✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शाहीर ते शाहीर !

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sat, 09/15/2007 - 00:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47539 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sat, 09/15/2007 - 00:41 नवीन

लय भारी!

बिरुटेसाहेब, लय भारी अन अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे! मिसळपावची सुरवातच आपल्या शाहिरीने झाली ही भाग्याचे गोष्ट आहे! :) यापूर्वी उपक्रमावर आपला लावणीवरचा असाच अभ्यासपूर्ण लेख वाचला होता. इथे शाहिरांवरचा आणि पोवाड्यांवरचा वाचावयास मिळाला! महाराष्ट्रातील लोककलांचा आपला अभ्यास थक्क करणारा आहे.. जियो... तात्या.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Sat, 09/15/2007 - 02:14 नवीन

वा!

वा सर, आपले या क्षेत्रातले ज्ञान अफाट आहे. छानच लेख. अभ्यासपूर्ण नि संदर्भांसहीत. मिसळपावाच्या सुरुवातीलाच इतके छान लेख देवोन आपण एक शुभारंभच केला आहे असे वाटते. पोवाडे तर,समाजातून गायबच झाले आहेत, पण त्यांची इतकी अभ्यासपुर्ण आठवण ठेवणारेही आहेत हे वाचून छान वाटते आहे. असेच येवू देत. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 09/15/2007 - 02:45 नवीन

सुरेख लेख

तुमच्या लावणीविषयीच्या लेखासारखाच हासुद्धा आवडला. यूट्यूबवरती, किंवा असेच कुठेतरी, तुम्हाला आवडलेल्या शाहिरी पोवाड्याचे उदाहरण असल्यास तुम्ही दुवा देऊ शकल काय?
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 09/15/2007 - 07:27 नवीन

हेच म्हणतो

सर एकदम झकास लेख. आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/15/2007 - 08:47 नवीन

धन्यवाद !

तात्या,गुंडॉपंत,सहज,धनंजय,आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.'मिसळपाव'वर पहिला लेख आपला असावा या गडबडीत लेख जरा घाईतच लिहिला.त्यामुळे चुका राहिल्या आहेत. धनंजयराव, युट्यूबवर मला शाहिराची शोधाशोध करणे जरा कठीण आहे.अरे,या लेखासाठी मला शाहिराचा फोटो शोधता आला नाही ? मलाच कोणी तरी हातात डफ घेतलेला शाहिराचे चित्र व्य. नि. ने दिल्यास पुढील लेखनासाठी उपयोग होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
ज
जगन्नाथ Sat, 09/15/2007 - 11:52 नवीन

धन्यवाद !

'मिसळपाव'वर पहिला लेख आपला असावा या गडबडीत लेख जरा घाईतच लिहिला.त्यामुळे चुका राहिल्या आहेत. हा हा हा! मग सांगायचं ना सरळ, गप बसा म्हणून . . . लेख न लिहिणं अाम्हाला फार चांगलं जमतं, मोठ्यामोठ्या डिग्र्या घालवल्या अाहेत! वाचून एक किडा डोक्यात अाला . . . की अापल्या शास्त्रीय संगीतात वीररस जवळपास नाहीच. सगळं अापलं झननन पायल बाजे . . . हे कसं काय झालं काय कळत नाही . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/15/2007 - 12:44 नवीन

संगीत आणि वीररस ;)

जगन्नाथ सेठ, कुठे होता इतक्या दिवस ! शास्त्रीय संगीताचं आपल्याला बॊ काही कळत नाही. शास्त्रीय संगीतात वीररस जवळपास नाहीच याचे उत्तर त्या विषयातील तज्ञ देतील. पण ज्याला संगीताचं ज्ञान आहे आणि ज्याच्यात भरपूर वीररस आहे,असा माणूस आम्हाला माहित आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगन्नाथ
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/17/2007 - 11:18 नवीन

वीर रस

शास्त्रीय संगीतात वीर रस नाही ? अण्णांचे (किंवा रामभाऊंचे) "तू है महम्मदसा दरबार" हे ऐका.. शब्दांवरून भक्तिरसातले वाटेल. पण एका राजाच्या दरबारात पेश केलेले गाणे आहे, हे आठवा. आणि फक्त सूर ऐका. वीर रस नाही वाटला, तर कळवा.. पुढे बोलू.. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगन्नाथ
व
विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 11:23 नवीन

क्या बात है!

अण्णांचे (किंवा रामभाऊंचे) "तू है महम्मदसा दरबार" हे ऐका.. शब्दांवरून भक्तिरसातले वाटेल. पण एका राजाच्या दरबारात पेश केलेले गाणे आहे, हे आठवा. आणि फक्त सूर ऐका. वीर रस नाही वाटला, तर कळवा.. पुढे बोलू.. क्या बात है! सर्कीटशी सहमत आहे.. बाबुजींचं अडाण्यातलं 'माता न तू वैरिणी' पण आठवा! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
च
चित्रा Sat, 09/15/2007 - 09:28 नवीन

आवडला.

