Skip to main content

फिफा विश्वचषक २०२२

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 22/11/2022 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर फुटबॉल विश्वचषकाचा धागा किंवा त्यावर चर्चाही कशी नाही याचे आश्चर्य वाटले त्यामुळे आपणच त्याविषयी धागा काढू असा विचार केला. अपेक्षेप्रमाणे गट फेरीत त्या त्या गटातील बलाढ्य संघांनी विजय मिळवला पण आज अनपेक्षितरित्या मेस्सीच्या अर्जेन्टिनाला दुबळ्या सौदी अरेबियाने २-१ असा झटका दिला. मात्र त्यांच्या गटातील इतर दोन संघ मेक्सिको आणि पोलंड असल्याने त्यांना हरवण्यास अर्जेन्टिनाला फारशी अडचण येणार नाही असे वाटते. विश्वचषक 2022 चे पूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळापत्रकानुसार) गट फेरी 20 नोव्हेंबर 2022 - कतार वि इक्वाडोर, रात्री 9.30, अल बायत स्टेडियम - 21 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध इराण संध्याकाळी 6:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 21 नोव्हेंबर 2022 - सेनेगल विरुद्ध नेदरलँड्स रात्री 9:30 अल थुमामा स्टेडियम 22 नोव्हेंबर 2022 - यूएसए वि वेल्स, पहाटे 12.30, अल रेयान स्टेडियम 22 नोव्हेंबर 2022 - डेन्मार्क विरुद्ध ट्युनिशिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 22 नोव्हेंबर 2022 - मेक्सिको विरुद्ध पोलंड रात्री 9.30 स्टेडियम 974 23 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया दुपारी 3.30 लुसेल स्टेडियम 23 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहाटे 12.30, अल जानोब स्टेडियम 23 नोव्हेंबर 2022 - जर्मनी विरुद्ध जपान संध्याकाळी 6.30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 23 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध कोस्टा रिका रात्री 9.30 अल थुमामा स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया दुपारी 3.30 अल बायत स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध कॅनडा, पहाटे 12.30 अल रेयान स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून दुपारी 3:30 अल जानोब स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल वि घाना रात्री 9.30 स्टेडियन 974 25 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध सर्बिया पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम 25 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इराण, दुपारी 3.30, अल रेयान स्टेडियम 25 नोव्हेंबर 2022 - कतार विरुद्ध सेनेगल 6:30 अल थुमामा स्टेडियम 25 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध इक्वाडोर रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध यूएसए, पहाटे 12:30, अल बायत स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 3.30 PM अल जानूब स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - पोलंड विरुद्ध सौदी अरेबिया, संध्याकाळी 6.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क रात्री 9.30 स्टेडियन 974 27 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको पहाटे12:30 लुसेल स्टेडियम 27 नोव्हेंबर 2022 - जपान विरुद्ध कोस्टा रिका दुपारी 3:30 PM अल रेयान स्टेडियम 27 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध मोरोक्को 6:30 PM अल थुमामा स्टेडियम 27 नोव्हेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध कॅनडा रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध जर्मनी, पहाटे 12.30, अल बायत स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध सर्बिया, दुपारी 3.30 वाजता, अल जानोब स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - दक्षिण कोरिया वि घाना संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड संध्याकाळी 6.30 स्टेडियन 974 29 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम 29 नोव्हेंबर 2022 - इक्वाडोर विरुद्ध सेनेगल रात्री 8:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 29 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध कतार, रात्री 8.30, अल बायत स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - इराण विरुद्ध यूएसए पहाटे 12:30 अल थुमामा स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इंग्लंड, पहाटे 12:30, अल रेयान स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क रात्री 8:30 अल जानूब स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स 8:30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 1 डिसेंबर 2022 - पोलंड विरुद्ध अर्जेंटिना, पहाटे12:30 , Stadion 974 1 डिसेंबर 2022 - सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको 12:30 लुसेल स्टेडियम 1 डिसेंबर 2022 - कॅनडा विरुद्ध मोरोक्को रात्री 8:30 अल थुमामा स्टेडियम 1 डिसेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम रात्री 8.30 वाजता अल रेयान स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - जपान विरुद्ध स्पेन पहाटे 12:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8.30 वाजता, अल जानोब स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध ब्राझील पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम 2 डिसेंबर 2022 सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड पहाटे 12:30 स्टेडियन 974 बाद फेरी- १६ सामने (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 3 डिसेंबर 2022 A विरुद्ध 2B खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम रात्री 8.30 वाजता 4 डिसेंबर 2022 - 1C विरुद्ध 2D पहाटे 12:30 अल रेयान स्टेडियम 4 डिसेंबर 2022 - 1D वि 2C रात्री 8:30 PM अल थुमामा स्टेडियम 5 डिसेंबर 2022 - 1B वि 2A पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम 5 डिसेंबर 2022 - 1E विरुद्ध 2F रात्री 8:30 PM अल जानौब स्टेडियम 6 डिसेंबर 2022 - 1G विरुद्ध 2H पहाटे 12:30 उशीरा, स्टेडियन 974 6 डिसेंबर 2022 - 1F विरुद्ध 2E, रात्री 8:30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 7 डिसेंबर 2022 - 1H विरुद्ध 2G पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम उपांत्यपूर्व फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 9 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 10 डिसेंबर 2022 - दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम 10 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, अल थुमामा स्टेडियम 11 डिसेंबर 2022 - रात्री 12:30 उशिरा, अल बायत स्टेडियम उपांत्य फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 14 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30 , अल बेयट स्टेडियम 15 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30, लुसेल स्टेडियम तिसरे स्थान सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 17 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम अंतिम सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 18 डिसेंबर 2022 - रात्री 8:30, लुसेल स्टेडियम

