प्रेम दिन : मिठी : काही क्षण कथा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
14 Feb 2023 - 8:05 am

त्याने गायीला मिठी मारली. गायीने त्याला शिंगे मारली. ..... डॉक्टर काकांनी बायकोला नवी पैठणी गिफ्ट केली. प्रेमदिन साजरा केला.

त्याने तिला मिठी मारली. तिने त्याच्या मुस्कटात मारली. हवालदार ने शिट्टी वाजवली. .....त्याच्या बापाने वकिलाची फी भरली.

त्याच्या मिठीत ती सुखावली. ... .. अबार्शनच्या लाईनीत उभी राहिली.

मौजेसाठी तिला घेऊन तो बगीच्यात गेला. धर्मरक्षक आले..... लग्नाच्या बेडीत अटकला.

आमच्या काळी नव्हता डे. मिठी कुणाला मारली नव्हती. खुन्नस की बोर्डवर काढली.

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Feb 2023 - 9:25 am | राजेंद्र मेहेंदळे

मिपावर शशक सारखा पशक(पन्नास किवा पंचवीस शब्द कथा) असा ट्रेंड चालु झालाय का?

श्वेता व्यास's picture

14 Feb 2023 - 9:58 am | श्वेता व्यास

हा हा

कर्नलतपस्वी's picture

14 Feb 2023 - 10:13 am | कर्नलतपस्वी

तीने त्याला मिठी मारली
त्याच्या पाठीत लचक भरली
बचाव बचाव करत
त्याने पतली गली पकडली

हॅप्पी डे

विवेकभौ, तुमच्या लेखनाला वेगळीच रंगत चचढते आहे, तिची लज्जत्, खुमारी काही औरच आहे. असेच लिहीत रहा.
चड्डी डे, तंबाखू डे, सायकल डे, शेंबूड डे, (पानाची-) पिच्च्च्चकारी डे, लोंबती नाडी डे, डोकेदुखी डे, डिप्रेशन डे, संडास डे, कीचन डे, अमूक डे, तमूक डे, असे अनेक 'डे' येत्या काळात येऊ घातलेत, त्यांच्यावर तुमच्या प्रतिभेने आतापासूनच 'पशक' लिहाव्यात ही विनंती.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

14 Feb 2023 - 6:05 pm | हणमंतअण्णा शंकर...

प्रेम मानवी अस्तित्त्वातला सर्वोच्च सुखद अनुभव आहे.

जी संस्कृती दोन व्यक्तींना प्रेम करण्यापासून रोखते, त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आणते, अथवा प्रेमाला नीच मानून त्याहून उच्च काहीतरी असल्याचा बेगडी आभास तयार करते ती संस्कृतीच नव्हे.

ते आईबापाचं प्रेम श्रेष्ठ, आम्ही त्यांच्याशीच व्हॅलेंटाईन डे साजरा करणार वगैरे चुत्याप्स फाट्यावर मारा तरुणांनो. ते काय तुमच्या नशीबालाच पुजलेले आहेत.

बिनधास्त, मनसोक्त, फियर्स प्रेम करा एकमेकांवर. एकमेकांना हवं नको ते पाहा, गिफ्टस द्या, आनंदी ठेवा. रुसा, फुगा, नाही पटलं तर पुढे व्हा. एकमेकांच्या शरीरावरचा कोना न कोना उपभोगा, आनंद द्या घ्या, मिठीत घ्या, नुसतेच कुरवाळा, एकमेकांच्या ओठांत तासंतास हरवून जा.. सहसंमतीने सुख मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करा. हक्क गाजवा, वेळ आल्यास सहज हक्क सोडा. संस्कृती वगैरे चिवत्या भानगडींत पडू नका. जन्मावरून रॅन्क आणि प्रिव्हीलेजेस ठरवणारी, प्रेम करू न देणारी कुठलीही संस्कृती महाभंकसच असते हे समजून घ्या. फाट्यावर मारा तिला. लग्न हेच प्रेमाचे अंतिम ध्येय आहे हा फालतू विचार काढून टाका मनातून. प्रेम शाश्वत जैविक सत्य आहे, समाज, संस्कृती वगैरे भानगडी कृत्रिम फिक्शन आहे, त्या कोसळतात, बदलतात, लयाला जातात. मानवी मनाच्या लवचिकतेचा, प्रेमाच्या सहज आविष्काराचा सन्मान ठेवा. हे वय, हा उत्साह, हे स्वातंत्र्य कधी परतून येणार नाही हे लक्षात ठेवा.

मुख्य म्हणजे या अशा किरकिरी म्हातार्‍यांना थेरड्यांना फाट्यावर मारा.

प्रेम करणार्‍या सर्व माणसांना व्हॅलेंटाईन दिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

कर्नलतपस्वी's picture

15 Feb 2023 - 9:19 am | कर्नलतपस्वी

एकमेकांच्या शरीरावरचा कोना न कोना उपभोगा, आनंद द्या घ्या, मिठीत घ्या, नुसतेच कुरवाळा, एकमेकांच्या ओठांत तासंतास हरवून जा.. सहसंमतीने सुख मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करा.

यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा.

बाकी सहमत.

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

कवी - मंगेश पाडगावकर

... हम्म! खुप वर्षांनी ही कविता परत वाचली -D

कर्नलतपस्वी's picture

15 Feb 2023 - 9:20 am | कर्नलतपस्वी

पाडगावकर राॅक्स ....

विवेकपटाईत's picture

15 Feb 2023 - 6:44 pm | विवेकपटाईत

प्रतिभेने ओथंबलेले प्रतिसाद आवडले. चित्रगुप्त सरांचा सल्ला लक्षात ठेवणार. नुकतीच सुचलेली चारोळी चीफ सेलेक्टर साठी.
पोटात औषध गेले.
विष बाहेर पडले
मोरपंख लाऊन कावळा
कांव कांव करू लागला.