>>लय भारी अन अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे! मिसळपावची सुरवातच आपल्या शाहिरीने झाली ही भाग्याचे गोष्ट आहे! :) सहमत!
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 09/15/2007 - 11:56 नवीन

सुरेख

सुरेख लेख. पोवाडा या शब्दाची व्युत्पत्ती आवडली. नंदन (http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sat, 09/15/2007 - 12:11 नवीन

असेच

सुंदर लेख. आवडला.
  • Log in or register to post comments
प
पंकज Sat, 09/15/2007 - 18:54 नवीन

http://www.powade.com/

http://www.powade.com/ इथे शाहिरांचे फोटो आणि पोवाडे मीळतील.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/15/2007 - 20:06 नवीन

आभारी !

पंकज, दुव्याबद्दल आभारी. अरे पण, डफावर थाप मारून आवेशात उभ्या असलेल्या शाहीराचा फोटो पाहिजे रे ! नाही मिळाला तर यापेक्षा उत्तम फोटो नाही असे समजून आपण दिलेल्या दुव्यांवरील फोटोंचा वापर करेन. पुन्हा एकदा थँक्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंकज
ध
धोंडोपंत Sun, 09/16/2007 - 11:02 नवीन

वा वा

वा वा प्राध्यापक साहेब, लेख आवडला. सुंदर विवेचन. आपला, (तृप्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
न
नाना फडणवीस Sun, 09/16/2007 - 12:02 नवीन

छान लेख

छान लेख. नाना फडणवीस
  • Log in or register to post comments
च
चिपलूनचा बाल्या Sun, 09/16/2007 - 12:23 नवीन

मास्तरांनु

मास्तरांनु, आमच्या म्होप बाल्या लोकानी वाचल. रामा, नारायन, गुनाजी, मामा, परब्या,जगल्या सगल्यांना लइ आवडल. यश्वदा आनि वसुंधरेला बी ऐकवल. चिपलूनला याल तव्हा सगल्यांनला भेटुन जावा. बाल्या
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 14:12 नवीन

चिपलुनच्या बाल्या रे,

>>रामा, नारायन, गुनाजी, मामा, परब्या,जगल्या सगल्यांना लइ आवडल. यश्वदा आनि वसुंधरेला बी ऐकवल. यातली मामा, परब्या आणि यश्वदा ही नांवं खूप आपलिशी वाटली! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिपलूनचा बाल्या
द
दशानन Sat, 04/04/2009 - 14:33 नवीन

येवढा

येवढा चांगला लेख कसा काय नजरेतून राहिला. सर एकदम मस्त लेख ! आवडला ! >>"वीररसाशिवाय पवाड्यांची बहार नाही क्या बात है ! कुणाकडे आहेत एमपीथ्री पोवाडे :? अथवा मला लिंक द्या. लावण्यापण चालतील ! Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sun, 08/05/2012 - 12:01 नवीन

_/\_ तुमचा कि बोर्ड तुम्हाला

_/\_ तुमचा कि बोर्ड तुम्हाला लवकरात लवकर सापडो ;)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 08/05/2012 - 22:55 नवीन

उत्तम आणि माहितीपूर्ण

उत्तम आणि माहितीपूर्ण लिखाण. बिरुटे सर, लिहित चला.
  • Log in or register to post comments
ड
डीप डाईव्हर Sat, 09/19/2020 - 14:34 नवीन

अरेरे, फक्त चार दिवस आधी जर हा छान धागा

अरेरे, फक्त चार दिवस आधी जर हा छान धागा सापडला असता तर मिपावरील या पहिल्या धाग्याला १४ व्या जन्मदिवसाच्या शुभेच्छाही देता आल्या असत्या. दिलीप बिरुटे सर, माहितीपूर्ण लेख आवडला 👍 धाग्याला बिलेटेड हॅपी बर्थडे अशा चार दिवस उशिराने शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 09/19/2020 - 15:04 नवीन

साहित्यवीर, नमस्कार घ्यावा.

साहित्यवीर, नमस्कार घ्यावा. आणि लेखणी म्यान करू नका.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/30/2023 - 00:15 नवीन

मिसळपावरील हा अगदी पहिला लेख 15 Sep2007( प्रा.डॉ. बिरुटे यांचा)

प्रा. डॉ. दिलीप बिरुटे सरांचा हा मिपावरील आद्यलेख आज योगायोगाने सापडला. वाचून धन्य झालो. बिरुटे सर आणि मिपाचे आद्य संस्थापक 'विसोबा खेचर' (तात्या अभ्यंकर) तसेच नंतरच्या काळात अनेक वर्षांपासून निष्काम भावनेने, सातत्याने मिपाचे जतन करणारे नीलकांत आणि प्रशांत यांना कोटि कोटि प्रणाम. मिपा-रोप लाविलें जाली । गगनावेरी वेलु गेली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा