मद्रासकथा-३

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in काथ्याकूट
13 Nov 2022 - 12:21 am
गाभा: 

.

चित्रः- पेरियार आणी अम्बेडकर.
दलितांचा खरा हितचिंतक कोण? आंबेडकर, गांधी की पेरियार? तिन्हीकी यापैकी कुणीही नाही? हा न संपणारा वाद आहे.

जातीचा प्रश्न येतोय म्हणून मी जातीपासून सुरुवात करतो. या तिघांपैकी फक्त एक दलित समाजात जन्माला आला होता आणि बाकीचे दोघे व्यापारी समाजातील होते. तिघांमध्ये एकही ब्राह्मण नव्हता.

तिघांमध्येच नाही तर संपूर्ण भारतातच सर्वात जास्त पुस्तके वाचणार्‍यांमध्ये बाबासाहेबांचे नाव वर येते. इतर दोघे त्यांच्या 'प्रवृत्ती', जनसामान्यांशी असलेले त्यांचे संबंध आणि प्रयोगांद्वारे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत. आंबेडकर हे सिद्धांतवादी जास्त होते आणि प्रयोगवादी कमी होते. जे विज्ञानाशी निगडीत असतात किंवा ज्यांना ज्ञान असते त्यांना सिद्धांत आणि प्रयोग यांच्यातील फरक चांगल्या प्रकारे माहित असणे आवश्यक असते. प्रयोगशाळेत तत्त्वांच्या दिशेने चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये कधी स्फोट होतो, तर कधी प्रयोग चुकीचा निघतो. सिद्धांत त्याहून अधिक बौद्धिक कुशाग्र माणसाने रचलेला असतो आणि तो सर्व युक्तिवादांसह कागदावर मांडला जातो. आंबेडकरांच्या सिद्धांतातील चुका शोधणे अवघड आहे, पेरियार किंवा गांधींच्या प्रयोगात दोष असणे किंवा शोधणे सोपे आहे.

14 ऑगस्ट 1931 रोजी दुपारी भीमराव आंबेडकर मलबार हिलवरील मणिभवनात पोहोचले.

"बोला डॉक्टर! तुमचे मत काय आहे?" गांधींनी हसत विचारले.

"मला तुमचे मत कळले. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मला थेट प्रश्न विचारू शकता, मी उत्तर देईन.", आंबेडकर थेट गांधींच्या डोळ्यात पाहत म्हणाले.

"मला माहित आहे की तुमची माझ्या आणि काँग्रेसविरुद्ध तक्रार आहे. तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी अस्पृश्यांच्या प्रश्नावर विचार करत आलो आहे. माझ्या शालेय दिवसांपासून. काँग्रेसमध्ये विरोध असतानाही मी हा प्रश्न वारंवार उपस्थित केला. धार्मिक प्रश्न म्हणून तो बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला, पण मी काँग्रेसच्या कार्यक्रमात त्याचा समावेश करण्यास सांगितले. या प्रश्नावर काँग्रेसने आतापर्यंत वीस लाख रुपये खर्च केले आहेत.

"महात्माजी! तुम्हा वयस्क लोकांना प्रत्येक वादात आपल्या वयाचा दाखला देण्याची सवय असते. मला काहीही शंका नाही की तूम्ही प्रथम जन्मला आहात, आणि माझ्या आधी विचार करायला लागलात. पण वीस लाख रुपये खर्च करून काँग्रेसने काय साधले? त्यापेक्षा कमी पैसे दिले तर मी चांगले नियोजन करेन.

मी तुम्हाला एक विनंती करतो. तुम्ही काँग्रेसवाल्यांना खादी सक्तीची केली. तुम्ही अजून एक गोष्ट केली पाहिजे. जो कोणी काँग्रेसी अस्पृश्याला आपल्या दारात येऊ देत नाही, त्याचे काँग्रेस सदस्यत्व रद्द केले पाहिजे.

तुम्ही हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाची वाट पाहत आहात. या नेत्यांवरचा आणि महात्म्यांवरचा आमचा विश्वास उडाला आहे, हे मी न घाबरता म्हणेन. मला देशाचा गद्दार म्हटले जात असेल तरी माझी हरकत नाही. आम्हा दलितांना कोणती मातृभूमी आहे का?"

"ही तुमची मातृभूमी आहे आणि गोलमेज परिषदेतील तुमची विधाने मी वाचली, तुम्ही खरे देशभक्त आहात"

"तुम्ही म्हणता ही आमची मातृभूमी आहे. ज्या भूमीवर आम्हाला कुत्रे-मांजरांपेक्षाही वाईट वागणूक मिळत. या मातीत वाहणारे पाणी पिण्यास आम्हाला परवानगी का नाही? या भूमीवर होणाऱ्या शोषणाला मी विरोध केला तर मला देशद्रोही म्हणायला हरकत नाही. तुमच्या शब्दात सांगायचे तर, मी जर काही 'देशभक्ती' कृत्य केले असेल तर ते या भूमीवरील भक्तीमुळे नाही तर माझ्या आंतरिक विवेकाच्या आवाजाने केले आहे.

काँग्रेसने निवडणुकीत मुस्लिम आणि शीखांना प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले आहे. त्यांची सामाजिक स्थिती आमच्यापेक्षा खूप चांगली आहे. पहिल्या गोलमेज परिषदेत आम्ही दलितांसाठी निवडणुकीत आरक्षित प्रतिनिधित्वाबद्दल बोललो, जेणेकरून आम्हाला स्वाभिमान मिळेल. यावर तुमचे काय मत आहे?"

“अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळे ठेवण्याच्या विरोधात मी आहे. हे हिंदूंसाठी आत्महत्येसारखे आहे.

"तुमच्या मताबद्दल धन्यवाद. आता निदान या मूलभूत प्रश्नावर आपण दोघे कुठे उभे आहोत हे तरी स्पष्ट झाले आहे. मला आता इथून जाण्याची परवानगी द्या."

दोघे एकमेकांशी बोलत असताना त्याच आठवड्यात पेरियार विरुधनगरातील काही तमिळ-ब्राह्मणेतर व्यावसायिकांना भडकवणारे भाषण देत होते.

तेव्हा त्यांचे समर्थक उद्योगपती शण्मुगम चेट्टियार उभे राहिले आणि म्हणाले,

"रामास्वामी! धर्मविरोधात तू आंधळा झाला आहेस. आता मी कंटाळलोय तुझ्या या एका राग आवळण्याल.आर्थिक आणि सामाजिक सुधारणांच्या गप्पा मारणाऱ्या आंबेडकरांकडून तुम्ही काहीतरी शिका. ते अशा प्रकारे देवतांना शिव्या देऊन मुद्दा भरकटवत नाही.

असे सांगून चेट्टियार आणि दुसरा व्यापारी वि वि आर नाडर रागाने निघून गेले. आपला प्रयोग चुकीच्या दिशेने जात असल्याचे पेरियार यांच्या लक्षात आले.
शेवटी ब्राह्मणवाद कसा संपणार हा प्रश्न होता? जगात कोणी हे साध्य केले होते का?

पेरियार यांना अशा मॉडेलची गरज होती ज्याची तत्त्वे सुदृढ, परीक्षित आणि गांधींच्या मार्गावर चालत नाहीत. अशा मॉडेलचे मार्केटिंग केले जात होते, जे फिरत पेरियारपर्यंत पोहोचले. हे मॉडेल 1917 च्या बोल्शेविक क्रांतीनंतर रशियामधून आले होते.

१९२० साली ताश्कंदमध्ये सात लोक भेटले. मद्रासी ब्राह्मण- एमपीटी आचार्य. दोन बंगाली - एमएन रॉय आणि अबनी मुखर्जी. दोन मुस्लिम - मुहम्मद अली आणि मुहम्मद शफीक. दोन परदेशी - एव्हलिन आणि रोजा. यासोबतच भारतात कम्युनिस्ट पक्षाची सुरुवात होत होती.

पुढच्याच वर्षी श्रीपाद अमृत डांगे यांनी मुंबईत ‘समाजवादी’ मासिक काढायला सुरुवात केली. त्यात लेखांची मालिका लिहिली - 'गांधी आणि लेनिन', ज्यात गांधींपेक्षा लेनिन सरस सिद्ध केले गेले. ढाका येथे नजरुल इस्लामने ‘नवयुग’ नावाचे समाजवादी मासिक सुरू केले. तर मद्रासमध्ये सिंगरावेलू यांनी 'लेबर किसान गॅझेट' प्रकाशित करण्यास सुरुवात केली. क्रांतिकारी गट तयार होत होते. भारतीय समाजवादी रिपब्लिकन आर्मीच्या भगतसिंग यांना फाशी दिल्याने अशा क्रांतीना राष्ट्रीय स्तरावर आणले. काहींनी याच आधारे गांधीविरोधाची ठिणगीही पेटवली.

पेरियार ह्यातून कसे वाचले असते? मार्क्सवादाने त्यांना चुंबकाप्रमाणे ओढले. ऑक्टोबर 1931 मध्ये, त्यांच्या 'कुडी अरासू' मासिकाने तामिळमध्ये कम्युनिस्ट जाहीरनामा प्रकाशित करण्यास सुरुवात केली. पण पेरियार हे आधी कुठलाही विचार तपासून पाहायचे. या दिशेने पुढे जाण्यापूर्वी, त्यांनी ठरवले की सोव्हिएतला जावे आणि तेथे काय चालले आहे ते स्वत: पहावे.

