मी गेले बरेच वर्षे व्हाट्सअँप वापरत आहे . पण नोव्हेंबर २०२२ पासून माझे whatsapp ब्लॉक करण्यात आले आहे . ह्या संदर्भात मी Meta शी ई-मेल मार्फत विचारणा केली असता computerised जनरेटेड रिप्लाय आला तो येणेप्रमाणे --
Hi,
Our system flagged your account activity as a violation of our Terms of Service and banned your phone number. Your account will remain banned as a result of the violation.We recommend carefully reviewing the “Acceptable Use of Our Services” section of our Terms of Service to learn more about the appropriate uses of WhatsApp and the activities that violate our Terms of Service. You can learn more about how to use WhatsApp responsibly in this Help Center article.Please keep in mind, WhatsApp reserves the right to enforce its policies in accordance with its Terms of Service.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...आणि हा रिप्लाय bot जनरेटेड असल्यामुळे त्यातील नेमके कोणत्या कारणामुळे माझे व्हाट्सअँप ब्लॉक झाले आहे हे कळण्यास मार्ग नव्हता. बरेच वेळा ई-मेल करून सुद्धा हेच उत्तर. त्यानंतर मी गूगल वर ह्यासंदर्भात माहिती मिळते का ? जंग जंग पछाडले परंतु मला काहीच माहिती मिळाली नाही पण एका लोकप्रिय वर्तमान पत्रातील बातमी निदर्शनास पडली ती अशी की -- According to WhatsApp’s monthly user safety report, the instant messaging service banned over 2.3 million Indian users in the month of August alone.
त्यानंतर जानेवारी २०२३ साधारण परत व्हाट्सअँप चालू करून बघण्याचा प्रयत्न केला आणि चक्क १/२ दिवस चालूही झाले आणि परत ब्लॉक झाले. नंतर बऱ्याच वेळा प्रयत्न केला मात्र --This account cannot use WhatsApp असा मेसेज येतोय. त्याचप्रमाणे बेल्जियम, बेलारुस अश्या ठिकाणाहून काही नंबरद्वारा मला व्हाट्सअँप वर hi टाकून बोलण्याचा प्रयत्न होत असे पण मी त्या नंबर ना स्पॅम समजून कोणताही प्रतिसाद न देता ब्लॉक करत असे. त्याचप्रमाणे माझ्या मोबाईलद्वारे अचानक ISD कॉल्स लागत होते तेही लक्षात न येता. त्यामुळे मला लोकप्रिय मोबाईल कंपनीने २ वेळा ISD कॉल्स आकारले माझी काही चूक नसताना देखील.
काही दिवसाने माझ्या नावावर असलेल्या अजून २ मोबाईल नंबर्सने व्हाट्सअँप चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु ते दोन्ही नंबर्स व्हाट्सअँपने ब्लॉक केले ते आजतागायत...
वि . सु . मी आजमितीपर्यंत व्हाट्सअँप वर कोणतेच स्पॅम मेसेजेस पाठवले नाहीत. (... एवढा वेळच नसतो.)
फारच मनस्ताप झाला आहे.. व्हाट्सअँप वापरता येत नाही म्हणून नाही पण जेव्हा एखादे महत्वाचे काम असते ऑफिसचे किंवा इतर महत्वाची माहिती आदान - प्रदान करण्याची तेव्हा फारच पंचाईत होते. आणि व्हाट्सअँप ब्लॉक झाले आहे असे सांगितल्यावर समोरच्याच्या चेहऱ्यावर मी दहशतवादी असल्यासारखा आविर्भाव असतो.
मला जाणून घ्यायचे आहे की वरील अनुभव कोणास आला आहे का ? असल्यास त्यावर काही करण्यायोग्य मार्ग, पर्याय, उपाययोजना तज्ज्ञ, तंत्रज्ञ मीपाकरानी सुचवाव्यात.
धन्यवाद !
वाचने
3847
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
१) क्रोम किंवा इतर कोणत्या
..... रामा, शिवा, गोविंदा
In reply to १) क्रोम किंवा इतर कोणत्या by श्रीगुरुजी
अॅप...
..असे काहीच केले नाही.
In reply to अॅप... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचा फोन हॅक झाला असावा असचं
माझे पण हेच मत आहे.
In reply to तुमचा फोन हॅक झाला असावा असचं by शाम भागवत
ठीक आहे.
In reply to माझे पण हेच मत आहे. by आनन्दा
दाट शक्यता
In reply to तुमचा फोन हॅक झाला असावा असचं by शाम भागवत
तुमचा फोन नंबर बंद केलाय.
मग नवीन क्रमांक व नवीन चतुर
In reply to तुमचा फोन नंबर बंद केलाय. by कंजूस
कल्पना
In reply to मग नवीन क्रमांक व नवीन चतुर by श्रीगुरुजी
IMEI ब्लॉक
In reply to तुमचा फोन नंबर बंद केलाय. by कंजूस
एक सुचना - या मधे तुमचा
मोलाची माहिती
In reply to एक सुचना - या मधे तुमचा by सिरुसेरि
पॉईंट आहे.
ब्रोबर.
In reply to पॉईंट आहे. by कंजूस