✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऑफीस ट्रीप - मदत हवी आहे

च
चांदणे संदीप यांनी
Mon, 05/08/2023 - 16:40  ·  लेख
लेख
नमस्कार सुजाण मिपाकरहो! ___/\___ तर शीर्षकातल्या उल्लेखाच्या अनुषंगाने थोडक्यात सांगायचे झाल्यास, आमच्या ऑफीसमधील सर्वच स्टाफसाठी स्ट्रेसबस्टर म्हणून एक उन्हाळी सहल करावी असे संचालक मंडळाने ठरवले. त्यानुसार ऑफीसात जवळपास आठेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ठिकाण ठरवणे हा मुख्य विषय असतो. बरीच डोकी खल करत असल्यामुळे की काय ठिकाण काय ते ठरेना. बजेट जाहीर झालेले नसले तरी ठिकाण ठरल्यानंतर ते अ‍ॅप्रूव्ह होईल असा एक संचालक मंडळाचा सूर आहे. तरीपण अंदाजे १.५ ते २ लाख इतके बजेट असण्याची शक्यता आहे. सर्व डोकी मिळून २५ ते ३० होतात. ऑफीस पब्लीकच्या चर्चेत असलेली ३ ठिकाणे क्रमाने; १) दक्षिण गोवा २) दिवेआगार बीच ३) गरूडमाची (ताम्हीणी घाट). मला विचाराल तर गरूडमाची हा पर्याय ठीक वाटतो. पण ह्या रखरखीत उन्हाळ्यात याच्यापेक्षा काय चांगले पर्याय असू शकतात हे मला जाणून घ्यायचे आहे. कुणी म्हणेल उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्यात वगैरे ट्रीप काढा पण मेंब्रांचे म्हणणे पडते की कंपनीने आत्ता मनावर घेतलेय गेल्या पाच वर्षात, अजून पुढे ढकलले तर उगीच बेत रद्द व्हायचा. तर मिपाकरहो, २५-३० च्या ऑफीस ग्रूपसाठी एक-दोन दिवस मुक्कामी अशी कुठली ठिकाणे तुम्ही सुचवाल? आपल्या मदतीसाठी आगाऊ आभार! ___/\___
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9434 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

Organiser होऊ नका.

कंजूस
Mon, 05/08/2023 - 17:57 नवीन
उन्हाळ्यामुळे रुमवर राहून गप्पा पत्ते वगैरे असेल तर टुअर आयोजक गाठा. माथेरानचाही विचार करा.
  • Log in or register to post comments

कंजूस काका

चांदणे संदीप
Mon, 05/08/2023 - 18:14 नवीन
तीशीच्या आसपासची जास्त मेंबर्स आहेत त्यामुळे कोणीही रूमवर बसणार नाहीत हे नक्की. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हे जमतय का ?

शेर भाई
Mon, 05/08/2023 - 17:59 नवीन
श्री. वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र (आपल गाव), मु. पो. बेलदरे, ता. कराड, सातारा www.aaplagaon.com
  • Log in or register to post comments

शेर भाई

चांदणे संदीप
Mon, 05/08/2023 - 22:07 नवीन
धन्यवाद! चांगले ठिकाण दिसतंय. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

किती रात्रींचा मुक्काम असेल?

टर्मीनेटर
Mon, 05/08/2023 - 18:00 नवीन
किती रात्रींचा मुक्काम असेल?
  • Log in or register to post comments

टर्मीनेटरजी

चांदणे संदीप
Mon, 05/08/2023 - 18:10 नवीन
कमीत कमी १ आणि जास्तीत जास्त २ रात्रींचा मुक्काम असेल. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

ओके... 'स्ट्रेसबस्टर' म्हणून

टर्मीनेटर
Mon, 05/08/2023 - 18:39 नवीन
ओके... 'स्ट्रेसबस्टर' म्हणून उन्हाळी सहल हा उद्देश असल्याने ठिकाण तसे फारसे महत्वाचे नाही, पण ते फार लांब असू नये नाहीतर जाण्या-येण्याचाच एवढा फटिग यायचा कि परतल्यावर स्टाफ मधले अनेक मेम्बर्स दोन दिवस ऑफिसला दांड्या मारायचे 😀 वर कंजूस काकांनी म्हंटल्या प्रमाणे तीसेक जणांसाठी तुम्हि दिलेल्या बजेटमध्ये 'माथेरानला' एक रात्र - दोन दिवस खओ-पिओ ऐश करो अशी सहल चांगल्या प्रकारे होऊ शकेल, किंवा तेवढ्याच खर्चात दोन रात्री - तीन दिवस अशी महाबळेश्वरची सहल करता येईल (माथेरान महाबळेश्वरपेक्षा निवास आणि खानपानाच्या बाबतीत बऱ्यापैकी महाग आहे). तुमच्या सुदैवाने तेव्हा पाउस पडल्यास भर उन्हाळ्यात पावसाळी सहलिची मजाही लुटता येइल! तसेच मुळशी जवळ एक खूप चांगले, बोटिंग वगैरेची सोय असलेले निसर्गरम्य रिसॉर्ट आहे, त्याचे नाव आठवत नाही मित्राला विचारून कळवतो. आणखीनही काही तुमच्या पुणे जिल्ह्यातली ठिकाणे सुचली तर अपडेटवतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

धन्यवाद!

चांदणे संदीप
Mon, 05/08/2023 - 22:00 नवीन
पुढच्या प्रतीसादाची वाट बघतो. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

तारर्कर्ली

कर्नलतपस्वी
Mon, 05/08/2023 - 18:43 नवीन
तारर्कर्ली हे एक सुंदर ठिकाण आहे. पुणे तारर्कर्ली अंतर-१००० दोन्ही बाजुने. ऑफ सिझन असल्यामुळे राहाण्यासाठी भरपुर जागा व स्वस्त मिळण्याची शक्यता. सिंधुदुर्ग ते बॅक वाॅटर, स्कुबा डायव्हिंग आणी देवबाग ते सिंधुदुर्ग विवीध रंगी समुद्र किनारा. मी नुकताच स्वतःच्या गाडीने जाऊन आलो. बजेटबाहेर जाणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद कर्नलसाहेब

चांदणे संदीप
Mon, 05/08/2023 - 22:02 नवीन
मी मागे तारकर्ली आणि आजूबाजूला भटकून आलोय. बघूया हे सांगून बघतो टीमला. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

तापोळा

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 05/08/2023 - 20:21 नवीन
हा पण एक छान पर्याय आहे. पुण्याहुन जायला(सातार्‍याहुन) ५-६ तास लागतील. मेढा वरुन खाली उतरा. कोयना बॅकवॉटर ला लागुन अनेक रिसॉर्ट आहेत. सकाळी ३-४ हजार रुपये जास्तीचे दिलेत तर लाँच ने वासोटा दाखवुन आणतील. नाहीतर तिथेच कयाकिंग करता येईल. रात्री गप्पा,गाणी वगैरे. वाटले तर तिथुन येताना व्हाया पाचगणी येऊन वाई ,धोम धरण बघु शकता. मी ईथे राहीलो होतो. https://www.riverviewagroresort.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद मेहेंदळे साहेब

चांदणे संदीप
Mon, 05/08/2023 - 22:05 नवीन
आपण सुचवलेली जागाही उत्तम आहे. ठिकाण ॲडवले आहे लिस्टीत. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

