साहित्यः
> चिकन खिमा / मटण खिमा / पोर्क खिमा / गोखिमा : अर्धा किलो : खिमा ताजा असावा. चामड्यासहित केलेला खिमा असेल तर अजून चवदार लागतो. मटण खिमा किंवा तुमच्या आवडीचा कोणताही खिमा घ्या. मी शक्यतो कोणतेही मांस कमीतकमी दोन तास ८ टक्के मीठाच्या पाण्यात भिजवून ठेवतो. खिमा भिजवायची गरज नाही. गरज नसेल पण खाज असेल तर मात्र ब्रायनिंग जरूर करून घ्या. नंतर चाळणीतून गाळून पाणी पूर्ण निथळू द्या. थोडी हळद चोळून घेतली तरी चालावे.
> पारमेजान चीज: दोन मुठी: पारमेजान चीज नसेल तर पनीर सोडून इतर कुठलेलंही घट्ट चीज किसून. तेही नसेल तर ऑपशनला टाकावे. चरबी जास्त घ्यावी थोडीशी. पनीर घातले तरी माझी हरकत नाही पण देव बघतो आहे हे ध्यानात असू द्यावे.
> पार्सली/कोथिंबीर : मूठभर: बारीक चिरून.
> अंडी : एक/दोन : अर्धा किलोला दोन, पाव किलोला एक. देशीच हवीत असं काही नाही.
> ब्रेडक्रम्ब/पांको : दोन मूठ: जपानी पांको आकाराने मोठे असतात. ब्रेडक्रम्ब घरी करणे हेही अवघड नाही. घरी कसे करावेत याचे युट्युबवर खूप व्हिडीओ आहेत. ब्रेडचे बारीक तुकडेही टाकले तरी चालतील. यांना पर्याय काय यावर विचार केला. मोठा भरडा रवा भाजून? फार गाळ व्हायला नको आणि चवही बिघडायला नको. त्यामुळे ब्रेडचे बारीक तुकडे इथवर तडजोड करू.
> लाल कांदे: एक/दोन: बारीक चिरून
> लसूण: आवडेल तसे: बारीक चेचून
> पाप्रिकापूड/ तिखट मसाला/ हिरव्या मिरच्या ठेचून: आवडेल तसे : पाप्रिका नसेल तर आपले घरचे तिखट + काश्मिरी तिखट. खिमा जर मुळातच मसालेदार असेल म्हणजे त्यात मिरपूड घातलेली असेल तर प्रमाण कमी करावे. आवडत असेल तर चिमूटभर चिकन/मटण मसाला भुरभुरावा. तिखट वापरायचे नसेल तर हिरव्या मिरच्या ठेचून घातल्या तरी चालेल. आलंही टाका मग.
> मीठमिरे : चवीनुसार
> स्टार्च : दोन चमचे : बटाट्याचे किंवा मक्याचे कोणतेही स्टार्च चालेल. स्टार्च थेट मिश्रणात घालता येते अथवा लाडूंना फासता येते.
कृती:
.
१. वरचे पदार्थ एका भांड्यात कालवून त्यांचे लाडू वळून घ्या.
२. लाडू किंचित दाबून त्यांच्या गोल वड्या / पॅटी करून घ्या.
.
शेकून -
३. चिकन लाडू तेलाचा हात लावून लाडू २० मिनिटे २०० सेल्सियसला शेकून घ्या.
४. मटण/पोर्क/गो लाडूला तेलाचे प्रमाण दुप्पट ठेवून मंद उष्णतेवर ४५ मिनिटे तरी शेकावे लागेल. हा अंदाज आहे. करून पाहिले नाही.
.
तळून -
३. दोन चमचे तेलात तव्यात परतवून घ्या. चिकन शिजले पाहिजे.
४. मटण असेल तर जास्त वेळ लागेल. (मटणातली चरबी वितळेपर्यंत ) वडीला तेल सुटेपर्यंत परतवायला लागेल. तव्यावर झाकण ठेवून वाफा देखील काढाव्या लागतील.
.
वरकड वेळ असेल तर
५. वड्या न करता लाडवांना लहान लाडूच ठेवून ते शेकून शिजवून घ्यावेत.
६. जिऱ्याची फोडणी करावी. आवडत असतील तर बारीक कापलेला कांदा परतून घ्यावा. त्यात कापलेली दोन टमाटी, थोडा गरम मसाला (किंवा मॅगीचा मसाला, गोडा मसाला, किचन किंग मसाला असा आवडेल तो कोणताही मसाला), थोडे लाल तिखट, अगदी किंचित केचप घालून शिजवावीत. प्रकार थोडा दाटसर होईल असे पाहावे. लाडू या शिजवणात फेकावेत आणि एक वाफ काढून घ्यावी. चवीपुरते मीठ विसरू नये. नंतर कोथमीर किंवा बेझिल किंवा दोन्ही बारीक कापून भुरभुरावेत.
.
७. थोड्या मोठ्या गोलाकार पॅटी करून बर्गर मध्ये चीजचा काप टाकून, लेट्यूसादि सॅलट, मेयो किंवा आवडते सॉस घालून खा.
वाचने
10547
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक पाककृती
चांगले वर्णन आहे . बर्गर ची
जे जे उपलब्ध ते ते वापरावे
In reply to चांगले वर्णन आहे . बर्गर ची by चौकस२१२
ठीक आहे अण्णा . फ्युजन जरूर
In reply to जे जे उपलब्ध ते ते वापरावे by हणमंतअण्णा शंक…
रोचक.
हे पदार्थ उपवासाला चालतील का
हे राम...!
In reply to हे पदार्थ उपवासाला चालतील का by आंद्रे वडापाव
शाकाहारी लोकांच्या धार्मिक
In reply to हे राम...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं...!
In reply to शाकाहारी लोकांच्या धार्मिक by प्रचेतस
मी कशाला हर्ट होऊ भो :). गो
In reply to बरं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१०० टक्के
In reply to हे पदार्थ उपवासाला चालतील का by आंद्रे वडापाव
हे पदार्थ उपवासाला चालतील का ?
In reply to हे पदार्थ उपवासाला चालतील का by आंद्रे वडापाव
जि-याची फोड्णी तेलात द्यायची
In reply to हे पदार्थ उपवासाला चालतील का ? by Nitin Palkar
मी आजच केले..
सोया चंक्स
In reply to मी आजच केले.. by Bhakti
छान. बनवून ताबडतोब गरमागरम
मीटबॉल्स
In reply to छान. बनवून ताबडतोब गरमागरम by गवि
किती काळ टिकतात हे लाडू?
ते किती आणि कसे खाता यावर
In reply to किती काळ टिकतात हे लाडू? by विजुभाऊ
ही मीट बॉल सदृश्य पाकृ वाटते आहे.
लाडू किंवा वड्या