रविवारी नगरच्या महिलांना स्वयंपाकाचा कंटाळा आला,आणि होटेलात जायचा कंटाळा आला , झणझणीत खावं वाटलं की आगडगावाचे प्लॅन केला जातो.
आगडगावाला शंकराचा अवतार/सेवक काळभैरव याचे जुने मंदिर आहे.रतनमल,देवमल ,आगडमल या तीन राक्षसांनी हे दगडाने बनलेले मंदिर बांधले आहे अशी आख्यायिका आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांची शिरं आहेत.कदाचित हे किर्तीमुख असावेत पण आता मंदिरावर इतके आधुनिक रंगरंगोटी इतर थर आहेत की ओळखता येणे अवघड आहे.आतील , बाहेरील बांधकामही हेमाडपंथी दिसत आहे परंतु कोणताही शिलालेख नाही.
रविवारी १२ वाजता काळभैरव आणि जोगेश्वरी मातेची अत्यंत मोहक मूर्ती/तांदळा ज्याची आरती झाल्यावर अतिशय रूचकर महाप्रसादाच्या पंगतीच्या पंगती उठतात.यामध्ये गरमागरम मिश्र डाळीची आमटी, बाजरीची भाकरी,ठेचा,कांदा लिंबू फडफडीत भात,गोड शिरा/लापशी असे अस्सल गावरान पदार्थ असतात.यासाठी असंख्य भगिनी स्वच्छेने आनंदाने भाकरी करण्यासाठी सहभाग घेतात.सर्वांना प्रसाद वाटप होईपर्यंत माईकहून भाविकांना नामस्मरणात तल्लीन केले जाते.कोणताही प्रसाद उष्टा ठेवू नका यांची वारंवार सुचना दिली जाते.
हळूहळू गर्दी वाढली असते.ताजी भाजी, गावरान डाळी, कडधान्य विकायला असतात.पेढे, लहान मुलांसाठी किरकोळ खेळणी ...एक जत्राच भरते.
आणखिन एक विशेष म्हणजे भैरव जयंती नंतरच्या रविवारी येथे यात्रा भरते तिथे रात्री भुतांची असते कोणत्याही गावकरी ,बाहेरील व्यक्तींना येथे प्रवेश करता येत नाही.याविषयी अजूनही फारशी शहानिशा केली नाही.
परततांना पवनचक्की मोजत मोजत , उंचीवरून हिरव्या शेताचे आकार ओळखत बुर्हानगरला पोहोचलो.तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे.प्रत्यक्ष तुळजाभवानी बालरूपात येथे भक्तांची सेवा करत असे मानले गेले.तुळजापूरला येथून पाठवलेल्या पालखीचा मोठा मान आहे.
https://youtube.com/shorts/V4RazmZwYSY?feature=share
-भक्ती
वाचने
4663
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरुवात छान केली.
+१
In reply to सुरुवात छान केली. by कंजूस
अनवट ठिकाणाची छान ओळख
हेच म्हणते
रोचक भटकंती !
फोटो आणि माहिती मस्त. अशाच
सुंदर माहिती आणि फोटो!
राहवलं नाही म्हणून लिहतोय!
छान.
प्रसादाचे ताट आवडले .....
भक्तीताई खूप छान आणि यथार्थ वर्णन !
अस्सल गावरान खवा खूपच स्वादिष्ट असतो
In reply to भक्तीताई खूप छान आणि यथार्थ वर्णन ! by आलो आलो
छान वर्णन
सर्वांना धन्यवाद!