दिल्लीमध्ये दीर्घ वास्तव्याचा योग
माझे बँकेतील नोकरीसाठी गेल्या काही वर्षांपासून मुंबई मध्ये वास्तव्य आहे. घर सोडून मुंबई मध्ये येताना मला काही वाटले नव्हते. उलट मुंबईमध्ये जाणार या गोष्टीचे एक एक्साइटमेंट होते. बॅग उचलली आणि निघालो. मुंबई घरापासून किती पान दूर असली तरी आपली आहे असे काहीसे वाटत होते. ते खरे ही झाले. इतक्या वर्षांत एकदापण मुंबई ने परके वाटू दिले नाही.
परंतु जसे बुद्धाने बदल हाच कायम असतो असे काहीसे म्हटले आहे त्यानुसार माझी दिल्लीला बदली झाली. विनंती, रडारड, वगैरे सगळे करून पण जेव्हा दुसरीकडे बदली होणार नाही हे माहीत झाले आहे तेव्हापासून मी मग गिळून जायच्या तयारीला लागलो आहे. निदान ५-६ वर्षे तरी राहायचा योग दिसतोय. दिल्ली बद्दल धाकधूक वाटायचे कारण खूपदा वाईट गोष्टींसाठीच दिल्लीचे नाव बातम्यांमध्ये जास्त येते.
आता जाणे ठरलेच आहे तर आता थोडी माहिती मिळाली तर बरी या विचाराने हा लेख प्रपंच. ही जिलबी प्रश्नोत्तरी मध्ये मला Access Denied दाखवत असल्याने काथ्याकूट मध्ये टाकत आहे. कृपया संपादक महोदयांनी धागा योग्य ठिकाणी हलवावा ही विनंती.
दिल्ली नाव घेतल्यावर मला लोकांनी दिल्लीबद्दल चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्या. हिमालयापासून जवळ/ उत्तम खाद्यसंस्कृती/ फिरायला जास्त जागा/ फुकट वीज इत्यादि चांगल्या गोष्टी झाल्यावर खालील गोष्टी लोकांनी माझ्या डोक्यात टाकल्या.
१. उन्हाळ्यातली धुळीची वादळे
२. हिवाळ्यातली कडक थंडी
३. प्रदूषण
४. वाईट लोक (?)
विदर्भातला असल्याने कडक उन्हाळा आणि मुंबईमध्ये राहून असल्याने घाम आणि उकाडा पाहून झाले आहे. दिल्लीमध्ये याहून वाईट काही असेल असे वाटत नाही. परंतु कडक हिवाळा कधीच बघितला नाही, कधी बर्फ पण बघितले नाही, म्हणून दिल्लीतला हिवाळा + पंजाब, हरियाणा मधून येणारे हिवाळी प्रदूषण किती सहन होईल आणि त्यापासून कसा बचाव करावा हे काही माहीत नाही. तसेच मुंबई मध्ये कामाशी काम ठेवणाऱ्या आणि नम्र लोकांची सवय असल्याने दिल्ली किंवा उत्तर भारतातल्या भांडकुदळ अशी प्रसिद्धी झालेल्या लोकांशी कसे डिल करावे याचा मला मुळीच अंदाज नाही.
दिल्लीस जाऊन आलेल्या अथवा दिल्ली मध्ये वास्तव्य असलेल्या मिपाकरांनी कृपया यावर मला मार्गदर्शन केले तर फार मदत होईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.
भाई ....
नवी दिल्ली...
दिल्ली !!
प्रदूषण हलके में घेऊ नका.
१९७७ ते २०२२ दिल्लीत वास्तव्य केले
मी हिंदीत पुरानी दिल्ली की
अनुभवातून आलेले शहाणपण
इतके भांबावून जाऊ नये...
बृहन्महाराष्ट्र नाट्य-स्पर्धा बंद झाल्यात बहुतेक
अन्नासाठी दाही दिशा...
विवेक पटाईत काकांशी संपर्क
दिल्लीत राहिलो नाही
दिल्ली दिलवालोंकी कि ठगोंकी ?
ठग कुठेही कधीही
पुणे स्टेशन ते शिवाजीनगर
पण साठ पैसे द्यायचे कसे ? ५०
१,२,३,५, १०,२०, ५० पैशांची नाणी असत.
होय.
दिल्लीत रहायचे असेल तर तिथली
आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या सिनेमा
इंजॉय करा.
दिल्ली राहण्यासाठी उत्तम जागा
प्रतिसादासाठी धन्यवाद
संसद भवन...
अर्रे वा ! मस्त एरिया आहे
संपादक महोदय
दिल्लीतली थंडी
माझ्यामते
माझा तरी
प्रतिसादांसाठी सर्वांचे धन्यवाद