Skip to main content

वेगळा होता.....

लेखक उदय सप्रे यांनी रविवार, 03/05/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळा होता..... चांदण्याही त्याच होत्या पौर्णिमेच्या रातीला तुझ्या डोळ्यांतील आकाशाचा , रंग वेगळा होता ! एक होता सूर अपुला एक होती रागदारी तुझ्या गळ्यातून ठहरणारा , ढंग वेगळा होता ! न होतो विश्वामित्र मी , न होतीस अन् तू मेनका ती तपस्या पावली , माझा तपोभंग वेगळा होता ! फुलला कधीचा परसदारी धम्म पिवळा सोनचाफा मोकळ्या केसांत सजला , तो संग वेगळाहोता ! हाय् ! ओलेत्या तुझ्या कांतीस बिलगली ती उन्हे लाज गाली पाहणारा सूर्य , दंग वेगळा होता ! सोळा सहस्त्र नारींस होता एक त्राता अन् सखा प्रीत राधेचीच मोठी , तिचा श्रीरंग वेगळा होता !
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1912
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आवडली. पुढच्या कवितेसाठी शुभेच्छा.

सुन्दर! सोळा सहस्त्र नारींस होता एक त्राता अन् सखा प्रीत राधेचीच मोठी , तिचा श्रीरंग वेगळा होता ! विशेष आवडलेल्या ओळी. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

शब्दच नाहीत कौतुक करायला. अतिशय सुरेख रचना. खूपच सुंदर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कविता सुंदर आहे. प्रत्येक कडव्यातील कल्पना सुंदर. (प्रत्येक कडव्यातील दुसर्‍या ओळीत दुसर्‍या भागात मात्र मात्रांमध्ये काही गडबड आहे.) खराटा (रंग माझा वेगळा)

उदय मित्रा फार सुंदर विशेष करुन हे कडवे फार आवडले :) न होतो विश्वामित्र मी , न होतीस अन् तू मेनका ती तपस्या पावली , माझा तपोभंग वेगळा होता ! आणि शेवट तर अप्रतिमच सोळा सहस्त्र नारींस होता एक त्राता अन् सखा प्रीत राधेचीच मोठी , तिचा श्रीरंग वेगळा होता ! येऊ देत अजून - सागर

In reply to by सागर

अरे मित्रा, तुझ्यासारख्या आणि क्रान्तिताई , प्राजुताई यांच्यासारख्या चोखंदळ वाचकांमुळे तर म्या पामराचे लिहिण्याचे धाडस असते रे ! मंडळ आपले लय् (आ)भारी आहे !