श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात:
स्वयें आत्महत्या करणे
तो तमोगुणl (2.6.10)
तम म्हणजे अंधार. अंधार हा निराशेचा आणि मृत्यूचा प्रतीक आहे. जगणे असंभव वाटून निराश झालेला व्यक्ति आत्महत्या करतो. भारतात पाउणे दोन कोटी लोक दर वर्षी आत्महत्या करतात. त्यात 80 टक्के साक्षर असतात. 15 ते 40 वय गटात सर्वात जास्त लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचा निर्णय करणार्याचा असला तरीही काही आत्महत्या करणारे दुसर्यांवर दोष लावतात. मी मरणार पण दुसर्यालाही ही शांतिने जगू देणार नाही ही तमोगुणी वृती. आत्महत्येचे प्रमुख कारण प्रपंचात अयशस्वी होणे अर्थात घरातील कटकटी, शिक्षण, प्रेम भंग, रोजगार, अहंकारला ठेस लागणे इत्यादि इत्यादि. माझ्या दृष्टीने खरे कारण काम, क्रोध, निद्रा, आळस, अवास्तव अहंकार, मनात येईल तसे वागणे, माझ्या हिशोबाने जगाने चालले पाहिजे, दिवस रात्र नकारात्मक विचार करत राहणे इत्यादीं तमोगुणांच्या आहारी जाऊन माणूस भ्रमिष्ट होतो. आजच्या भाषेत म्हणायचे तर डिप्रेशन मध्ये जातो आणि आत्महत्या करतो. त्यात सोशल आणि दृश्य मीडियात अपराध आणि आत्महत्येचे महिमा मंडन किंवा त्यावर अनावश्यक चर्चा ही तरुणांच्या मनातील नकारात्मक विचारांना उत्तेजित करते. तरुणांच्या आत्महत्येचे एक कारण शैक्षणिक संस्थामध्ये पसरलेली नकारात्मक विचारधारा. तरुणाला वाटू लागते आजच्या सामाजिक व्यवस्थेत त्याच्या सारख्या तरुणांचे शोषण होत आहे. या काल्पनिक अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ति त्यात नाही त्यापेक्षा मरणे बेहतर. अश्या नकारात्मक विचारधारेच्या आहारी जाऊन रोहित वेमुला सारखे शिक्षित ही आत्महत्या करतात. असो.
वाचने
3900
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
निराशा - डिप्रेशनची शेवटली पायरी म्हणजे आत्महत्या.
आत्महत्या करावीशी वाटणे हा
हे क्रमांक - Psyco-Therapists चे आहेत की Psychiatrists चे
In reply to आत्महत्या करावीशी वाटणे हा by भागो
हे क्रमांक कुणाचे आहेत
In reply to हे क्रमांक - Psyco-Therapists चे आहेत की Psychiatrists चे by चित्रगुप्त
मनोचिकित्सकांकडे जावे याबद्दल शंकाच नाही, पण ...
In reply to हे क्रमांक कुणाचे आहेत by भागो
कुठलीतरी जाहिरात वाचून अनोळखी
In reply to मनोचिकित्सकांकडे जावे याबद्दल शंकाच नाही, पण ... by चित्रगुप्त
भारतात पाउणे दोन कोटी लोक दर वर्षी आत्महत्या करतात.????
Total Number of Suicides
In reply to भारतात पाउणे दोन कोटी लोक दर वर्षी आत्महत्या करतात.???? by Trump
पावणे दोन कोटी ? हा आकडा
जगात दरवर्षी जवळपास दहा लाख
In reply to पावणे दोन कोटी ? हा आकडा by भागो
दासबोध जरूर वाचा.
लेखाचं शिर्षक छान आहे पण लेख
पाऊणे दोन लाख लिहायचे होते