सिंहगड!
"गड आला पण सिंह गेला","आधी लगीन कोंढाण्याच,मग माझ्या रायबाचं"ह्या ऐतिहासिक सिंहगर्जना लहानपणापासून ऐकून स्फुरण चढत.गड किल्ल्यांचा इतिहास केवळ वाचून नाही तर इथल्या पावन भूमीला स्पर्शून अनुभवला पाहिजे हे समजायला जरा उशीर झाला.पण ठीक आहे एक मुलीला इतिहास आवडतो,तर मुलीला हे लहानपणापासून समजलं तर खुप छान बदल घडेल.त्यामुळे जसे जमेल तसे गड दर्शनकरावं असं ठरवलं.सर्वात सोपा सिंहगड आहे , असं ऐकलं.
पुणे दरवाज्यातून चढाई सुरु केली ,तिथेच शरभ चिन्ह आणि तानाजी मालुसरे,नावजी बलकवडे यांनी हा किल्ला शत्रुंकडून जिंकल्याचा उल्लेख आढळला.बलकवडे यांचा उल्लेख पहिल्यांदाच लक्षात आला.पुढे घोड्यांचे टाके,दारू टाके पाहिलं.वन विभागाचे गेस्ट हाऊसचे पुरातन प्रवेशद्वार,त्यावर वाढलेल्या वेली खुपचं आकर्षक वाटल्या.
कन्या पुढे पुढे पळत असल्याने कोंढणेश्वर ,टिळक निवास , अमृतेश्वर पाहायचं राहिलं.तिच्यामागे पळत पळत थेट कलावंतीण बुरुज जे शेवटचं टोक आहे तिथं पोहचलो.आजूबाजूचे डोंगर धुंद कुंद वातावरण आनंद देत होतं :)
परत मागे फिरून कल्याण दरवाजा उतरलो,पाहिला.त्यावर एका बाजूचे हत्तीचे शिल्प मोहक होतं. पुढे तानाजी मालुसरे यांचं स्मारक पाहिलं.इथे बरेच माहिती फलक आहेत.एका शाळेची सहल इथे सहलीला आली होती.लहान लहान मुलं महाराजांच्या गाण्यावर उत्तम नृत्याविष्कार करत होते.
आता पोटात कावळे ओरडायला लागले तेव्हा गडावरचं पिठल आणि ज्वारी तांदूळ मिश्रणाची पातळ भाकरी यथेच्छ खाल्ली.छोट्या छोट्या मटक्यातलं ताज दही म्हणजे वाह!! परततांना रेंगाळत रेंगाळत फुलांचे फोटो काढत परत मागे निघालो.खडकवासला तळ्याजवळ चहा घेऊन पहिली दुर्ग भटकंती मनभर रेंगाळली
-भक्ती
kQU" alt="A" />
https://youtu.be/GuCjlgJSbjE
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
आवडलं.
आमचीपण जाहिरात तुमच्या
थोडक्यात आटोपलंत. सिंहगडावर
कंकाका,बहुतेक तरी शिवनेरी:)
हा वीरगळ नसून स्मृतीशिळा
मस्त भटकंती
मस्त!
छान भ्रमंती
सर्वांचे धन्यवाद
वीस एक वर्ष होत आली गडाला भेट
छानच!
नक्कीच निवांत पहा.खरं म्हणजे