एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. सहकर्मीचे गऱ्हाणे ऐकून मी म्हणालो, लेका, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक. या जगात लग्न झालेले सर्व पुरुष हे त्यांच्या बायकोच्या मुठीतच असतात. तिच्या आदेशानुसारच सर्वांना जगावे लागते. जी तुझी अवस्था तीच माझीहि आहे. पुरुषांना वैदिक काळापासूनच बायकोच्या मुठीत राहण्याचा श्राप मिळालेला आहे. एवढेच काय, वज्र धारण करणारा देवांचा राजा इंद्रहि त्याच्या बायकोच्या मुठीत होता. माझा सहकर्मी उद्गारला, काहीही बोलू नको, पूर्वी कोण पुरुष बायकोच्या मुठीत राहत होता. काहि पुरावा आहे का?
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५९ ( सपत्नी नाशनसूक्त)
(ऋषिका - शची पौलोमी : देवता - आत्मस्तुती)l
उत् असौ सूर्यः अगात् उत् अयं मामकः भगः
अहं तत् विद्वला पतिं अभि आसाक्षि वि-ससहिः
अर्थ: हा पहा सूर्य जसा उदय पावला, तसे माझे दैवहि उघडले. मी हे जाणूनच आपल्या पतीला पूर्णपणे वश केले. मी त्याची स्त्री आहे; तरी पण त्याला अगदी माझ्या मुठीत ठेवणारी अशी आहे.
देवांचा राजा महापराक्रमी वज्र धारण करणारा इंद्र. असुरांचे दुर्ग उद्ध्वस्त करणारा इंद्र. वृत्रासुराचा वध करणारा इंद्र. इंद्र कृपेसाठी ऋषीमुनी त्याची स्तुती करायचे. त्याच्या विजयाची गाथा गायचे. त्याकाळच्या परंपरेनुसार देवराज इंद्राच्या अनेक पत्नी होत्या. इंद्राची एक पत्नी शचीहि होती. इंद्र पत्नी शचीचा त्या काळी एवढा दरारा होताकि तिने स्वत:च्या स्तुतीसाठी सवतीचा नाश सूक्त रचले आणि त्या सूक्ताला ऋग्वेदात स्थानहि मिळाले.
स्वत:ची आत्मस्तुती करताना ती म्हणते. मीच घराण्याची शोभा आहे. मीच मस्तक आहे. मी कठोर स्वभावाची आहे. मी विजय शालिनी आहे. मी सर्व सवतींचा वर चष्मा नाहीसा केला आहे. माझे पुत्र शत्रूचा फडशा उडवितात. माझी पुत्रीहि चक्रवर्ती आहे. माझे पती ओजस्वी व सर्वश्रेष्ठ आहेत. जो भक्त त्यांना हविभाग अर्पित करतो त्यांचे इच्छित पूर्ण करतात. तेच मीहि केले आहे अर्थात मीही भक्तांकडून हवि भाग स्वीकार करते आणि त्यांचे मनोरथ पूर्ण करते. त्यामुळे मी सवत रहित झाले आहे. माझ्या प्रत्येक कृत्याचे अनुमोदन माझे पती करतात. (करणे भाग आहे). मी माझ्या पतीला पूर्णपणे वशमधे केले आहे. तो माझ्या मुठीत आहे. जसे मी माझ्या पतीवर अधिकार गाजवते तसेच मी इतरांवरहि गाजवते.
आजच्या काळातही बायकोच्या अधीन राहणारे नवरे सुखी असतात. बायकांच्या मुठी सारखी सुरक्षित जागा जगात दुसरी नाही. बायकांच्या अत्याचारांच्या विरुद्ध आवाज उठविणाऱ्या नावर्यांवर सरकारी पाहुणचार घेण्याची नौबत येते. माझ्या त्या सहकर्मीने पूर्वापारपासून चालत आलेले कठोर सांसारिक सत्य जाणले. नंतर त्याने कधीही त्याच्या बायकोची तक्रार केली नाही.
माझे म्हणाल तर मी माझ्या गृहराज्याचे प्रधानमंत्री पद सौ.ला अर्पित केले आहे आणि स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले आहे. माझ्या नावावर सौ. सर्व निर्णय घेते आणि मी तिच्या सर्व निर्णयाचे राजी खुशी समर्थन करतो. मी सुखी आहे कारण मी बायकोच्या मुठीत आहे.
वाचने
10142
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी बायकोच्या मुठीत अजिबात
> एक दिवस माझ्या एका
प्रतिसाद आवडला. पण एकदा
In reply to > एक दिवस माझ्या एका by साहना
पण एकदा वहिनींना वाचायला द्या
In reply to प्रतिसाद आवडला. पण एकदा by विवेकपटाईत
त्या स्वतःच वहिनी आहेत हो काका!
In reply to पण एकदा वहिनींना वाचायला द्या by कानडाऊ योगेशु
अय्योयो.
मनुस्मृतीतील 'नियोग' विषयक दंडक
नियोगाविषयक काही
In reply to मनुस्मृतीतील 'नियोग' विषयक दंडक by चित्रगुप्त
नियोगाचा धिक्कार ???
In reply to नियोगाविषयक काही by प्रचेतस
नष्टे मृते प्रवज्जिते क्लीबे
In reply to नियोगाचा धिक्कार ??? by प्रसाद गोडबोले
असा मनु प्रतिगामीच नव्हे काय?
In reply to नष्टे मृते प्रवज्जिते क्लीबे by प्रचेतस
येत्या वीकांती धो धो पावसात
In reply to असा मनु प्रतिगामीच नव्हे काय? by प्रसाद गोडबोले
मूळ ग्रंथ फारच भारी विचार
शंकर पार्वतीच्या लहानपणी
कुंतीला-माद्रीला अपत्ये 'नियोग' विधीतून झाली होती किंवा कसे ?
परंतु प्रत्यक्ष महाभारतात
In reply to कुंतीला-माद्रीला अपत्ये 'नियोग' विधीतून झाली होती किंवा कसे ? by चित्रगुप्त
एक चादर मैलीसी......
कानीन-कन्या अवस्थेत झालेला,
In reply to एक चादर मैलीसी...... by कर्नलतपस्वी
महिलाविषयक एक चिंतन...
लिंक चुकली...
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना
पण पुढे काय झाले त्या
हेहेहेहे
In reply to पण पुढे काय झाले त्या by कानडाऊ योगेशु
=))
In reply to हेहेहेहे by सुरिया
खिक
In reply to हेहेहेहे by सुरिया
पण पुढे काय झाले त्या
In reply to पण पुढे काय झाले त्या by कानडाऊ योगेशु
हेहेहे
नवरा जर बायकोच्या मुठीत
होम मिनिस्टर कार्यक्रम बघा.
पौलोमी शची चे ओरिजिनल चित्र .
नवर्याने टाकलीय हिला
In reply to पौलोमी शची चे ओरिजिनल चित्र . by आंद्रे वडापाव
Lol... घरातली करती सवरती बाई तु आहेस, तुला
In reply to पौलोमी शची चे ओरिजिनल चित्र . by आंद्रे वडापाव