जावे IT च्या डिपार्टमेंटा
Non IT कंपनीत काम करत असताना IT संबंधित काही काम जर आलं (देव करो आणि अशी वेळ कोणावर न येवो) तर तो कठीण समय आहे असं समजावं. इथं IT म्हणजे तुमचा laptop. त्याचं कुठलंही काम हे IT सोडून दुसरं कुठलंच नसतं. स्वतःच डोकं बडवून झालं की आपापल्या कुलदेवतेचं नाव घेऊन कामाला लागावं लागतं. IT मध्ये जाताना आल इझ वेल अस म्हणून प्रवेश करावा तर सुरुवातीला तुम्हाला कोणीही हुंगत नाही. तिथला प्रत्येक जण आपापल्या 'ह्यात' असतो. मग आधीची ओळख, मनातला आवाज, कुलदेवतेची कृपा, आईचा आशिर्वाद, गतजन्माची पुण्याई आणि चालूजन्माचे कर्मभोग हे सगळे एकत्र आल्यावर तिथला कोणीतरी तुम्हाला विचारतो काय प्रॉब्लेम आहे? एकंदरीतच हा प्रश्न विचारण्यापूर्वी त्याच्या किंवा तिच्या चेहऱ्यावर खालीलपैकी एक किंवा अनेक किंवा ह्या सगळ्यांच मिश्रण असतं.
१. बुलेट ट्रेनच्या ड्रायव्हरला बागेतली झुक झुक गाडी चालवताना मनात येणाऱ्या भावना
२. आश्रम मधल्या बॉबी देओल च्या चेहऱ्यावर असणारे भाव.
३. विराट कोहली किंवा रोहित शर्माला पिंपळगाव बुद्रुक इथल्या ज्ञानगंगा कॉलेज ऑफ ओन्ली आर्टस् अँड कॉमर्स च्या वार्षिक गॅदरिंग मधल्या क्रिकेट सामन्यात 2 डाऊनला टेनिस बॉल सामन्यात खेळायला पाठवल्यावर असणारा उत्साह.
हे झाल्यावर मी माझा प्रॉब्लेम सांगतो आणि त्यानंतर त्याचा चेहरा बदलतो. पू ल च्या नारायण मधल्या नारू मामा माझी नाडी बांधून दे ना म्हणल्यावर नारायणाचा होतो ना अगदी तसा किंवा ब्रूस ली ला त्याच्या बायकोने डब्याचं झाकण उघडून दे म्हणल्यावर होतो अगदी तसाच! आपली अवस्था सुद्धा फारशी बरी नसते. आधीच काहीही कारण नसताना (असं आपल्यालाच वाटत असतं) लॅपटॉप फुगून बसलेला असतो आणि त्याबाबतीत आपलं ज्ञान हे एखाद्या चिंपाजी माकडाला जितकं असेल तितकंच असतं. शेवटी तो IT वाला त्याच्या चेहऱ्यावर वैतागण्याच्या सगळ्या भावमुद्रा आणून शेवटी भूतदया ह्या एकमेव भावनेनं काहीतरी करतो. ते नेमकं काय असतं हे चुकून विचारलंच तर तो रामसे बंधूंच्या भुतापेक्षाही भयानक नजरेने आपल्याकडे बघतो आणि गप्प बसतो.
आपल्याच घरातल्या माळ्यावर किंवा store room मध्ये बाहेरचा गेल्यावर जे काही वाटतं तेच आपल्या लॅपटॉप मध्ये काम करणाऱ्या ह्या माणसाकडे बघून वाटतं. 8 सेकंद ते 3 दिवस असा कितीही वेळ आपल्या कामाला लागू शकतो. पण शेवटी काम होतं, फक्त इथे जास्त बोलू नये नाहीतर काम उशिरा होतं. एकदा तर मी मला एका database ला access मिळत नाहीये म्हणून गेलो होतो आणि त्या महामहोपाध्याय माणसाने माझ्या laptop चे hardware कसे बिघडले आहे आणि बॅटरी प्रॉब्लेम मुळे असे होऊ शकते, दरवेळेस server च्या नावाने का बोंबा मारता? असा प्रतिप्रश्न विचारला आणि मी सुद्धा तू म्हणतो आहेस तर असेलही तसं! असं हसून म्हणालो. 2 दिवसांनी ते काम झालं.
आपल्याला काय ब्रूस ली च्या बायकोसारखं करायचं, डब्याचं झाकण उघडणं महत्वाचं आहे. असंही ब्रूस ली काय किंवा नारायण काय आरडाओरडा जास्तच करत असतात, ते मनावर घ्यायचं नसतं.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विनोदी वाटतंय पण गाभा कळला नाही.
आमच्यासारख्या लोकांना म्हणजे
Hardware/software अडचण.
छान निरिक्षण . हे प्रसंग
एक असाच अनुभव...
मी आयटी मधे असतानाची गोष्ट
काय बोलावे ते सुचेना !
कोअर आय टी मध्ये पण असेच अनुभव येतात
आयटीत कोणीही एक्सपर्ट नसतो
प्रत्येक हार्डवेअरचे व
खरंय.
नाण्याची दुसरी बाजू लक्षात घ्या
शेर भाई+१११
सायबाचं काम भारतात वेगळं असतं
मी ही सॉफ्टवेअर कंपनीत काम
या सर्वांच्या
उंदीर पकडायचं काम आमचं नाही
उंदीर पकडायचं काम आमचं नाही
उंदीर पकडायचं काम आमचं नाही
उंदीर पकडायचं काम आमचं नाही
उंदीर पकडायचं काम आमचं नाही
Error आल्यामुळे कॉमेंट खूप वेळा प्रकाशित झाली
उंदीर पकडायचं काम आमचं नाही
.
उंदीर फार झाले आहेत.
पिंजरे लावा
:-)