अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.
थोडे संशोधन म्हणून आधी 'बाणा' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ बघितला. "ठराविक वर्तनक्रम" अशी एका शब्दात बोळवण केलीन त्यांनी. धिस इज नॉट फेयर, चालबे ना, चालणार नाही, खपवून घेतले जाणार नाही :-)
आणखी काही दुसरे शब्दकोश बघितले मग, त्यातले अर्थ :-
- स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.
- अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰).
- लाकडी मूठ व जाड धारेचे पान असलेला पट्टा; एक हत्यार.
- जन्म-स्वभाव; मनःस्थिती
- वस्त्राच्या विणीतील आडवा धागा
एवढे सगळे अर्थ असूनही 'मराठी बाणा' किंवा 'मराठीपण' त्यात सामावत नाही असे वाटले. काय बघून आपण / इतरजण आपले 'मराठीपण' ओळखत असतील ? मराठी भाषा तर आहेच. आपले खानपान? कपडेपट? सण समारंभ, लग्न सोहळे? गणेशोत्सव? मंगळागौर, दहीहंडी? कोळी नृत्य, भावगीते? लावणी अन तमाशा ? पंढरीची वारी? शिवरायांचा गौरवशाली इतिहास, गडकिल्ले? ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग?
मराठीजन महाराष्ट्रात आहेत तसे देशभर-जगभर विखुरले आहेत. इतर मराठी आणि अमराठी बांधवांशी त्यांचा भरपूर संपर्क आहे / असावा. तर मंडळी, तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘मराठीपणा’ची खास अशी लक्षणे कोणती ? अन्य मराठी -अमराठी लोकं 'मराठी' म्हणून आपल्यात काय बघतात / नोटीस करतात असे तुम्हाला वाटते?
तुमचे निरीक्षण, विचार आणि अनुभव जाणून घ्यायला उत्सुक !वर्गीकरण
वाचने
4493
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठी पणाची व्यवच्छेदक लक्षणे
बरं....!
वाह!
In reply to बरं....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणजे नक्की कोणी व काय
In reply to वाह! by Bhakti
मराठी बाणा म्हणजे सध्या तरी स्वतः काही नवनिर्मिती
हम्म
छान!
मराठी बाणा- कृपया ह. घ्या.
प्रत्येक रेसिपींत शेंगदाणे
मान्यवरांचे प्रतिसाद मजेशीर
हिंदीला महाराष्ट्र सरकारकडून राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्यात आल
महाराष्ट्रातील एकही राष्ट्रीय
In reply to हिंदीला महाराष्ट्र सरकारकडून राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्यात आल by Trump
शेवटी मराठी भाषा टिकविणे हे
In reply to महाराष्ट्रातील एकही राष्ट्रीय by श्रीगुरुजी
'मोडेन पण वाकणार नाही' मुळे बरीच मोडतोड झालेली आहे.
खरंय.
In reply to 'मोडेन पण वाकणार नाही' मुळे बरीच मोडतोड झालेली आहे. by चित्रगुप्त