✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हिंग पुराण-अल्प पुरवणी

B
Bhakti यांनी
Tue, 08/08/2023 - 23:32  ·  लेख
लेख
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ' (Council ofScientific and Industrial Research - CSIR) ह्या केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेशी संलग्न असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' (Institute of Himalayan Bioresource Technology, Palampur - IHBT) ह्या संस्थेने २०१८ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या काळात इराण मधून दोन टप्प्यांत 'फेरुला असाफोटीडा' ह्या वनस्पतीच्या सहा वाणांचे बियाणे आयात करून 'नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली' (National Bureau of Plant Genetic Resources, New Delhi -NBPGR) ह्या संस्थेच्या देखरेखीखाली भारतात प्रथमच हिंगाची व्यावसायिक लागवड करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. आता हिंग पुराण रचिते महर्षी टर्मिनेटर :) यांनी सांगितलेल्या माहितीनुसार फेरुला असाफोटीडाच्या बियांमध्ये सुप्तावस्थेचे(seed dormancy) प्रमाण खूपच जास्त आहे. तेव्हा हिंग पुराण-अध्याय तीन,शेवटच्या प्रकरणात एक अल्प पुरवणी जोडते. अ बियाणे सुप्तावस्थेच्या दोन भिन्न श्रेणी आहेत: बाह्य आणि अंतर्जात बीजाच्या गर्भाच्या बाहेरील परिस्थितीमुळे एक्सोजेनस सुप्तता उद्भवते. एक्सोजेनस सुप्तावस्थेचे उदाहरण म्हणजे जेव्हा बियाणे आवरण ओलावा आत शिरण्यासाठी खूप टिकाऊ असते, प्रभावीपणे उगवण रोखते. बीजाच्या गर्भामध्ये रासायनिक बदलांमुळे अंतर्जात सुप्तता उद्भवते. अंतर्जात सुप्तावस्थेमुळे वनस्पती अंकुरू शकत नाही याचे एक कारण म्हणजे भ्रूण अद्याप पूर्णपणे विकसित झालेला नाही किंवा विशिष्ट हंगामी संकेत मिळालेले नाहीत .अंतर्जात रासायनिक अवरोधकांमुळे उगवण देखील दडपले जाऊ शकते. अशावेळी बीजांची सुप्तावस्था का असते ? १.बीज आवरण पर्मिअबल ,कठीण असणे २.बीज भ्रुण परिपक्व नसणे ३.ABA बीज रोपण प्रतिकूल संप्रेरकाचे प्रमाण अधिक असणे ४.थंड हवामान न मिळणे (vernalization) बीजांची सुप्तावस्था लवकर मोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकिया कराव्या लागतात. १.बीजावारण कोमल करणे-(scarification) –Acid,रब्बिंग,कॅत्तिंग २.वनस्पती संप्रेरके GA3 ,Cytokinin वाढवणे- ३.ABA चे प्रमाण कमी करणे,ऑक्सिजन देणे,हिटिंग ४.थंड वातावरण तीन आठवड्यापर्यंत देणे. फेरुला असाफोटीडाच्या बियांमध्ये सुप्तावस्थ (seed dormancy) वनस्पती संप्रेरके GA3 ,Cytokinin वाढवणे आणि थंड वातावरण तीन आठवड्यापर्यंत देणे या पद्धतीने मोडली आहे.त्यातही थंड वातावरण ५⁰ C,१५⁰C आणि २५⁰C ह्या प्रकिया वेगवेगळ्या काळासाठी जसे आठवडा ते २४-२८ दिवस वगैरे.यातील ५⁰ C –वीस दिवसांसाठी सर्वात यशस्वी परिणाम देते. या cold scarification नन्तर बीज सहा वेगवेगळ्या मेडिया संयोजन (मिडिया कॉम्बिनेशन) मध्ये ग्लास हाऊस मध्ये वाढवले. ऊती संवर्धन पद्धतीत कृत्रिम पोषक द्रव्ये (macro,micro,vitamin,hormones,sugar),प्रकाश,तापमान पुरवले जाऊन एकाच,उत्तम अनुवांशिक गुणधर्म असलेले हजोरो निरोगी रोप ग्लासमध्ये तयार तयार केले जातात. संशोधन प्रबंधामध्ये हे सहा मिडिया संयोजन काय हे दिसत नाहीये .पण साधारणत: हाफ स्ट्रेन्थ मुराशिगे आणि स्कूग कृत्रिम मिडियात (1/2 MS मिडिया) GA3,cytokinin संप्रेरके वेगवेगळ्या प्रमाण संयोजनात वापरलले जातात.अशी महत्वाची(endangered) बियाणे,वनस्पती वनस्पती ऊती संवर्धन (plant tissue culture) या पद्धतीने वाढविले जातात. एक संप्रेरक संयोजन उदाहरण - A अशा पद्धतीने ८०० वनस्पती सप्लिंग तयार करून लावली आहेत.वनस्पती ऊती संवर्धन मूळ हेतू शेतकऱ्यांना निरोगी,अधिक उत्पादकता असणारी रोपे मिळवून देणे आहे.एका माहीतीनुसार हा प्रयोग येत्या दशकात याशावी झाल्यास हिंगाच्या शेतीत दर हेक्टरी ३ लाख रुपये गुंतवणूक करून शेतकरी १० लाखापर्यंत उत्पन्न मिळवू शकतो.त्यानुसार बीज पासून रोपे तयार झाल्यानंतर इतर एक्क्सप्लान्ट नवीन रोप निर्मितीसाठी वापरता येईल का हे पाहणे मनोरंजक आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
शेती