तापोळा खरोखर अतिशय सुंदर

गवि
Tue, 05/09/2023 - 07:32 नवीन
तापोळा खरोखर अतिशय सुंदर ठिकाण आहे. पण तिथे वेगवेगळ्या सिझन्समधे जाऊन आल्याने हे सांगू इच्छितो की आत्ता तिथे तलाव नगण्य आणि रखरखीत मोकळे मातीचे क्रिकेट मैदान जास्त असते. एकूण उन्हाळा सर्वत्र कडक असल्याने नॉन एसी घरगुती शेतीघर असे पर्याय उन्हाळ्यात अगदी टाळा. एसी रिसॉर्ट निवडा. दीड लाखाच्या आत पंचतारांकित मिळणे अवघड आहे. पण त्रितारांकित मिळेल. तरीही एकदा प्रकृति रिसॉर्ट काशिद इथे चौकशी करा. महाग असले तरी खणखणीत पैसा वसूल होईल. तीस लोकांचा मोठा ग्रुप असला की ते बऱ्यापैकी कमी करू शकतील. त्यांची बरीच प्याकेजे सर्व जेवणे आणि संध्याकाळी हाय टी, स्नॅक्स असे सर्व included असतात. डोक्याला ताप नाही. प्रायव्हेट बीच देखील आहे संध्याकाळी जायचे तर. जेवण ब्रेकफास्ट सर्व स्प्रेड भव्य. Five star. कंपनीची टूर काढताना कर्मचारी बेहद्द खूष आणि तृप्त होऊन परत येणे आवश्यक असते. यादगार टूर हवी, पुढे अनेक वर्षे आठवणी निघतात. तेव्हा जितके शक्य होईल तितके प्लीज डू नॉट कट द कॉर्नर्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

समुद्राजवळचे ठिकाण

कंजूस
Tue, 05/09/2023 - 10:12 नवीन
यापुढे इतर ठिकाणे बाद होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्स गविकाका!

चांदणे संदीप
Tue, 05/09/2023 - 14:00 नवीन
हे ठिकाण आवडल्या गेले आहे. लिस्टीत अ‍ॅडवले गेले आहे. फायनली फायनल काय होतंय ते कळवीनच धाग्यावर. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मागच्या विकांताचा अनुभव

तुषार काळभोर
Mon, 05/08/2023 - 22:55 नवीन
15 विभागप्रमुख आणि 15 त्यांचे सहकारी + महाव्यवस्थापक + हेचार चे 2 जण २८-२९ एप्रिल ला महाबळेश्वर येथे गेलो होतो. नाव होते लीडर्स मीट. पण ती स्ट्रेस बस्टर सहलच झाली एक रात्री मुक्काम असलेली. २८ ला सकाळी ५.३० वाजता बस स्पाइन रोडवरून निघाली. पिंपरी चिंचवड मनपा, पुणे मनपा क्षेत्रातील ६ पिकप पॉइंट्स वरून सर्वांना उचलून साडे नऊला Regenta महाबळेश्वर येथे पोचलो. पोचल्यावर बुफे न्याहारी. मग 1 वाजेपर्यंत वेगवेगळे प्रेझेंटेशन. मग बुफे जेवण. पाच वाजेपर्यंत पुन्हा वेगवेगळे प्रेझेंटेशन. पाच ते आठ ब्रेक. त्या दरम्यान काहींनी आराम केला, काही ऑफिसचे काम करत बसले, काही मार्केटमध्ये गेले. साडेसात ते अकरा विविध कलादर्शन (आमचंच!). गायन, नृत्य, मिमिक्री, दंगा. सोबत पिणे आणि चखना खाणे. अकरा ते बारा बुफे जेवण (कुणालाच भूक नव्हती). एक दीड पर्यंत मग (तुलनेने) गार हवेत गप्पा. मग आपापल्या कॉटेजमध्ये झोपणे. सकाळी पाच वाजता आम्ही काही जण उठून दीड किमी चालत विल्सन पॉईंट येथे सूर्योदय पाहायला गेलो. बाकीचे (सकाळी सात वाजता!!) सनसेट पॉईंट बघायला गेले. आठ ते नऊ बुफे न्याहारी. मग बाहेरचा एक ट्रेनर होता, त्याने चार पर्यंत ट्रेनिंग दिलं. (तेच ते, तेच ते. डोळे बांधून असं करा, हात बांधून तसं करा. आपण यातून काय शिकलो. तेच ते!). मध्ये एक ते दोन बुफे जेवण. साडे चारला निघालो. मध्ये mapro मध्ये थांबवून भरपूर खरेदी. (माझा तीन महिन्यांपूर्वीच भेटीचा अनुभव असल्याने, तिथे मी एक्सपर्ट होतो ;)). मग विनाथांबा त्या त्या पॉइंट्स वर लोकांना टाकून दिले आणि ही स्ट्रेस बस्टर सहल कम ट्रेनिंग कम मीट संपली. खर्च कंपनीने केला. Map location Regenta MPG Club Mahabaleshwar 02168 270 027 https://maps.app.goo.gl/RTzoYXjeJ7WJc3Bo6 लोकेशन: उत्तम. Valey view. प्रशस्त जागा, प्रशस्त रूम्स. जेवण : उत्तम दर्जा, कमी मसालेदार. शाकाहारी, मांसाहारी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, परदेशी सर्व चवीच्या लोकांना आवडेल असे. मार्केट रोड च्या पूर्व टोकापासून चालत दहा मिनिटे अंतर. गाड्यांची सोय असेल तर सकाळी संध्याकाळी काही पॉइंट्स बघता येतील. विल्सन पॉईंट, सनसेट पॉईंट एक किमी अंतरावर. रूम्स : आरामशीर, वातानुकूलित. मोबाईल रेंज फारशी चांगली नाही. मात्र हॉटेलचे वायफाय चांगले आहे.
  • Log in or register to post comments

मध्ये mapro मध्ये थांबवून

टर्मीनेटर
Tue, 05/09/2023 - 01:50 नवीन
मध्ये mapro मध्ये थांबवून भरपूर खरेदी. (माझा तीन महिन्यांपूर्वीच भेटीचा अनुभव असल्याने, तिथे मी एक्सपर्ट होतो ;)).
अच्छा! म्हणजे आपल्या कट्ट्यासाठी त्यावेळी मॅप्रो गार्ड्न हे ठिकाण सुचवण्यामागे एवढा दुरगामी विचार होता होय तुमचा 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

धन्यवाद हिंदकेसरी!

चांदणे संदीप
Tue, 05/09/2023 - 07:55 नवीन
प्रतिसादाबद्दल अनेक आभार्स! महाबळेश्वर हा पर्याय उन्हाळ्यात खरंच चांगला आहे. तुम्ही सुचवलेले रिसॉर्टही उत्तम आहे. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

ठिकाण कोणतेही असो . .

कंजूस
Tue, 05/09/2023 - 06:20 नवीन
फार दूर असू नये. आणि कंपनी खर्च करत असेल तर गोष्ट वेगळी. पण स्वतः आयोजन टाळा मोठ्या ग्रूपचे.
  • Log in or register to post comments

बरोबर

चांदणे संदीप
Tue, 05/09/2023 - 07:57 नवीन
कंजूस काका, खर्च कंपनी करत आहे. तीन-साडेतीन प्रवासासाठी सगळेजण तयार आहेत त्यामुळे तेवढ्या वेळेच्या परिघात काय काय येते ते पहायचे आहे. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मुरुडला काही चांगली हॉटेल्स आहेत.

कंजूस
Tue, 05/09/2023 - 10:32 नवीन
मुरुड (जंजीरा वाले) . हॉटेल्स चांगली आहेत. ओनलाइन बोलणी करून काम होईल. मार्ग. पुणे -एक्सप्रेसवे -डाइवर्शन -खोपोली- पाली- नागोठाणे -रोहा -मुरुड. साडे चार तास. रोहा मुरूड रस्ता फणसाड अभयारण्य गेटवरून जातो. पालीचा गणपती. मुरुड गावात एक दत्तमंदीर.,समुद्र किनारा,बाजार मुरुडच्या आसपास -excursion १)जंजीरा. २)दिवेआगार (कार नेणारी फेरी आहे.) ३)काशिद किनारा -कोरलई किल्ला -आणि साळावचे बिर्ला मंदिर.परत. ठिकाणांची लयलूट आहे खाणे -वेज नानवेज हॉटेल देईलच. शिवाय पाटील खानावळ प्रसिद्ध. एकूण धार्मिक किंवा इतर पर्यटनास भरपूर वाव आहे.
  • Log in or register to post comments

सगळा मोठा प्रतिसाद ऊडाला हे

nutanm
Tue, 05/09/2023 - 10:40 नवीन
सगळा मोठा प्रतिसाद ऊडाला हे कसा ऊडाला कळलेच नाही महाबळेष्वर अजिबात आवडले नाही व काय नाही आवडले लिहीले पण ऊडाला वपरत इतका मोठा लिहिण्याचा संयम नाही म्हणून एवढ्यावरच पुरे करते महाबळेश्र्वर जाउ नाही 5 स्टारचे माहित नाही.
  • Log in or register to post comments

सध्याचे हवामान पहाता कोल्हपूर

अमर विश्वास
Tue, 05/09/2023 - 10:41 नवीन
सध्याचे हवामान पहाता कोल्हपूर / अंबा घाट / गगनबावडा परिसर उत्तम. पूर्वी एकदा पावनखिंड रिसॉर्ट (अंबा घाट) मधे आऊटडोअर इव्हेंट केली होती .. पण तिथले रूल्स वेगळे आहेत .. सर्वांना पचनी पडतील असे नाही ...
  • Log in or register to post comments

https://www.palmwoodsretreat

सुबोध खरे
Tue, 05/09/2023 - 11:47 नवीन
https://www.palmwoodsretreat.com/ सुंदर जागा आहे. जेवण अप्रतिम आहे. तीन वेळेस जाऊन आलो आहे पुण्यापासून जवळ असल्याने स्वतःच्या वाहनाने सुद्धा जाता येईल किंवा बस करून. प्रवासात वेळ वाया जाणार नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद खरे सर!

चांदणे संदीप
Tue, 05/09/2023 - 15:12 नवीन
सुंदर जागा आहे ही. ह्या ट्रीपच्या निमित्ताने होईल का नाही माहिती नाही पण पुढे कधीतरी फॅमिली सोबत नक्की जाईन इथे. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१

तुषार काळभोर
Tue, 05/09/2023 - 17:25 नवीन
Weekend getaway साठी उत्तम पर्याय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

दि हिडन ओअ‍ॅसिस

चौथा कोनाडा
Tue, 05/09/2023 - 14:50 नवीन
दि हिडन ओअ‍ॅसिस : पुण्या पासुन एक दिड तासाच्या अंतरावर .... गराडे धरणाच्या सानिध्यात. टिपिकल अ‍ॅड्व्हेन्चर अ‍ॅक्टिव्हिटीज नाही दिसल्या ... पण निसर्गाच्या सानिध्यात छान वाटले. स्वस्त आणि मस्त. हे ट्राय करू शकता. https://www.thehiddenoasis.com/#
  • Log in or register to post comments

धन्यवाद चौथा कोनाडा साहेब

चांदणे संदीप
Tue, 05/09/2023 - 15:13 नवीन
मस्त जागा आहे ही पण. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

पण एक विचारतो ....