वाचने 34728
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

इंग्लड फ्रान्स लढत जोरदार झाली. फ्रान्स २-१ ने विजयी, इंग्लंडने शेवटी एक पेनल्टी किक दवडली अन्यथा खेळ अतिरिक्त वेळेत जाऊ शकला असता. आता अर्जेंटिना विरुद्ध कोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरोक्को अशा उपांत्य फेरीच्या लढती होतील.

फुटबॉल वर्ल्ड कपचा धागा आत्ता पाहिला. असो, सगळे सामने हायलाईट्स मध्ये पाहिले. फक्त काल रात्री माझ्या आवडत्या मेस्सीसाठी जागल्याचे सार्थक झाले. पेनल्टी घेताना माझा बीपी हाय झालेला. शेवटचा असीस्ट तर क्लासच. अर्जेंटिना हा वर्ल्ड कप जिंकू दे रे देवा! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

पेनल्टी किक आणि दुस-या हाफ मधे बॉल स्वतःकडे ठेवत गोल साठी दिलेला अफलातून पास. अहाहा. फुटबॉलमधे यापेक्षा अजून कोणता सुखाचा क्षण असूच शकत नाही. काय नजाकत, अहाहा. मेस्सी जब्रा रे भावा असाच खेळत राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी..!! रात्री जागल्याचे सार्थक झाले हे खरे! अफलातून असिस्ट!! अल्वारेजचा आधीचा गोल सुद्धा मस्त होता! मजा आली! अवांतरः भारत कधी फिफा वर्ल्ड कप खेळणार कल्पना नाही. पण एकदा का होईना भारतीय फुटबॉल टीमसाठी वर्ल्ड कप मधे चीअर करायची ईच्छा आहे! :-)

In reply to by कंजूस

माझ्या मते स्टॅमिना, फिटनेस आणि स्ट्रेन्ग्थ यात आपण सहज कव्हर करू शकतो. गरज आहे ती फुटबॉल कल्चरची. आणि मोकळ्या अन् जरा मऊ ग्राऊंड्सची. प्रत्येक राज्यातून एक मोठा क्लब तयार झाला तर त्यातून चांगला बेस बनेल. नव्हे ISL मुळे ते काही प्रमाणात सुरू झालेलेच आहे. पण या क्लब्स च्या मागे एक पॅशन गरजेची असते. लोकांना तो क्लब आपला वाटला पाहिजे. तर ते चक्र फिरायला लागते! :-)

In reply to by राघव

कतार प्रमाणे आपण ही यजमानपद मिळवले तर भारत खेळेल.. अदानी अंबानी सारखे श्रीमंत लोक असताना हे शक्य आहे फक्त त्यांना यात आर्थिक फायदा दिसायला हवा.

चांगल्या खेळाडूंसह सराव, स्पर्धा करायला मिळाली की खेळ सुधारण्याची शक्यता वाढते. आपल्या चालींना प्रतिस्पर्धी कसा विरोध करतो हे आजमावता येते. ते १४-१९ वयात मिळायला हवे. उशीर झाला तर शिकता येते पण शारिरीक चपळपणा तोपर्यंत जातो. (चांगल्या खेळाडूंशी खेळून बुद्धिबळात सुधारणा फारशी होईल ही शक्यता नसते. ती एक जात्याच कुवत असते आणि ती एका मर्यादेला गोठते.) १)बॉल पायांत खेळवत पुढे नेण्याची कला यात ब्राझील आणि अर्जेंटिनाचे खेळाडू तरबेज,निष्णात आहेत. शिवाय २)मी'च गोल करणार यापेक्षा 'आपला' गोल झाला पाहिजे हे ध्यानात ठेवणारे संघ यश मिळवतात. (माझे मत)

२०१४ ला पाहिलेली फायनल आजही आठवतेय.मेस्सी हरला होता . यावेळी जिंकलाच पाहिजे. फायनल-अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स.

In reply to by प्रचेतस

आपलं मत फिफाला मेल करुन पाठवतो. इतक्या दिवस त्यांच्या हे लक्षात आलं नसावं. आता, ते लक्ष घालतील अशी अपेक्षा करुया. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

आज अंतिम सामना पारडं फ्रान्सचं जड आहे, मला मेस्सीची टीम जिंकावी असे वाटते. फ्रान्स ६० % तर, ४० %अर्जेंटीना. -दिलीप बिरुटे

अर्जेंटिना १ फ्रान्स ० अर्जेंटिनाला अन्यायकारक पेनल्टी किक मिळाली. पेनल्टी किक देण्याइतके काहीही झाले नव्हते.

अर्जेंटीनाचं आक्रमण पाहता फ्रांसला अजुनही पहिला हाफ संपेपर्यन्त सुर गवसला नाही त्या तुलनेत आक्रमण पर आक्रमण मुळे अर्जेंटीना आघाडीवर... दोन शून्य ने पुढे. मला वाटतं लीड मोडणे इतकं आक्रमण करावे लागेल.. तरच फ्रांसचा निभाव लागेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तो सूर सापडूच नये असे वाटत असतानाच कुठून कसे दोन गोल झाले कळालंच नाही. :( सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

मूडच गेला माझा. आता एक्स्ट्रा टाइमिंग. -दिलीप बिरुटे

विराट कोहली ह्यात नाहीत. त्यांनी मस्त गोल ठोकला असता त्यांना एवढा मोठा फुट्बॉल पण नाही लागणार. ह्या गावातुन मी मेस्सी भाऊंना पक्का आर्शिवाद देतो!

पहिल्याच गोलमध्ये.......रीझल्ट.......,मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्ड कप सामना आहे.

फ्रांसचे दोन गोल. म्याच् मधे मजा वाढली -दिलीप बिरुटे

फायनल हरल्यानंतर हताश चेहऱ्याचा मेस्सी बघून अतिशय वाईट वाटले होते. ते तसे यंदा होऊ नये हीच इच्छा! सं - दी - प

अप्रतिम गोल. तीन-दोन. -दिलीप बिरुटे

अर्जेंटीना विश्वविजेता..०४ - ०२ -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

तुम्हारा रोनाल्डो झिंदाबाद है इससे हमें कोई ऐतराज नहीं पर हमारा मेस्सी झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा! ;) सं - दी - प

तोंडावर ऑक्सीजन मास्क लावायची वेळ आणली ह्या मॅचने. मेस्सी हरला असता तर उद्या ऑफिसवर काय तोंड घेऊन गेलो असतो. एंबाप्पेचा खेळ चांगला झाला पण पहिल्या हाफमध्ये तर कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये सुद्धा नाही आला अन्यथा निकाल फ्रान्सच्या बाजूने लागण्याची शक्यता होती. असो, मेस्सी अखेरच्या वर्ल्ड कप मध्ये यशस्वी ठरला आणि तेही स्वतःच्या हिमतीवर, हा ठेवा आयुष्यभर पुरेल. ____/\____ सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

पहिल्या हापमधे अर्जेंटीनाच्या सर्वच खेळाडुंची बॉलवर पकड होती. पहिल्या हाफमधे जेव्हा दोन शुन्यने अर्जेंटीनाने आघाडी घेतली तेव्हा आता अर्जेंटीना जिंकणारच असे वाटले होते. पण दुस-या हाफमधे जरा अर्जेंटीनाचा कंफिडन्स जास्तीचा वाढला आणि बॉलवरची पकड सैल झाली आणि मग कॅमे-याच्या फ्रेममधे एंबाप्पे दिसायला लागला आणि त्याने तीन गोलही केले. आता तो फार दिसू नये असे वाटायला लागले इतका शेवटच्या काही मिनिटात फ्रान्सचा परफॉर्म्स उंचावला. फ्रान्सला मिळालेली पेनल्टी, त्यांनी केलेला दुसरा तिसरा गोल अप्रतिम होते तेव्हा अर्जेंटीना मैदानावरच नाही असे वाटावे इतका तो खेळ दर्जेदार झाला. पेनल्टीशुटाऊटमधे अर्जेंटीनाच्या गोलकिपरने एक गोल वाचवला आणि एक किक बाहेर गेली त्यामुळे अर्जेंटीना जिंकली. विश्वचषक सामन्याचा अंतिम सामना रोमहर्षक झाला. एक प्रेक्षक म्हणून आपल्याला अंतिम सामन्याचा उच्च आनंद लुटता आला. अर्जेंटीना जिंकावी असे वाटत होते आणि जिंकली म्हणून तो क्षण आयुष्यभरासाठी साठवता आला. जे जे सामने बघता आले ते ते सर्व सामने अप्रतिम होते. मजा आली. आता पुढील विश्वचषकाची फक्त वाट पाहणे...! धागालेखकाचेही आभार. वेळापत्रक दिल्यामुळे सामने पाहता आले. चर्चा करता आली, मजा आली. सर्वांचे तहेदिलसे शुक्रिया. आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिला पेनल्टी वादग्रस्त होता असे वाटते. क्षणचित्रे येथे पाहा, कदाचित हा पेनल्टी दिला नसता तर निकाल काही वेगळाच लागू शकला असता असे वाटते. ग्रिझमन, जिरुड फेल गेले, एम्बापे सेकंड हाफमध्ये कमालीचा खेळला.

In reply to by प्रचेतस

पळत्या खेळाडूला डीमधे धक्का लागला आणि तो पडला. फूटबॉल खेळाडू काहीही निमित्त करुन पडतात नाटकं करतात हे खरं असलं तरी तो पेनल्टी दिला गेला. तसेच ७८ व्या मिनिटाला फ्रान्सला दिलेला पेनल्टीही तसाच वादग्रस्त वाटावा इतका तो फूळ्ळक होता. पण, खेळ म्हटला की जर तर चालायचेच. जिरुडला तर बाकडावर बसल्यावर यल्लो कार्ड दाखवले. माय गॉड हहपुवा झाली. बाकी एम्बापे सेकंड हाफमधे लै जबरा खेळल्या इतक्याच मताशी सहमत आहे. बाकी फ्रान्स हरल्यामुळे फ्रान्सचे चाहते म्हणून तुमचं दु:ख समजू शकतो. काळजी घ्या तब्येतीला जपा. (ह. घ्या) ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ्रान्सचा चाहता असल्याचा प्रश्नच नाही, तसंही फ्रान्सच्या संघात मूळचे फ्रेंच खेळाडू अभावानेच दिसतात, बहुतेक सारे स्थलांतरीतच आहेत, शिवाय त्यांची विशिष्ट अशी लकब नाही, नजाकत नाही, ताकद आणि स्टॅमिना मात्र प्रचंड. बाकी अर्जेटीना जिंकल्यामुळे तुम्हाला झालेला आनंद समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

फ्रान्सचा चाहता असल्याचा प्रश्नच नाही, तसंही फ्रान्सच्या संघात मूळचे फ्रेंच खेळाडू अभावानेच दिसतात, बहुतेक सारे स्थलांतरीतच आहेत, शिवाय त्यांची विशिष्ट अशी लकब नाही, नजाकत नाही, ताकद आणि स्टॅमिना मात्र प्रचंड. बाकी अर्जेटीना जिंकल्यामुळे तुम्हाला झालेला आनंद समजू शकतो.
मुळचे फ्रेंच म्हणजे गोरे का? कृपया हा वर्णद्वेष सोडावा.

मा(बा)पे चांगलाच खेळाडू. त्यांच्यामुळेच फ्रान्सला टिकता आलं. पेनल्टी किकांना पर्याय सुचवतो. तीन वि. तीन खेळाडुंना सहा मिनिटे खेळायची संधी द्यायची आणि ठरवायचे. हा इमेल कुणीतरी फिफा'ला करा.

messi आपला फेवरेट या टूर्नामेंटमधला. माझा भौ. ;) ( छायाचित्र जालावरुन) -दिलीप बिरुटे

goal kipeer पेनल्टीशुटाऑउटमधे एक किक गोल पोष्टबाहेर गेली आणि एक वाचवली म्हणून इतकी मस्ती तर येणारच...! :) (छायाचित्र जालावरुन) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

कतारच्या किंवा फूटबॉल संघ संयोजकांच्या शास्त्रात-मनात एखाद्याचा सन्मान करायचा असल्यास अशी वस्त्रे घालण्याचा प्रघात असावा. बक्षीस वितरणप्रसंगी त्यांना अशी वस्त्र घालून सन्मानाने विश्वचषक सोपवण्यात आल्याचे दृश्य काल दूरदर्शनवर बघितले. अधिकृत माहिती नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

बिश्ट काय आहे? कतार टूर्नामेंट आयोजन समितीचे महासचिव हसन अल थवाडी यांनी बीबीसी स्पोर्ट्सला सांगितलं की, हा अधिकृत समारंभासाठी परिधान करावयाचा पोशाख आहे. मेस्सीच्या विजयातील योगदानासाठी त्याला हा पोशाख देण्यात आला. त्यांनी पुढे सांगितलं, वर्ल्ड कप हा आमच्यासाठी अरब विश्व आणि मुस्लीम संस्कृतीला जगाला जोडणारा दुवा आहे. मेस्सीला देण्यात आलेला हा पोशाख फक्त कतारतर्फे नाही तर या भागात आयोजित महोत्सवाचं प्रतीक आहे. मेस्सीला जो पोशाख देण्यात आला त्याला बिश्ट असंही म्हणतात. अरब देशांमधला हा एक सांस्कृतिक पोशाख आहे. खास प्रसंगीच हा पोशाख घातला जातो. रविवारचा अर्जेंटिनाचा विजय मेस्सीच्या शिरपेचातला मानाचा तुरा आहे. हे लक्षात घेऊनच त्याला हा पोशाख देण्यात आला. जाळीदार असा काळा-सोनेरी रंगाचा हा पोशाख आहे. ( माहिती जालावरुन साभार) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोशाखच्या माहितीसाठी धन्यवाद सर. पण ते अजिबात नाही आवडलं,ती काय वेळ होती का बिश्ट देण्याची.आमचा मेस्सी बघा किती समजूतदार ,आदर ठेवला त्यांचा.खेळ संस्कृती आहे पण उगाच ग्लोबल मार्केटिंग बिश्ट द्वारे.

