आपल्या तिरकस व खवट शैलीमुळे अपार लोकप्रियता मिळवलेले लेखक- पत्रकार आणि सादरकर्ते शिरीष कणेकर यांचे काल वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. अगदी अखेरपर्यंत ते लिहिते होते. गेल्या रविवारीच त्यांचा साप्ताहिक लेख सामना पेपरमधे आलेला होता.
एकेकाळी त्यांचे सिनेमा व क्रिकेट यावरचे खुसखुशीत लेख वाचण्यासाठी हजारो मराठी वाचक आतुर असत. अनेक चित्रपट कलाकार व क्रिकेटपटू यांच्याशी कणेकरांचे जवळचे संबंध होते. मंगेशकर कुटुंबियांसोबत तर अगदी घरोबा होता. त्यांच्या लेखन व कार्यक्रमांमधे हे किस्से नेहमी येत असत.
मराठीत पुलं आणि नगरकर यांच्या नंतरचे मुख्य stand up comic म्हणून कणेकरांचे नाव घेता येईल. पण हेही तितकेच खरे आहे की कणेकरांचा वकूब सामान्य होता आणि एका मर्यादेनंतर त्यांचे लेखन, त्यातील नकारात्मकता, टोमणे, भक्तिभाव हे सर्व कंटाळवाणे होई. अनेकांचा रागही त्यांनी ओढवून घेतला.
पत्रकार मुकेश माचकरांनी एक मोठा लेख लिहून कणेकरांच्या या 'सपासप' लेखनाचा चांगलाच समाचार घेतला होता.
Vagina Monologues सारख्या cult नाटकाचे वंदना खरे यांनी केलेले मराठी रूपांतर पाहून (तेही अर्धेच!) कणेकरांनी त्याची जाहीर लेखात टर उडवली होती. ते अनेकांना आवडले नाही.
काही वर्षांपूर्वी मी त्यांचा एक जुना नियमित वाचक या नात्याने त्यांना कृतज्ञतापूर्वक ते सर्व सांगणारा ईमेल टाकला होता. कणेकरांचा आलेले अत्यंत कुत्सित उत्तर वाचून मी सूज्ञपणे संपर्क वाढवला नाही. असो.
साधारण 10 वर्षांपूर्वी राजेश खन्ना गेला, मग देव आनंद, दिलीपकुमार गेले. त्यानंतर कणेकरांच्या लेखनात निरवानिरवीचे सूर उमटू लागले. फेब्रुवारी 2022ला लता मंगेशकर यांचे देहावसान झाल्यावर कणेकर मुळापासून हलले असे त्यांच्या तदनंतरच्या लेखनातून दिसते.
काहीही असले तरी आमच्या पिढीला हिंदी सिनेमाचा व सिनेसंगीताचा नाद लावणारे कणेकरच होते हे अमान्य करता येत नाही.
त्यांना कृतज्ञ श्रद्धांजली.
वाचने
10543
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकेकाळी ज्याने खदखदून हसवले
हो
In reply to एकेकाळी ज्याने खदखदून हसवले by गवि
शिरीष कणेकरांना आदरांजली _/\_
होय
In reply to शिरीष कणेकरांना आदरांजली _/\_ by टर्मीनेटर
राजेश खन्ना आणि लता मंगेशकर
गाये चला जा
खंत
In reply to गाये चला जा by सर टोबी
कणेकरांची चित्रपट-संगीत विषयक पुस्तके कोणकोणती आहेत ?
फक्त विनोदी लेख आणि अनुभव
In reply to कणेकरांची चित्रपट-संगीत विषयक पुस्तके कोणकोणती आहेत ? by चित्रगुप्त
माधव मोहोळकरांचंही
In reply to कणेकरांची चित्रपट-संगीत विषयक पुस्तके कोणकोणती आहेत ? by चित्रगुप्त
आपल्या खास विनोदी शैलीतल्या लेखांतुन
श्रद्धांजली
कणेकरी शैली हरपली!
माझी फिल्लमबाजीच्या ,(भरत
पडद्यावरची आई म्हणजे खोटी आई.
In reply to माझी फिल्लमबाजीच्या ,(भरत by आंद्रे वडापाव
हो
In reply to पडद्यावरची आई म्हणजे खोटी आई. by आंद्रे वडापाव
कणेकरांचे अपयश हे म्हणता येईल
In reply to हो by चलत मुसाफिर
शिरिष कणेकरांनी काय काय दिलंय
चौ. को.
भावपूर्ण श्रद्धांजली!
हो
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली! by राजेंद्र मेहेंदळे
रिकाम्या भांड्यांचा आवाज
In reply to हो by चलत मुसाफिर
फिल्लमबाजीचा विडियो
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली! by राजेंद्र मेहेंदळे
सहमत आहे
In reply to फिल्लमबाजीचा विडियो by चित्रगुप्त
चित्रपट कालबाह्य होतात, पण गाणी टिकून रहातात
In reply to सहमत आहे by चलत मुसाफिर
फिल्लमबाजीचा विडियो
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली! by राजेंद्र मेहेंदळे
@चित्रगुप्त...
In reply to फिल्लमबाजीचा विडियो by चित्रगुप्त
सहमत आहे. माझी फिल्लमबाजी
In reply to फिल्लमबाजीचा विडियो by चित्रगुप्त
कालबाह्य तर झालेच आहे.
In reply to सहमत आहे. माझी फिल्लमबाजी by विजुभाऊ
सहमत.
In reply to कालबाह्य तर झालेच आहे. by गवि
भावपूर्ण
शिरीष कणेकर यांची स्वत:ची
??
In reply to शिरीष कणेकर यांची स्वत:ची by सिरुसेरि
अ. शिरीष कणेकर यांचे वडील
In reply to ?? by चलत मुसाफिर
काय राव मुसाफिर!
In reply to ?? by चलत मुसाफिर
साहजिक आहे
In reply to काय राव मुसाफिर! by चांदणे संदीप
शिरीष कणेकर तीन वर्षाचे
In reply to शिरीष कणेकर यांची स्वत:ची by सिरुसेरि
एका मर्यादेनंतर त्यांचे लेखन,
माचकर
In reply to एका मर्यादेनंतर त्यांचे लेखन, by चौकस२१२
या दुव्याबद्दल मनःपूर्वक
In reply to माचकर by चलत मुसाफिर
बारक्या नव्हे फिरक्या!
In reply to या दुव्याबद्दल मनःपूर्वक by रामचंद्र
यादोंकी बारात हे पुस्तक
सर्वाधिक प्रचंड एकरकमी हसू
सर्वाधिक प्रचंड एकरकमी हसू
In reply to सर्वाधिक प्रचंड एकरकमी हसू by गवि