कंजूस
Tue, 05/09/2023 - 19:03 नवीन
(अवांतर आहे) ऑफिसातल्या लोकांबरोबर पिकनिकला जाऊन स्ट्रेसबस्टर का काय कसे काय शक्य होत असेल? कुठेही स्वतंत्र जावे. तिथे काय नवीन सांपल मिळत नाहीत?(गंभीरपणे घेऊ नका.)
  • Log in or register to post comments

सुप्त रोमॅण्टिक कलागुण

चौथा कोनाडा
Wed, 05/10/2023 - 12:55 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सुप्त रोमॅण्टिक कलागुण

चौथा कोनाडा
Wed, 05/10/2023 - 12:56 नवीन
पिकनिकला ऑफिसमधली लोकं मनमोकळी होतात. त्यांच्यातले सॅम्पल तरारुन वर येते ! सुप्त कलागुण दिसतात. एखादा / दी चे सुप्त रोमॅण्टिक कलागुण फुलून वर आले की स्ट्रेसबस्टरचा अनुभव येतो ! बरोबर ना ?

😜

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

=))

प्रचेतस
Wed, 05/10/2023 - 12:59 नवीन
=)) हा हा, अगदी अगदी, विशेषतः रात्रीच्या जेवणाच्याआधी हे कलागुण तर अतिशय प्रकर्षाने दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा पुरेशी आहे.

कंजूस
Wed, 05/10/2023 - 17:51 नवीन
एकटे जाऊन झाडाच्या सावलीत ताणून देणे हा मला चांगला उपाय वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कंजूस काका

चांदणे संदीप
गुरुवार, 05/11/2023 - 12:19 नवीन
झाडाखाली ताणून देणारी आजची पिढी नाहिये. त्यातल्या त्यात एकटे तर आजीबात नाही. आजची पिढी न थकता डीजेवर किंवा कसल्याही म्युजिक सिस्टीम वर तासन् तास नाचणारी आहे. त्यांच्यासाठी स्ट्रेसबस्टर काय असेल हे त्यांनाच चांगलं माहिती. आपण मारून मुटकून अमुक एक करा असं म्हणण योग्य नाही असं मला वाटतं. थोडंसं त्यांच्या पद्धतीनेही करून बघायचं, नंतर आपल आपल्याजवळ आहेच. झाडाखाली, एखाद्या ऐतिहासिक स्थळी किंवा किल्ल्यावर, म्युझियम किंवा लायब्ररी. मी तर कधी कधी जवळच्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात जातो. गाणी-बिणी म्हणतो. आपल्याला काय सगळं चालतं. सगळे तसे नसतात. सगळ्यांचा विचार करून काही गोष्टी कराव्या लागतात. ह्या ट्रीपचे आयोजन त्यातलाच एक भाग समजा. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

धागालेखकाला शुभेच्छा

धर्मराजमुटके
Wed, 05/10/2023 - 13:33 नवीन
धागालेखकाला शुभेच्छा ! वर सुचविलेल्या एकाही ठिकाणी ट्रिप जाणार नाही पण स्ट्रेस बस्टर म्हणून चांगला टाईमपास आहे. ट्रिप साठी (आगाऊ) शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments

मालक

चांदणे संदीप
Wed, 05/10/2023 - 14:18 नवीन
असं काय करता. इथे सुचवलेल्यांपैकी काही ठिकाणे ऑफिसातल्या लोकांपुढे मांडलीयेत. आता फक्त १०-२० करून एक फिक्स करायचं आहे. जे काही ठरेल ते मी इथे पोस्टवीनच. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

आता फक्त १०-२० करून एक फिक्स

टर्मीनेटर
Wed, 05/10/2023 - 14:30 नवीन
आता फक्त १०-२० करून एक फिक्स करायचं आहे. जे काही ठरेल ते मी इथे पोस्टवीनच.
गुड! कुठेही जा... पण भरपुर मजा करा...स्ट्रेसला हद्द्पार करा...आणि शक्य झाल्यास भरपुर फोटोंसहीत त्याचा वृत्तांत इथे लिहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

+१

कर्नलतपस्वी
Wed, 05/10/2023 - 14:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

