Skip to main content

प्रकाशचित्र संपादन प्रणाली

लेखक गणा मास्तर यांनी बुधवार, 06/05/2009 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी प्रकाशचित्र संपादनासाठी विंडोज विस्टावर किंवा उबंटुवर वापरता येणारी मोफत संगणक प्रणाली शोधत आहे. पिकासामध्ये बर्‍याच संपादनसुविधांचा अभाव जाणवतो आणि फोटोशॉप विकत घेणे मला परवड्णारे नाही. जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

वाचने 2876
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

हे जे काही लिहिले आहे ते कळाले नाही, मराठीत लिहा ! --अवलिया

माझ्या मते जिंप (gimp) दोन्हीवर चालते. जिंप लिनक्सवर नक्की चालते. फोटोशॉपएवढं चांगलं नसलं तरी अनेक साध्या गोष्टी करता येतात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>माझ्या मते जिंप (gimp) दोन्हीवर चालते. जिंप लिनक्सवर नक्की चालते. फोटोशॉपएवढं चांगलं नसलं तरी अनेक साध्या गोष्टी करता येतात. बरोबर आहे. दोन्हीवर चालते. मी संगणकावर जेंव्हा उबंटू घातले तेंव्हा ते त्या पॅकेजमधून आलेच होते. विंडोज वर सहज घालता येते.

गिंप वापरुन बघतो. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

गिंप गिंप आणि गिंप... फुकट आणि सोयीचे आजही डाऊनलोड कीजीए और इस्तेमाल कीजीए ('गरुडछाप गरुडछाप गरुडछाप.....गरुडछाप' या चालीवर')

"जिंप" म्हणतात ना त्याला ? विंडोज आणि लिनक्स (कुठलेही) वर नक्की चालते. - अगोचर