खुप दिवसांपासुन ग्रुप ट्रेक करायचा विचार होता.आज जरा योग जुळवून आणला.शहरातच जवळ २० किमी.वरचा छोटासा ट्रेक करायच ठरवलं.नवर्याला म्हटलं उठ पहाटेचे ४.३० वाजलेत.म्हणाला काय गरज आहे थंडीच,८.३०,ला जाऊ.मी म्हटलं "ठीक आहे माझं आवरत १५मिनिटात जाते एकटी"
एकटी शब्द ऐकून स्वारी १० मिनिटांत रेडी आणि चहापण रेडी झाला ..वार बरोबर झाला तर ;)
कुट्ट अंधारच होता.बाईकवर निघालो.उड्डाणपुलाची तिरंगा रंगातील रोषणाई म्हणजे एक आकर्षणाचा विषय आहे हल्ली.त्याचा व्हिडिओ काढत .सगळे जमणार त्या ठिकाणी पोहचलो.जास्तप्रमाणात महाविद्यालयीन युवक होते.विशालदादा आला त्याने सर्वांना शेनुडी ट्रेकची माहिती दिली.अंधार आहे, औरंगाबाद हायवे खुप वाहता आहे काळजी करत ड्राईव्ह करा.२० किमी नंतर एक साथी उभा असेल ,तिथून उजवीकडे वळायचे..ट्रेक इज ओन.
सुचना मिळाल्यावर सगळे पांगले , आपापल्या वाहनातून मार्गस्थ झाले.अर्ध्यातासात डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो.पुन्हा सगळ्यांना एकत्र केलं एका मोठ्या गोलाकारात.पुन्हा सूचना कोण पुढे असणारं हे सांगितलं आणखिन एक महत्त्वाची सूचना मिळाली...गावकर्यांकडून समजलं की काल इथे बिबट्याचा वावर होता.. तेव्हा सर्वांनी जपून! हम्म हसावे का रडावे ही अवस्था क्षणापुरतीच पण.कारण मग सुरू झाला झुम्बा वार्म अप..झुम्बा म्हणजे माझा प्लस पॉइंट :)धमाल केली.
सुरु झाला ट्रेक.अजूनही सूर्योदय झाला नव्हता.
खुप दिवसांनी त्या तारे जमीन पर ईशान सारखं,एकटंच भल्या पहाटे, सगळं जग साखरझोपेत असताना निघाव .सर्वात आधी निसर्गाची किमया हलकासा सूर्योदय ,दवात भिजलेली पान,अलवार भिरभिरणारा गार वारा,तळ्यातले कोवळे रंग टिपावे.. असं जे वाटतं होतं ते घडलं.
वाळलेल्या गवताच्या रांगांमधून चालताना,दोन्ही बाजूंनी हिरव्या गर्भगिरीच्या रांगा,खोल दरीसदृश्य उतार!
मी आणि हे वाटाड्याच्या मागेच सगळ्यात पुढे,हे वेगळे सांगायला नको :)
पूर्व दिशेला त्याच्या पहिल्या दर्शनाची आस ठेवत पुढे पुढे चाललो होतो.गवतात बिबट्या लपला काय असं वाटायचं.हास्यविनोदात पूर्वला भास्कराने दर्शन दिले.सगळ्या जगात सत्य जे आहे तो हा ... त्याचं आकाश..त्याच अस्तित्व!
आता संपला डोंगर असं वाटायचं तर समोर आणखिन डोंगर लपला असायचा.एक सुंदर ससा किरमिजी रंगाच जोरात धावताना दिसला.लहान मुलांनी "ससा रे ससा"कविता सुरू केली.आम्हीही लहान होत ताल धरला.
सेल्फी क्लिकाकिक झाल्या.तेवढ्यात एक चिमुकली आली ती म्हणाली बघा मला काय सापडलंय.एक कवटी होती,दादाने सांगितले की ती 'शेळीची असावी'.
आता ट्रेक एका बाजूने पुर्ण झाला.ओळखीचे,नवे चेहरे दिसले.पूर्व चर्चेनुसार बर्याच जणांनी भेळेचे साहित्य,दुधाची सोय केली होती.पूर्वीपासून कम्पमध्ये सहभागी असणाऱ्या सदस्यांनी पुढाकाराने भेळ आणि coffee बनवली.आपपला वेळ निसर्गाच्या सानिध्यात देत ती भेळ काफी अमृतापेक्षा कमी नव्हती.
ग्रुप सेल्फी ,ड्रोन फोटो घेतं.एक सुंदर, धुंद, गुलाबी सकाळ अनुभवली.
वाचने
6393
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी
वा!! मस्त भटकंती
वाह! छान भटकंती
काय सांगता, मस्तच!
In reply to वाह! छान भटकंती by टर्मीनेटर
धन्यवाद सुखी, राजेंद्र,संजय.
छान झालेला दिसतो ट्रेक :)
होय श्वेता :)
In reply to छान झालेला दिसतो ट्रेक :) by श्वेता व्यास
शुभेच्छा :)
In reply to होय श्वेता :) by Bhakti
छानच
धन्यवाद ताई!
In reply to छानच by गोरगावलेकर
अरे वाह !
करूया करूया डोंगर गड किल्ले
In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर. आकाशाचे रंग खूपच भावले.
चित्रफित-ड्रोनने खुपचं काम
In reply to सुंदर. आकाशाचे रंग खूपच भावले. by चित्रगुप्त
@ भक्ती: ड्रोन-चित्रफीत
In reply to चित्रफित-ड्रोनने खुपचं काम by Bhakti
मी नाही, ग्रुप हेडने ड्रोन
In reply to @ भक्ती: ड्रोन-चित्रफीत by चित्रगुप्त
वाह! वाचून fresh वाटलं.
छोटेखानी मस्त ट्रेक.
हे घ्या तुमच्या ट्रेक बद्दलची
सकाळची भटकंती ..
सर्वांना धन्यवाद!