प्रतिक्रिया द्या
7298 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

बीज अंकुरे अंकुरे

तुषार काळभोर
Wed, 08/09/2023 - 07:06 नवीन
एका सैंधव मिठाच्या छोट्याशा खरडीतून हिंगाचा विषय निघाला आणि त्या विषयबीजातून अत्यंत माहितीपूर्ण अशी तीन लेखांची मालिका आदरणीय टर्मिनेटर यांनी लिहिली. आणि त्याला ही आणखी माहितीपूर्ण पुरवणी देखील आली. छान योगायोग. आणि त्यातून झालेले ज्ञानवर्धन. धन्यवाद भक्ती आणि टर्मिनेटर!!
  • Log in or register to post comments

मजेदार आहे.

कंजूस
Wed, 08/09/2023 - 07:35 नवीन
मजेदार आहे.
  • Log in or register to post comments

अशा एकातून एक निघून येणाऱ्या

गवि
Wed, 08/09/2023 - 08:29 नवीन
अशा एकातून एक निघून येणाऱ्या माहितीपूर्ण धाग्यांनी मिसळपावसारखी संस्थळे परिपूर्ण होतात. यासाठीच हे व्यासपीठ आहे.
  • Log in or register to post comments

सहमत आहे

विजुभाऊ
Wed, 08/09/2023 - 11:42 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पुरवणी पण ज्ञाववर्धक.

सौंदाळा
Wed, 08/09/2023 - 10:24 नवीन
पुरवणी पण ज्ञाववर्धक. स्वदेशी बियाणी, त्यांचे नविन वाण, गुणवत्ता सुधारणे यात काम करणार्‍या लोकांबद्दल खूप आदर आहे. करोडो लोकांचे जीवनमान, आर्थिकचक्र यावर थेट परिणाम होतो. येत्या काही वर्षात उत्तम प्रतीचा स्वदेशी हिंग सर्वांच्या स्वयंपाकघरात येऊ दे.
  • Log in or register to post comments

@भक्ती...

कर्नलतपस्वी
Wed, 08/09/2023 - 11:38 नवीन
महर्षी टर्मिनेटर यांच्या तोडीसतोड विदुषी भक्ती यांची लघु पुरवणी. लेख वाचल्यावर लक्षात येते की आपण वनस्पती शास्त्र किवा सुक्ष्म जीवाणू शास्त्र मधे पारंगत असाव्या. हा प्रश्न नाही पण या व पुर्वी वाचलेल्या लेखाची लांबी,रुंदी,उंची,खोली वरुन जे वाटले त्यावरुन. माहितीपूर्ण लेख आवडला.
  • Log in or register to post comments

सोप्या भाषेत ग्राफ, टेबल्स सहित उलगडून सांगितलेली

टर्मीनेटर
Wed, 08/09/2023 - 11:54 नवीन
जेब्बात 👍 पुरवणीत सोप्या भाषेत ग्राफ, टेबल्स सहित उलगडून सांगितलेली शास्त्रीय माहिती मस्तच! हिंग पुराणाच्या तिसऱ्या अध्यायात ह्या पुरवणीची लिंक अपडेटवली आहे 🙏
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण

प्रचेतस
Wed, 08/09/2023 - 13:09 नवीन
थोडासा वनस्पतीशास्त्राशी परिचित असल्याने समजायला अधिक सोपे झाले. ह्यावर अधिक तपशीलवार लिहावे.
  • Log in or register to post comments

'अल्प' परंतु 'चांगली' पुरवणी

आंद्रे वडापाव
गुरुवार, 08/10/2023 - 15:04 नवीन
'अल्प' परंतु 'चांगली' पुरवणी ... बायोटेक बद्दल अजुन काही सविस्तर वाचायला आवडेल .. कृपया आणखी लेख लिहिण्याचे मनावर घेणे ..
  • Log in or register to post comments

सायटोकायनिन हे संप्रेरक

पिंगू
Fri, 08/11/2023 - 14:37 नवीन
सायटोकायनिन हे संप्रेरक गोमूत्रात आढळते आणि म्हणूनच गोमूत्राचा वापर बीजप्रक्रियेसाठी केला जातो ही अधिकची माहिती इथे नमूद करतो.
  • Log in or register to post comments

छान

सुरिया
Fri, 08/11/2023 - 21:10 नवीन
स्टेफी सोडली तर बाकी कोनत्याही ग्राफमध्ये इंटरेस्ट नाही. ;) तरीही अभ्यासू लेख म्हणायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

हे पिक कोकणात होईल का?

मुक्त विहारि
Sat, 08/12/2023 - 18:16 नवीन
आंतरपिक म्हणून बरे दिसत आहे ...
  • Log in or register to post comments

भक्ति ताई पुरवणी माहितीपूर्ण आहे.

रंगीला रतन
Sun, 08/13/2023 - 21:00 नवीन
भक्ति ताई पुरवणी माहितीपूर्ण आहे. पुलेशू.
  • Log in or register to post comments

वा! हिंग पुराणात तुम्ही छान

श्वेता व्यास
गुरुवार, 08/17/2023 - 12:37 नवीन
वा! हिंग पुराणात तुम्ही छान माहिती जोडलीत.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा