अमानवी बुद्धिमत्ते ( NHI ) अर्थात एलियन्स विषयी माझी बदलती मते : भाग १
सर्वप्रथम माझ्या आकलनाच्या प्रवासा विषयी:
मी सहजा सहजी कोणत्याही कॉन्स्पिरसी थिअरी वर भोळेपणाने विश्वास ठेवणाऱ्यातला नाही. पुराव्याने जे सिद्ध होत नाही ते मानायला बुद्धी अजिबात राजी होत नाही. त्यामुळे बिल गेट्सने वॅक्सीनद्वारे कोट्यवधी मानवांमध्ये नॅनो चीप घातल्या आहेत किंवा नेताजी सुभाष चंद्र बोस अजूनही जिवंत आहेत वगैरे सरळ सरळ मूर्ख थेऱ्या हसण्यावारीच नेल्या आहेत. आणि इतर सटल थेऱ्या मात्र तर्काच्या-पुराव्याच्या कसोटीवर घास घासून मान्य अमान्य केल्या आहेत. उदा. डार्विनची लैंगिक निवड थेरी. (नैसर्गिक निवड स्वयंस्पष्ट आहे) 'विदा आधी, निष्कर्ष (काढण्याची घाई) नाही' या तत्त्वावर माझी निष्ठा आहे. मी एकंदरीत 'अमानवी जीव किंवा परग्रहवासी' या विषयाभोवती प्रचंड शंकेखोर होतो. तथापि गेले काही महिने मी या विषयावर बरेच वेळ घालवला आणि मी समोर आलेला विदा नाकारू शकलो नाही. विदा त्याच्या सकृतदर्शनी मूल्याला जसाच्या तसा घेतला तरी कोणत्याही निष्कर्षाप्रती येण्यापूर्वी केवळ त्या विद्याच्या वैचित्र्याने स्तंभित व्हायला झाले.
मतबदलासाठी मानसिक मॉडेल:
एका तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाने माझ्या सारख्या असंख्य लोकांच्या धडपडीला थोडी सुसूत्रता यावी म्हणून एक फ्रेमवर्क तयार केले आहे. तेच फ्रेमवर्क मी थोडी माझी वैयक्तिक भर घालून तुमच्यापुढे ठेवत आहे. या मॉडेल मध्ये एकूण सहा पातळ्या आहेत. पातळ्या चढत्या भाजणीत आहेत. उदा. पातळी ० ही मान्य करायला भरपूर पुरावा आहे. या पातळीवरचा पुरावा किंवा तर्क समजून घ्यायला सुद्धा खूप कष्ट करायची गरज नाही. पुढच्या पातळ्या ह्या क्रमा क्रमाने जास्त अविश्वसनीय होत जातात. तथापि आधीच्या पातळीचा पुरावा किंवा निष्कर्ष मान्य केला असेल तर काम सोपं होतं.
सर्वप्रथम सगळ्या पातळ्या :
०. विश्वात आपण (म्हणजे पृथ्वीवासीय प्रगत जीव) एकटेच नाही आहोत. १. अनोळखी उडत्या वस्तू (UFO) किंवा अनोळखी विसंगत घटित (Unidentified Anomalous Phenomenon i. e. UAP) अस्तित्वात असून मानवी आकलनापलीकडे आचरण करतात. २. अमेरिकन सरकार कडे पडलेल्या किंवा पाडलेल्या UAP आहेत. (कदाचित ते चालविणाऱ्या जीवांचे मृतदेह देखील असावेत) ३. UFO पुराणातल्या बऱ्याच दंतकथा खऱ्या असू शकतात. ४. अमानवी प्रगत जीव आणि मानव यांच्यात संवाद आहे. ५. आकाशगंगेचे किंवा त्याहून मोठ्या वैश्वीक भागाचे फेडरेशन आहे.आता आपण एकेक पातळी तपासू. ०. विश्वात आपण (म्हणजे पृथ्वीवासीय प्रगत जीव) एकटेच नाही आहोत.
- निरीक्षण करण्यायोग्य विश्वाचा व्यास ~93 अब्ज प्रकाश-वर्ष आहे
- अंदाजे २ ट्रिलियन आकाशगंगा आहेत
- प्रत्येक आकाशगंगेत लाखो - ते - करोडो-ट्रिलियन तारे आहेत.
- आपल्या आकाशगंगेत लाखो तारे अस्तित्वात आहेत.
- त्यातल्या असंख्य ताऱ्यांभोवती लहान मोठे ग्रह भिरभिरताहेत.
- आतापर्यंत जे काही 5,410 एक्सोप्लॅनेट पृथ्वीवरून सापडले आहेत, त्यातले 156 ताऱ्यापासून राहण्यायोग्य क्षेत्रात आहेत. (त्यावरून एकूण जीवनानुकूल ग्रहाची संख्या लक्षात यावी)
- एक्स्ट्रीमोफाइल जीव दाखवतात की जीवन कमालीचे लवचिक आहे.
- बोनस: वर्महोल्स आणि वार्प ड्राइव्ह सैद्धांतिकदृष्ट्या (किमान आपल्यासाठी तरी फक्त सैद्धांतिकदृष्ट्या) शक्य आहेत.
- अमेरिकन सरकार, अमेरिकन सरंक्षण मंत्रालयांनी आणि नासा या सगळ्यांनी याचे काही सबळ पुरावे सार्वजनिक केले आहेत, किंवा दोनेक लीक झालेले व्हिडीओ आहेत ते खरे आहेत हे जाहीररित्या, असंदिग्ध भाषेत कबूल केले आहेत.
- NYT सारख्या अतिशय प्रतिष्ठित दैनिकाने २०१७ ला काही व्हिडीओ जाहीर केले आहेत.
- मला अतिशय आवडलेला एक व्हिडीओ हा मध्य पूर्वेतील आहे. एका मिलिटरी ड्रोन ने अत्यंत वेगाने कोणत्याही propulsion शिवाय सहजगत्या वेगाने प्रवास करणारी एक गोल वस्तू टिपली आहे.
- २०२१ मध्ये अमेरिकन संरक्षण खात्याने जाहीर केलेला हा रिपोर्ट. पाल्हाळ लावले असले तरी एक गोष्ट ढळढळीत पणे कबूल केली आहे. ती म्हणजे ह्या वस्तू नेमक्या काय आहेत त्याचा थांग लागत नाही. हा रिपोर्ट साधासुधा रिपोर्ट नसून अमेरिकन सरकारचा मूड बदलत असल्याची नांदी आहे. वर ते हेही म्हणताहेत की, या वस्तू रशियन किंवा चायनीज बनावटीच्या नाहीत. आणि त्या अमेरिकन बनावटीच्या सुद्धा नाहीत. त्यातून काय उरले हे सुज्ञास सांगणे न लगे.
- अमेरिकन संरक्षण खात्याने UAP साठी खालील ५ निरिक्षते नोंदवली आहेत. 1) Anti-gravity lift ( प्रति गुरुत्वाकर्षण अवरोध ) 2) Sudden and instantaneous acceleration ( तात्काळ त्वरण ) 3) Hypersonic velocities without signatures ( ध्वनीच्या वेगाहून जास्त वेग कोणत्याही इतर बाबींशिवाय ) 4) Low observability, or cloaking ( लपून राहण्याची क्षमता ) 5) Trans-medium travel ( आंतरमाध्यम प्रवास क्षमता, म्हणजेच पाण्यातूनही, निर्वातामधूनही, हवेमधूनही त्याच सहजतेने वरील गोष्टी करणे )
- नुकतेच अमेरिकन सैन्याने चार उडत्या वस्तू पाडल्या आहेत. त्यापैकी एक चीनी स्पाय बलून असल्याची बतावणी केली गेली. नंतर बायडेन दुसरंच काहीतरी बरळले. एकंदरीत नेमकं काय चालंलय याचा काहीच ताळमेळ नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अजून काही.
व्हिडिओएस्से ची लिंक राहिली
छान. वेगळा विषय.
खूप आहेत प्रश्न, खूप आहेत उत्तरे देखील.
भित्यापोटी ब्रह्मराक्षस
भित्यापोटी नाही भित्यापाठी
अररर चुकलंच.
छान लेख
छान.
माती?
बाय द वे, आपली पुराण ग्रंथ
दुसरी बाजू
युगांडा, घाना वगैरे का नाही
त्यातल्या अनेक केसेस मधून एक
केवळ माहितीच नव्हे
आपल्या जीवसृष्टीचे रहस्य
पातळ्या
लेखात सांगितलेल्या
रंजक
अमान्य नाही.
अण्णा, कोणताही मेंटल ब्लॉक न
माझी काही स्पष्टीकरणे
गुपचूप पृथ्वीवर येण्यापेक्षा
एक वेगळा विषय
UAP = Unidentified Aerial
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्राधान्य
ब्रम्हांडात सर्वत्र जीवन आहे
कोणत्याही निरिक्षणासाठी
अवांतर
बाब्बो!!
प्रश्न : विश्वातील अगणित तार्
प्रतिसाद पटला आणि आवडला
लाजमी प्रतिसाद
मी लेखामध्ये चिंता व्यक्त
रोचक !
https://en.wikipedia.org/wiki
प्राचीन भारतीयांनी अवकाशातून पृथ्वी पाहिली?
(डिस्क्लेमर)
Astrophysicist Neil deGrasse Tyson
रोचक, रंजक आणी...
रोचक दावे
ही पुस्तके वाचली आहेत का कोणी