लोहगड, भाजे लेणी--फोटोवारी
नमस्कार मंडळी
पहीलेच सांगतो की भटकंती विभागात एरर येत असल्याने ईथे धागा काढला आहे त्याबद्दल क्षमस्व.
एप्रिल्/मे महीन्याचे ऊन तापत आहे, त्यामुळे हे काही भटकंतीचे दिवस नव्हेत गड्या. पण मुलाची परीक्षा संपुन पुढचे क्लास सुरु व्हायला २-३ दिवस होते, आणि अभ्यास "करुन" तो आणि "बघुन" मी कंटाळलो असल्याने एक तरी वन डे करावा असा विचार केला. त्याचे १-२ मित्रही तयार झाले. मग काय, विकांताला निघालो गाडी घेउन सकाळी ६-६.१५ वाजता. थंड वातावरण होते, ट्रॅफिकही कमी होते, वाटेत घोरावडेश्वर लागले, म्हटले जरा वॉर्म अप होईल, म्हणुन गाडी बाजुला घेतली आणि निघालो वर जायला. डावीकडे सूर्यदेव वर येत होते.
उजवीकडे सोमाटणे फाट्याचा गणपती बाप्पा दिसत होता
पाठीमागे बेगडेवाडी स्टेशन
वर पोचलो आणि एक फोटो तो बनता हय
बरीच मंडळी मित्र कुटुंबियांसहीत कुत्रे वगैरे सहीत आलेली दिसली. पुणेकरांचा व्यायामाचा उत्साह बघुन गदगदुन आले. त्याच आनंदात खाली उतरलो आणि भरपेट नाश्ता केला.
पोटोबा झाल्यावर भरकन पुढे निघलो आणि मळवलीला डावीकडे आत शिरलो. रेल्वे फाटक आणि एक्स्प्रेस् वे वरचा पूल ओलांडुन पुढे आलो , भाजे गावात टोल रुपी खंडणी दिली आणि भाजे लेण्यांच्या पायथ्याशी गाडी लावली. वेळ सुमारे ९ वाजताची.
उन फार नसल्याने पटकन वर येउन तिकिटे काढली आणि पुढे झालो. वाटेत एक मास्टिफ दमुन ह्यॅ ह्यॅ करत बसला होता त्याला पाणी पाजले आणि त्याच्या मालकाला तिकिटासाठी ५०० रुपये सुट्टे देउन दोघांचा दुवा घेतला. (मला खरेतर तो लॅब वाटला होता पण मुलाने चूक लक्षात आणुन दिली--काय बाबा? तुला ईतके पण समजत नाही वगैरे वगैरे. ही नवीन तूनळी पिढी फारच स्मार्ट बुवा. आमच्यावेळी तर वगैरे वगैरे)
पुढचे सगळे फोटो वर्णन करण्याची माझी कुवत नसल्याने प्रचेतस यांना निमंत्रित करतो.
इथुन लोहगडाचा विंचुकाटा खुणावत होता
त्यामुळे झपझप खाली उतरलो, एक सरबत प्यायलो आणि गाडी लोहगडाकडे घेतली. वाटेतला अवघड घाट पार करताना ड्रायव्हिंगचा कस लागला. ७० अंशात गाडी वळवताना आणि चढवताना जरा फाफललीच. नशीब समोरुन एखादी गाडी आली नाही. १०.३० च्या सुमारास लोहगड-विसापुरची खिंड पार केली आणि गावात आलो. उन व्हायच्या आत वर पोचु म्हणुन पटकन गाडी पार्क केली आणि चढायला लागलो.
लोहगडावर अजुनही बुरुज्,दरवाजे,मारा करायच्या गंज्या, तटबंदी फारच चांगली टिकुन आहे, त्याबद्दल देवाचे आणि शासनाचे आभार मानावे तितके कमीच
पहारेकर्यांच्या देवड्या
लोहगडावरुन विसापुर चे दर्शन
गणेश दरवाजा
नारायण दरवाजा
हनुमान दरवाजा
हनुमान दरवाज्यावरील सुबक कोरीव काम
एका सुंदर अँगलने दिसलेला तिकोना किल्ला
तुंग(डावीकडे) आणि तिकोना (उजवीकडे)एकाच दृष्टीक्षेपात
दर्गा
तलाव
बेडुकराव शिकारीच्या शोधात. ईथे बराच वेळ व्हिडिओ करायचा प्रयत्न केला पण त्याचा चतुर पकडतानाचा क्षण काही टिपता आला नाही. मुलांनी चपटे दगड फेकुन डबलिंग वगैरे हौस भागवुन घेतली. ओंजळीत टॅड पोल वगैरे पकडुन झाले.अजुन काही वेळ थांबलो तर बाटलीत आणि खिशात मासे किवा बेडुक भरुन घरी घेउन येतील अशी भिती वाटल्याने त्यांना हाकलले आणि पुढे झालो.
खांबटाके(एकुणातच किल्ल्यावर पाणी चिकार आहे)
विंचुकाटा- पण वेळे अभावी ईथे गेलो नाही, फक्त वरुनच बघितला.
अष्ट्कोनी तलाव
सगळ्यात वरच्या टोकाला हे नवीनच उद्योग केले आहेत एका विशिष्ट जमातीने
साडेबारा वाजले होते. ऊन तळपत होते आणि पोटात कावळे कोकलत होते. टोकावरुन एक सुंदर व्ह्यु मिळाला तो घेउन उतरणीला लागलो.
एक वाजता खाली येउन दिडच्या सुमारास वेट अँड जॉय जवळ एका हॉटेलात जेवलो आणि परतलो.(समाप्त)
वाचने
6101
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
वा !
सुंदर!
मस्तच
सुंदर फोटोस्टोरी
सुंदरच फोटो आहेत.
In reply to सुंदरच फोटो आहेत. by कंजूस
१)लक्ष्मी कोठार बंद केलं आहे
सर्व वाचकांचे धन्यवाद!!
पुढील पिढीसोबत वेळ काढून
In reply to पुढील पिढीसोबत वेळ काढून by श्रीगणेशा
पुढिल पिढीसोबत भटकंती
भटकंती एकदम मस्त झालेली दिसते
मस्तच भटकंती!भाजे पाहायचं आहे
In reply to मस्तच भटकंती!भाजे पाहायचं आहे by Bhakti
होय
In reply to मस्तच भटकंती!भाजे पाहायचं आहे by Bhakti
भाजे पाहायचे आहे.....
झकास भटकंती!
In reply to झकास भटकंती! by टर्मीनेटर
धन्यवाद!!
मस्त गड लेणी भटकंती