नराधम
आज माझ्याकडे सोनोग्राफी साठी एक रुग्ण बाई आल्या होत्या. वय वर्षे ४२.
त्यांची फाईल पहिली तर त्यात बऱ्याच गोष्टी तर्कास न पटणाऱ्या होत्या. त्यांना एक वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवात झालेली होती. पण आजतागायत गर्भाशय काढून टाकलेला नव्हता. प्रथितयश अशा स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भाशय काढून टाकणे आवश्यक आहे असे एक वर्षांपूर्वी स्पष्ट लिहून दिलेले होते. अगोदर झालेल्या सोनोग्राफी प्रमाणे या बाईंच्या गर्भाशयात निदान सात आठ तरी फायब्रॉइड्स होते आणि गर्भाशयाच्या मधल्या भागास अडेनोमायोसिस म्हणूनआजार झालेला होता. तीन महिन्यापूर्वी पेट सिटी (PET CT) झालेला होता. त्यावेळेस हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पडलेला नव्हता.
या महाशयांनी कोणी एक डॉक्टर गाठला होता ज्याने हॉर्मोन थेरपी चालू केली होती ज्यामुळे त्या बाईंना गेले सहा महिने पाळी आली नव्हती.
मी त्यांची सोनोग्राफी करताना मी त्यांच्या यजमानांना विचारले अजून तुम्ही शल्यक्रिया का केलेली नाही? त्यावर त्यांनी मला सांगितले कि आम्ही तीन चार वेळेस वंध्यत्वासाठी आय व्ही एफ चे उपचार केले परंतु त्यात यश आले नाही म्हणून आम्ही या डॉक्टरांकडे जाऊन शल्यक्रियेच्या ऐवजी हॉर्मोन थेरपी चालू केली.
सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाचे आतील आवरण बरेच वाढलेले दिसत होते याचा सरळ अर्थ असा होता कि हा कर्करोग त्या हॉर्मोन थेरपीला जुमानत नव्हता
मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि या हॉर्मोन थेरपीला कोणताही शास्त्राधार नाही. याने केवळ पाळी येणे बंद होईल गर्भाशयाचे आतले आवरण वाढणार नाही म्हणून कर्करोग थांबेल असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.
मुळात आपल्या पत्नीच्या गर्भाशयात असलेल्या फायब्रॉइड्स आणि ऍडेनोमायोसीसमुळे त्यांना गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी ( फारतर ५%) आहे. त्यातून तुम्ही हॉर्मोन थेरपी घेत आहेत त्याने स्त्रीबीज निर्मिती होत नाही मग गर्भधारणा कशी होणार? त्यातून अगदी गर्भधारणा झालीच तरी गर्भाशयाचा कर्करोग गरोदरपणाच्या हॉर्मोन्स मुळे वेगाने वाढून गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि या काळात हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पाडण्याचीशक्यत कितीतरी जास्त आहे.
असे असताना तुम्ही तुम्ही केवळ आपल्याला मूल हवे त्यांच्या जीवाशी खेळता आहात. "शल्यक्रिया करू नका" असे सांगणारा डॉक्टर शोधणे बंद करा आणि कोणत्याही अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या किंवा टाटा रुग्णालयात जाऊन दाखवा. नऊ वर्षे कर्करोग केंद्रात काम केल्याने मला थोडाफार अनुभव आहे यामुळेच मी तुम्हाला हा सल्ला देतो आहे. तुमच्या दृष्टीने सर्वात चांगला मार्ग म्हणजे अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या आणि ताबडतोब शल्यक्रिया करून घ्या आणि नंतर सरोगसी मार्गाने (तुमचा गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढवायचा उपाय) वंध्यत्वावर उपचार करा.
मी त्यांना स्वच्छ शब्दात सांगितले कि आपल्या पत्नीला गर्भधारणा होण्याची शक्यता फारशी नाही हे सांगताना मला अजिबात आनंद होत नाहीये. परंतु कुणी तरी हे वाईट काम करणे आवश्यक आहे आणि लष्करात गोल गोल बोलण्याचे आम्हाला शिकवलेले नाही. यामुळे जे आहे ते तोंडावर स्पष्ट सांगणे आवश्यक आहे. अशा बोलण्याने दोन चार रुग्ण गेले तरी मला फरक पडत नाही.
एवढ्यात या महाशयांना एक फोन आला म्हणून ते बाहेर गेले त्या वेळेत त्या बाईंनी सांगितले कि हा माणूस माझा शत्रू आहे. मला शल्यक्रिया करू देत नाहीये. जितक्या डॉक्टरांकडे गेलो तितक्यांनी मला ताबडतोब शल्यक्रिया करा असा सल्ला दिला आहे.
एवढ्यात ते यजमान परत आले. त्यावर त्या बाई गप्प झाल्या.
मी त्यांना हाच सल्ला परत एकदा कळकळीने दिला. त्यांना तो फारसा पटलेला दिसला नाही. पुढे काय होईल माहिती नाही.
अर्थात मी याच्यापेक्षा अधिक काहीही करू शकत नव्हतो. डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला प्रकर्षाने जाणवत होती.
या बाई कोणत्या कारणाने या माणसाचे ऐकत होत्या आणि आपला जीव धोक्यात टाकत होत्या हे समजत नव्हते. त्यांची काहीतरी अगतिकता असावी असेच मला वाटते.
वाचने
29002
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
"डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला
थोडे विषयांतर
In reply to "डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला by टर्मीनेटर
थोडे विषयांतर आता करत आहे
In reply to थोडे विषयांतर by प्रदीप
कर्करोगाचे शेकडो प्रकार आहेत
In reply to थोडे विषयांतर आता करत आहे by टर्मीनेटर
खर्चाच्या अनुषंगाने
In reply to "डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला by टर्मीनेटर
याला रायडर म्हणतात.
In reply to खर्चाच्या अनुषंगाने by तर्कवादी
.
कठीण आहे
कळत नाही..
अरेरे!!
अशा नवर्या बरोबर, संसार न करणेच इष्ट .... पण....
In reply to अरेरे!! by राजेंद्र मेहेंदळे
त्या बाईची अशी कोणती अडचण
In reply to अरेरे!! by राजेंद्र मेहेंदळे
सहमत आहे
In reply to त्या बाईची अशी कोणती अडचण by सुबोध खरे
दत्तक
मिपावर राजकीय चर्चा लवकर सुरू
मार्मिक...!!
In reply to मिपावर राजकीय चर्चा लवकर सुरू by आनन्दा
खरच नराधम आहे हा नवरा.
ऑ !!!!!
गांधीजींनी बलात्कार
ते लोहगड, कळसूबाई इथली भयानक
छोडो मेहँदी खडक संभालो
In reply to ते लोहगड, कळसूबाई इथली भयानक by Bhakti
दुर्दैवी
स्त्री च्या नशीबाची दुर्दैवी कहाणी.
स्त्री च्या नशीबाची दुर्दैवी कहाणी.
माणसाला आपल्या प्राथमिकता
महिला आयोगाकडे डॉक्टरनं अशी
कायदा कागदोपत्री छान असतो पण
In reply to महिला आयोगाकडे डॉक्टरनं अशी by सुबोध खरे
पण त्या तक्रारीचा पाठपुरावा
शरीरात जितक्या तर्हेचे अवयव
In reply to पण त्या तक्रारीचा पाठपुरावा by राघव
धन्यवाद. लेख बराचसा वाचला अन्
In reply to शरीरात जितक्या तर्हेचे अवयव by सुबोध खरे
नराधमच नसून मूर्खही