"कॉर्पोरेट रिट्रीट " साठी

चौकस२१२
गुरुवार, 05/11/2023 - 04:52 नवीन
"कॉर्पोरेट रिट्रीट " साठी योग्य वाटते ह्याचा विचार करू शकता, वाई, जवळ आहे , आणि फार मोठे नाही प्रतापगड, महाबळेश्वर , धोम धरण , वैगैरे पण दिवसा करता येईल https://www.booking.com/hotel/in/metrica.en-gb.html?aid=311984&label=metrica-I9gohTfcU9sfAatQUnwVgwS541173963004%3Apl%3Ata%3Ap1%3Ap2%3Aac%3Aap%3Anes%3Afi%3Atikwd-309291194387%3Alp9069116%3Ali%3Adec%3Adm%3Appccp%3DUmFuZG9tSVYkc2RlIyh9YXORK0YJiVoOxcWODxYDaAA&sid=6c5b849b469e61ed4e253f29bd0c04e7&dest_id=-2114609&dest_type=city&dist=0&group_adults=2&group_children=0&hapos=1&hpos=1&no_rooms=1&req_adults=2&req_children=0&room1=A%2CA&sb_price_type=total&sr_order=popularity&srepoch=1683760890&srpvid=ded7a43c8d2000a1&type=total&ucfs=1&activeTab=photosGallery https://www.facebook.com/theyellowretreat.in/ https://www.youtube.com/watch?v=em8UALxQPfY
  • Log in or register to post comments

धन्यवाद चौकस जी

चांदणे संदीप
गुरुवार, 05/11/2023 - 12:21 नवीन
तुम्ही दिलेले पर्याय आणि लिंका पाहिल्या. यानिमित्ताने एक चांगली माहिती संकलित होत आहे. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

यलो

चौथा कोनाडा
गुरुवार, 05/11/2023 - 12:51 नवीन
दि यलो रिट्रीट .... 👌 👌 👌
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मे आय हॅव युवर अटेंशन प्लीज

चांदणे संदीप
Mon, 06/05/2023 - 16:27 नवीन
तर, मिपाकरहो. शेवटी गोव्याचा विजय झाला. लोकशाहीत संख्याबळापुढे सगळ्याच गोष्टी खुज्या ठरतात हे नव्याने अधोरेखित झाले (माझ्यापुरते). दक्षिण गोवा ह्या स्थळाला या महिन्याच्या ३० ला निघणे, जुलै १ आणि २ गोव्यात मुक्काम, ३ जुलै ला पुण्यात आणि ४ जुलै ला ऑफिस असा कार्यक्रम ठरला आहे. सर्वांनी सुचवलेली ठिकाणे अगदीच छान आहेत. सर्वांचे त्याबद्दल आभार. गविकाकांची प्रकृती रिसॉर्ट, काशीद ही सुचवणी अंतिम फेरीपर्यंत गेली आणि थोड्याशा फरकाने मागे राहिली. असो, सर्व ठिकाणे वैयक्तिक यादीत अ‍ॅडवून टाकलेली आहेत. मिपाच्या कट्ट्यासाठीसुद्धा यांपैकी एखाद्या ठिकाणाचा विचार व्हावा अशी मिपामालक-चालक वाचक यांना विनंती! :) सं - दी - प
  • Log in or register to post comments

हॅ ! हॅ ! हॅ !!

धर्मराजमुटके
Mon, 06/05/2023 - 23:55 नवीन
जितं मया बघा मी वर प्रतिसादात म्हटलो होतो ना की सभासदांनी सुचविलेल्या कुठल्याही ठिकाणी सहल जाणार नाही म्हणून. ऑफीसवाल्यांनी लाज राखली हो माझी. त्यांना धन्यवाद सांगा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मुळात एक पर्याय गोवा असतो,

गवि
Tue, 06/06/2023 - 10:59 नवीन
मुळात एक पर्याय गोवा असतो, त्या वेळी ऑफिस ग्रुप अन्य कुठे जाण्याची शक्यता नगण्यच. तरी सांगून बघितले. मानो या न मानो.. ऑफिस टूरचे उद्देश, रादर टूरचा उद्देश (एकच असतो) आणि स्पष्ट असतो. ;-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

लोल

चांदणे संदीप
Tue, 06/06/2023 - 14:02 नवीन
=)) मलाही ते वाटलेलेच पण मी आणि आणखी एकजण असे दोघे शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहिलो. पण पब्लीक ऐकेल तर शपथ! सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

शेवटी गोवाच.

कंजूस
Tue, 06/06/2023 - 06:57 नवीन
मला ऑफिसमधले एक दिवसीय ट्रिपसाठी विचारत आणि मी माहिती देत असे. तिकडे ते कुठेही जाणार नाहीत हे नक्कीच असे. (चर्चा होऊन शेवटी ठाणे उपवनला जाऊन झाडाखाली बसून पिणार हे दरवर्षीचा कार्यक्रम ठरलेला.) तरीही चर्चा भरपूर. दुसरा एक मल्याळी अधिक मराठी ग्रूप मात्र दोन दिवस वज्रेश्वरीला जायचा. चांगली हॉटेल रूम घेऊन तिथे जेवण स्वतःच बनवत. मल्याळी आणि मंगळुरी यात तरबेज असतात. तिसरा एक ग्रूप महिन्यातून एकदा शनि-रवि-सोमवार मिळणाऱ्या सुटीचा उपयोग करून घेणारा होता. एक सुमो/ट्रॅक्स मात्र केलेली शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी ऑफिसच्या गेटवर बोलावत. ती मंगळवार सकाळच्या ड्युटीला परत आणे. याप्रमाणे वर्षात तीन तरी पिकनिक करत. त्यातून वेगवेगळी ठिकाणे सहज होत. गोवा, अजंठा वेरूळ,भंडारदरा,कोकण इत्यादी. चर्चा नाहीच. एक दोन जण ठरवत या वेळी अमुक ठिकाणी जायचे. स्त्रिया/ महिला नसल्याने पटापट निर्णय होत. त्यांना नेता येईल अशी ठिकाणे आणि प्रवास यावर मर्यादा असतात.
  • Log in or register to post comments

स्त्रिया/ महिला नसल्याने पटापट निर्णय होत.

मुक्त विहारि
Tue, 06/06/2023 - 10:39 नवीन
प्रचंड सहमत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

?

वामन देशमुख
Tue, 06/06/2023 - 10:47 नवीन
स्त्रिया/ महिला नसल्याने पटापट निर्णय होत.
मी मिपाच वाचतोय ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

यात काय चूक आहे?

कंजूस
Tue, 06/06/2023 - 11:38 नवीन
वय,तसेच महिला/पुरूष यांच्या आवडी फार भिन्न असतात. ऑफिस ट्रिपमध्ये वयाचा प्रश्न येत नाही आणि स्ट्रेस/थकवा काढण्यासाठी जाणारे धार्मिक स्थळांचा आग्रह धरत नाहीत. राहिला मुद्दा महिला/पुरूष हा. महिला मंडळात गप्पा(गॉसिप?) मारणे आणि खरेदी आवडते. गोव्यात जाणाऱ्या पुरुषांची आवड काय असणार हे सांगायला नको. तर काय 'त्यांच्या' कलाने घेणे आणि तोंड बंद ठेवणे एवढेच शिल्लक राहाते. ---- आता समजा हैदराबाद ट्रिप कौटुंबिक आहे तर काय फाटे फुटतात ते पाहा - १)मी आणि मोठे काका - सालारजंग बघू सावकाश. गोवळकोंडा. २)महिला मंडळ - चार मिनार जवळचा बांगडी बाजार किंवा मोती बाजार हुसेनसागर जवळ खरेदी. साड्या पाहणे. ३)लहान मुले - नेहरू प्राणी संग्रहालय. ४) तरुणवर्ग - रामोजी फिल्मसिटी,खादाडी. ५) ज्येष्ठ नागरिक - श्रीशैलम. तर हे सर्व एकाच सहलीत जमणार कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा