वाढली आहे. दिवाळीचे नाव बदलून "बंदी छोड दिवस", हरी म्हणजे "हिरवा रंग". महिलांनी सुद्धा पगडी घालणे, होळीचे नाव बदलणे, असे विविध प्रकार चालवले जात आहेत. संपूर्ण धार्मिक शीख समाज ह्यांत गुंतला आहे. त्यामुळे मोदी ह्यांनी खलिस्तान विषयावर निव्वळ सरकारी हिंसा न करता सामोपचाराने त्यांच्याशी आणि प्रसंगी माघार घेऊन मामला शांत करण्याचा प्रयत्न केला ती योग्य गोष्ट आहे. हिंदू धर्मांत संत परंपरा, किंवा कुठलाही माणूस निव्वळ आपल्या उच्च वर्तणुकीने संतपदाला पोचून प्रसंगी प्रचलित चालीरीतींना बदलू शकतो तश्या प्रकारची पद्धती जो पर्यंत शीख धर्मात येत नाही तो पर्यंत हे असेच चालणार. टीप : मी माझ्या खलिस्तानी मित्रांना नेहमीच सांगते कि खलिस्तान ह्या नवीन राष्ट्राला माझा अगदी १००% पाठिंबा आहे. फक्त अट हीच कि महाराजा रणजित सिंग ह्यांच्या सिख राज्याची जी लाहोर हि राजधानी होती तीच ह्या खलिस्तान ची राजधानी असली पाहिजे. आणि ती मागणी सुद्धा करण्याची हिम्मत नाही त्या माणसाने नावातील "सिंग" काढू त्या जागी "बकरी" लावावे आणि खलिस्तान काय तर साधा गाव सुद्धा मागण्याची औकात नाही हे मान्य करावे.

In reply to by साहना

शेवटी संपूर्ण धार्मिक शीख समाज हा ह्या गुरुद्वारा नावाच्या संस्थेच्या दावणीला बांधलेला आहे आणि चर्च ला सुद्धा लाजवेल अश्या केंद्रीकरणाने चालतो. ह्यांत कुणी रिफॉर्म वगैरे आणण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी हिंसा करून त्याला अद्दल शिकवली जाते. दिवाळीचे नाव बदलून "बंदी छोड दिवस", हरमंदिर साहेब मधील "मंदिर" हा शब्द पण मान्य नाही म्हणे आज काल ! हे ऐकले आहे .... आश्च्र्य याचे वाटते कि त्यामानाने कष्टाळू आणि हुशार ( सरदार विनोद सोडून द्या ) समजात एवदही धर्मांधता कशी काय ? ( अशी दःर्मांधात तर मग शिकलेलंय उद्योगी दाऊदी बोहरा समाजात हि आहे म्हणा. ) त्यात धर्मावर अन्याय झाला असे वाटले तर हिसेनें बदला घायचा हे प्रमाण आहेच मग ते इंग्रजांच्या काळात असो किंवा ऑपरेशन ब्लु स्टार नंतर असो, सामोपचाराने जर सुटले तर बरे आहे निदान भारतात तरी पाठिंबा नामशेष झाला तर बरे भारताबाहेर चिथावणी चालूच आहे या सगळ्यात पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन देशहितासाठी सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला तर बरे ... आणि पाश्चिमात्य देशातील गुलाबी चष्मा लावलेलया डावखुर्यांना हे विष एकदिवस त्यांचाच घात करेल हे जेवहा केलेले तेव्हा उशीर झालेला असेल कारवा ऑफ रेफुजी एक दिवस घरचा ताबा घेतील असो खलिस्तान ला पाठिंबा ( kanaddda मध्ये जरा जागा देऊन तिथेच स्थापन करा त्रिदेव साहेबांना नम्र विनंती आणि जायचं त्याला पाठींबा आहे त्यांनी कायमचे तिकडेच जावे, जसे जगभरातील ज्यू इस्राएल ला जातात तसे ! हाय काय नि नाय काय )

In reply to by चौकस२१२

पाश्चिमात्य देशातील गुलाबी चष्मा लावलेलया डावखुर्यांना हे विष एकदिवस त्यांचाच घात करेल
ट्रुडोवर कॅनडामधील अनेक शीख लोकांनी दबाव टाकला असणार १००%. म्हणूनच ते तसे संसदेत बोलत होते. ह्या निज्जरचा ईतिहास ट्रुडोनाही ठाउक असणार. पण त्याचा उल्लेख ते किंवा त्यांचे परराष्ट्रमंत्री चुकुनही करत नाहीत कारण तसा उल्ल्लेख केला तर शीख समाज आणखी पेटेल ह्याची त्यांना भीती आहे. तात्पर्य, निज्जरबद्दल शीख समाजाची मोठ्या प्रमाणावर सहानुभुती असल्याशिवाय त्रुडो भारताचे नाव घेणार नाहीत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब यांचेशी बऱयापैकी सहमत त्रुदो जरी एवढा येडे नसले तरी ज्याला व्हाईट गिल्ट + मताचे राजकारण यामुळे तो असे करीत असावा राजीव गांधी अथवा. ते काही निश्चित मूर्ख नवहते पण शाह हबानो प्रकरणात चुकीचा निर्णय घेऊन बसले ना साहनाजी आपली हि थेअरी रोचक आहे पण त्या ला काही दुवे? कोणती मान्यवर शोधपत्रकारिता?

In reply to by चौकस२१२

भारतीय दूतावासाने खलिस्तानी सूत्रांना पैसे चारून लोकमत कौलांच्या मतदारांची यादी मिळवली हे अत्यंत खात्रीशीर पद्धतीने मला माहिती आहे. हि माहिती येत्या काही दिवसांत १००% उघड होईलच. शंकाच नाही. वेट अँड वोच . बाकी सर्व माझी थेअरी.

कर्नाटक मध्ये गणेशमूर्तीची पूजा केल्याप्रकरणी मुख्याध्यापिकेने सातव्या वर्गातील विद्यार्थ्याचा हात तोडल्याची घटना समोर आली आहे! गणेशमूर्तीची पूजा केल्याबद्दल ही शिक्षा केली गेली. मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीला एवढ्या जोरात मारहाण केली की तिच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले.

आपल्या बोलण्याने अल्पवयीन मुलीला भुरळ घातली आणि पळवून नेले. पोलिसांनी सांगितले की ते बहुदा प. बंगाल मध्ये गेले आहेत. या आरोपी गुन्हेगाराने तिला हिंदू धर्माविरुद्ध वळवायला सुरुवात केली. तो तिला तिच्या घरातून हिंदू देवतांची छायाचित्रे काढून टाकण्यास सांगायचा आणि नंतर हिजाब घालून नमाज अदा करण्यासाठी तिच्यावर दबाव आणायचा. जर तिने इस्लामचे पालन केले तरच तो तिच्याशी लग्न करेल असे त्याने सांगितले. तसेच जो कोणी मार्गात येईल त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

भारताची तलवार / देशभक्त कौंम म्हणून खांदयावर बसवले तर कानात ....... लागले एकवेळ ओवेसी परवडला पण हे "पिवळे" अस्तनीतले साप झालेत चोकोभौ, फार मोठे विधान केलेत. खरे काय खोटे काय या साठी खुप पाठीमागे जावे लागेल.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी... विधान छोटे कि मोठे मला माहित नाही मी एक सर्वसामान्यानाच्या मनातील बोललो , ओवेसींचा उल्लेख हा उपरोधाने होता हे आपण जाणले असेलच ! शिखांबद्दल आदर हा सर्वसाधारण हिंदू कुटुंबात वाढलेल्यांना लहानपणापासून शिकवलला गेलाय पण गेली काही वर्षे आणि विशेषता भारताबाहेरील काही शिखानचे वर्तन पाहता हा आदर लोप पावत आहे ... हायला भारताबाहेर भारतीय मुस्लिम अनेक राहतात ते पण कधी असले भारत विरुद्ध मोर्चे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला काढताना दिसत नाहीत ( निदान ऑस्ट्रेल्यात तरी मला जाणवले नाही ) आणि उलट ज्यांना भाऊ मानले तेच उलटून असे वार करता म्हणून जास्त दुःख त्याला वरती "पंजाबीयात" वैगरे साखर लावली जाते .

In reply to by चौकस२१२

शीख लोक बिलंदर,वस्ताद म्हणूनच प्रसिद्ध होते व आहेत. शीख लोक म्हणजे ओतप्रोत देशप्रेम, त्याग्,शौर्य वगैरे ईतर भारतियांना शिकवले जाते. ह्यांचे अनेक लोक कसे सैन्यात असतात व देशासाठी प्राण देतात वगैरे वगैरे. सामान्य शीख माणसाला खलिस्तानविषयी विचारा-"वो सब राजनीती है|""राजकारणामुळे हे सर्व झाले आहे" अशी उडवाउडवीची उत्तरे मिळतात पण सरळ निषेध कधी करताना दिसणार नाहीत. खोटे पासपोर्ट्/व्हिसा बनवुन अमेरिकेत्/ब्रिटनला कसे जायचे ते ह्यांना विचारा.आणि मग तिकडे जाउन स्थायिक झाले की ह्यांना खलिस्तान आठवते.गोर्या देशांचे/कातडीचे ह्या लोकांना खूप आकर्षण असते.

जागतिक बँकेने पाकिस्तानला सावध करतांना सांगीतले आहे की, त्यांचे सध्याचे आर्थिक मॉडेल पूर्णपणे अपयशी ठरले असून लवकरात लवकर आर्थिक सुधारणा करणे गरजेचे आहे. पाकिस्तानची एका वर्षात जवळपास ६% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली गेली असून, आता एकूण ३९.४% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. महागाईचा दर ऑगस्ट महिन्यात २७.४% वर गेलेला सांगण्यात येते. बातमी: https://www.ndtv.com/world-news/world-bank-cautions-pakistan-as-nearly-…