लिही रे कधीतरी.
काहीही, अगदी काहीssही चालेल.
पत्र, कविता, दोनोळीची चिठ्ठी पण पळेल.
पण कागदावरच्या शाईला हुंगता आलं पाहिजे.
शब्दांवर बोट अस्संss फिरवता आलं पाहिजे.
मग कान्याच्या मागे खांब खांब खेळेन,
वेलांटीच्या तळ्यात डुबकी मारेन.
अनुस्वाराच्या डोक्यावर हलकी थाप..
मात्रेवर चढताना लागेल धाप..
खोडलेलं अक्षर पाहून विचारात पडेन,
काय बरं लिहाताना अडखळलं पेन?
पण "माझ्यासाठी" लिहिलंस! हे खासंखास
जणू प्रत्यक्ष भेटीचाच होईल भास.
....म्हणूनच म्हटलं, लिही की रे कधीतरी....
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8895
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
धन्यवाद.
In reply to छान! by चांदणे संदीप
छान
वा वा!!
मनापासून धन्यवाद.
In reply to वा वा!! by राजेंद्र मेहेंदळे
क्या बात!सुपर्ब!
मस्त
छान.
सुरेख!
:)
In reply to सुरेख! by स्मिताके
अत्यंत आवडले - पुढे भविष्यात कधीतरी ...
धन्यवाद.
In reply to अत्यंत आवडले - पुढे भविष्यात कधीतरी ... by चित्रगुप्त
लिही की रे कधीतरी....
कधीतरी...
:):)
In reply to कधीतरी... by आंद्रे वडापाव
सगळ्यांना धन्यवाद.
सुरेख !
खरंय.
In reply to सुरेख ! by सस्नेह
क्या बात. मस्त.
रे कधीतरी
लिहिलं बरं "रे कधीतरी".
कविता छान आहे. कोणीतरी
वाह सुंदर
खूप खूप धन्यवाद.
मस्स्स्स्स्स्त!
धन्यवाद अ.आ.!
मग कान्याच्या मागे खांब खांब