Skip to main content

क्लिक : कथा संग्रह प्रकाशन

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 29/08/2023 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो मला आनंद होत आहे. माझ्या कथांचा संग्रह हेडविग मिडीया या प्रकाशनसंस्थेतर्फे या ३ सप्टेबरला प्रकाशित होत आहे. 1 क्लिक करून फोटोत साठवलेले क्षण आपण पुन्हा पहातो तेंव्हा आपण ते नुसते पहात नसतो तर पुन्हा अनुभवत असतो. मनाने क्लिक केलेले काही आल्हाददायक, हवेहवेसे क्षण पुन्हा जिवंत करणा-या कथांचा संग्रह... क्लिक. 2 मिपाकरांसाठी या अगोदरच्या दोसतार कादंबरीप्रमाणेच या पुस्तकालादेखील प्रकाशनपूर्व सवलत आहे. इथे पुणेकर मिपाकरांसाठी निमंत्रण पत्रिका मिपावरच पाठवतोय. प्रकाशन सोहळ्यास आवर्जून यावे. प्रकाशन स्थळ : श्री कोनिहूर कार्यालय. प्रभात रोड , गल्ली क्र ८ गरवारे महाविद्यालयाच्या समोर. पुणे ४ वेळ सायंकाळी ५.०० वाजता. 3
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2587
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

या अगोदरच्या धाग्यात चित्रे दिसत नव्हती. पुणेकर मिपाकरांना ३ तारखेला प्रकाशन सोहळ्यात भेटण्याची उत्सुकता आहे.

क्लिक कथा संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मनापासून शुभेच्छा. असेच लिहिते राहा.... -दिलीप बिरुटे

वाह्, विजूभाऊ ... हार्दिक अभिनंदन & क्लिक कथा संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मनापासून शुभेच्छा !