In reply to by Bhakti

मॅडमजी...आता काय बोलायचं...! आपल्या मताशी सहमत आहे. आपण जो मार्केटींगचा उल्लेख केलाय ना, ते आता जगभर सुरुच आहे. खेळ आणि खेळभावना वाढीस लागाव्या अशा गोष्टी व्हायला पाहिजेत असं आपल्याला वाटत असतं. पण, काही तरी नेमकं वेगळ करणारी मंडळी जगभर दिसून येतेच येते. म्हणजे आपल्या पुण्यात स्पर्धा झाल्या असत्या तर आपण सर्व खेळाडुंना पगड्या घातल्या असत्या. द्वारकेत वगैरे झाल्या असत्या या स्पर्धा तर, मोरपीसाच्या टोप्या खेळाडूंना घातल्या असत्या. शंक फुंकले गेले असते.....त्या त्या भागाच्या परंपरा संस्कृती, इतिहास-भूगोल. दंतकथा त्यातली प्रतिकं अशावेळी हटकून बाहेर येतात आणि मग काय बिघडलं असं सुरु होतं. अर्थात हे कशासाठी ? सांगायची गरज पडत नाही. आता बघा, अंतिम सामना बघीतल्यावर सामना अर्जेंटीनाने जवळ जवळ एक हाती जिंकलाच होता. ऑलीव्हर जिरु, देम्बले मैदानाबाहेर आलेले होते. फ्रान्सच्या संघाच्या कपड्याच्या बॅगा भरल्याच होत्या. देहबोली हरलेली दिसत होती. पण सामना संपायला वीसेक मिनिटे बाकी होती तेव्हा कॅमाविंगा आणि किंगज्ले मैदानात उतरले आणि इतका वेळ कुठेच नसलेल्या एम्बापेचा प्रतिकार असा काही वाढला की आता अर्जेंटीना खपले असे वाटले. एम्बापेने पहिला पेनल्टीचा जाऊद्या पण दुसरा केलेला गोल अविश्वसनीय अप्रतिम होता. हं तर, आपण बोलत मार्केटींगबद्दल. फ्रान्स हरले. तर, सामना संपल्या नंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे सहानुभूती दाखवायला आले. मला वाटतं ते एम्बापेशी संवाद करीत आहे, आणि एम्बापे दूर कुठेतरी पाहतोय असा एक फोटो वृत्तपत्रात आला होता. मॅक्रॉन यांनी आपल्या प्रचारासाठी संघाचा वापर केला अशी टीका नंतर झालेली बघायला मिळते. एम्बापे दुस-या संघाकडून खेळणार होता आणि मॅक्रॉन यांनी त्याच्यावर दबाव आणला अशी एक बातमी होती. वर एका प्रतिसादात माझ्या मिपाकर मित्राची प्रतिसादात एक ओळ होती की, 'फ्रान्सच्या संघात मूळचे फ्रेंच खेळाडू अभावानेच दिसतात' आणि 'नजाकत ताकद स्टॅमिना' बद्दलही काही भाष्य होतं. . मतं-प्रतिकुल आणि वादाची मतं त्यावरही येऊ शकतात. प्रश्न नुसता रंगाचा नसतो तर प्रश्न संधीचाही असतो. एम्बापेच्या खेळाचं, ताकदीचं, आणि नजाकतीचं फुटबॉल जगताने मार्केटींग केलं नाही तर त्याचं काही नवल वाटू नये. मैदानाबाहेर बसलेल्या आणि संघात कधी स्थान- संधी मिळणार नाही असे वाटणा-या खेळाडूंना एम्बापे आयकॉन आदर्श असणार आहे. उत्तम खेळणा-यांना खेळात तरी समान संधी मिळते असे वाटणा-या तो एक आश्वासक चेहरा असणार आहे. अर्थात, येत्या काळात ते सगळं दिसेलच असे वाटते. अर्जेंटीनाचा मेस्सी भारीच होता. पण, एम्बापे काही कमी नव्हता यासाठी हा विश्वचषक कायम लक्षात राहील. इतकेच. लिहितांना काही चुकलं असेल तर जरुर लिहा मॅडमजी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह सर एम्बापे इतर गोष्टींविषयी छान माहिती दिली.बिचार्यावर खुपचं अन्याय झाला म्हणजे :( फारच सुकला होता त्याचा चेहरा. मला एवढंच म्हणायचं होतं की अंतिम सामन्यात तो कोट देऊन खेळातला त्यांचा अतिउच्च दिवसात लुडबुड नको होती इतर वेळी ,इतर सामान्यात दिला असता तर काहिच इश्यू नव्हता.हे असंच चालू राहिलं आणि पुण्यात ओलिंपिक झालं विजेत्यांना पुणेरी पगड्या घातल्या तरी मला चालणार आहे ;) ्

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रश्न नुसता रंगाचा नसतो तर प्रश्न संधीचाही असतो.
इथं रंग कुठून मध्येच आणलात भो? फ्रेंच संघात नॉर्स खेळाडू असते तरीही मी हेच म्हटले असते. उद्या भारतीय क्रिकेट संघातून रोहिंगे, चिनी, श्रीलंकन, ब्रिटिश, पोर्तुगीज खेळाडू खेळताना दिसले असते तरीही मी हेच म्हणालो असतो. मूळ फ्रेंचांमध्ये फूटबॉल गुणवत्तेची कमी दिसतेय हे साहजिकच आहे.

शेटजीने मेस्सीचे अभिनंदन का म्हणून केले असावे: मेस्सीच्या हातावर कमळाचे चिन्ह शेटजीने जिंकला वर्ल्ड काम आज.