.
चित्रः- पेरियार रशियात.
डिसेंबर १९३१ मध्ये पेरियार युरोपला रवाना झाले. रशियामध्ये क्रांतिकारी नास्तिकांची एक संघटना तयार झाली, जी जगातून देवाची शक्ती संपवण्याचा निर्धार करत होती. त्यांची नजर आधीच भारतातील धर्मग्रंथांवर आघात करणाऱ्या पेरियारवर होती. भगतसिंग यांच्या 'मी नास्तिक का आहे?' या पुस्तकाचे तमिळ भाषांतरही ते तयार करत होते. पेरियार यांना रशियात आणून ‘गाइडेड टूर’ करवण्यात आली. त्यांना जे दाखवायचे होते तेच दाखवले गेले.

पेरियार प्रथम 'रेड स्क्वेअर'वरील लेनिनच्या समाधीवर पोहोचले. मग काही दिवसांनी अझरबैजानच्या खाणी पाहायला गेलो. तिथले उद्योग पहिले. त्यांना वाटले की हा खरोखर श्रमजीवी वर्गाचा स्वर्ग आहे, जिथे जमीनदार नाही. जन्म वर्ग नाही. सर्वजण मिळून देशाच्या आर्थिक प्रगतीला मदत करत आहेत. पेरियार दोन महिने रशियात फिरले. त्यानी आपल्या डायरीत लिहिले की, मॉस्कोमध्ये मे डे पाहून मला मरियम्मन मंदिराची आठवण झाली. तिथे त्यांनी स्टालिन आणि कॅलिनिन यांना दूरवर स्टेजवर मिलिटरी पोशाखात पाहिले आणि समोर हजारोंचा शिस्तबद्ध जमाव. भारताला या यंत्रणेची गरज आहे, असे त्यांना वाटले.

पण या नंदनवनाला देखील स्वतःचे असे रहस्य होते. भटकत असताना पेरियार लेफोर्टोव्हो तुरुंगात पोहोचले तेव्हा त्यांना स्टॅलिनच्या अत्याचाराची काहीशी कल्पना आली. पण, पेरियारच्या अशा भेटींची माहिती स्टॅलिनपर्यंत पोहोचल्यावर हे लोक विरोधकांचे एजंट असावेत असा संशय त्याला आला. स्टॅलिनने आपल्या शैलीत पेरियार यांना रशियातून मायदेशी पाठवले.

गांधीवादाने प्रवास सुरू करणारे पेरियार गांधींचे कट्टर विरोधक बनले. आता मार्क्सवादी होत होते. तामिळनाडूत येताच त्यांनी जाहीर केले 'आजपासून आपण सर्व स्वाभिमान आंदोलक म्हणवले जाऊ -कॉम्रेड ’. त्यांनी मुलांची नावे 'रशीया' आणि 'मॉस्को' अशी सुचवायला सुरुवात केली, ज्यामुळे दक्षिण भारतात एक नवीन प्रथा सुरू झाली. गावोगावी उघडे नागडे धावणाऱ्या मुलांना लेनिन आणि स्टॅलिनच्या नावाने हाक मारली जाऊ लागली. हे लिहिताना त्याच नामकरण पद्धतीने नाव ठेवण्यात आलेली व्यक्ती तामिळनाडूची मुख्यमंत्री आहे. : )

पेरियार सोव्हिएत दौर्‍यावरून परतले असताना गांधी आणि आंबेडकर इंग्लंडमधील गोलमेज परिषदेतून परतले होते. तिघांच्याही दिशा वेगळ्या होत्या, पण देशाला एकच दिशा निवडावी लागनार होती.

21 सप्टेंबरच्या संध्याकाळी, आंबेडकर पुण्याला जात असताना पत्रकारांनी विचारले, "गांधीजींनी तुम्हाला आणि तामिळ दलित नेते एम सी राजा यांना भेटण्याची विनंती केल्याचे आम्ही ऐकले आहे."

आंबेडकर म्हणाले, “जर त्यांना भेटायचे असेल तर मला भेटावे. आमच्यातील वादात तिसरे कोणीही नसावे. "
दलितांना घटनात्मक प्रतिनिधित्वाचा बिगुल वाजवून याच मुद्द्यावरून काँग्रेस सोडणारे पेरियार यांच्यासारखे तामिळ नेते आता 'तिसरे' ठरत होते. मार्क्सवादाला बुडत्याला काडीचा (Political pragmatism) आधारच म्हणता येईल. चेट्टियार आणि नादारांनी पेरियार यांच्या चळवळीला निधी देणे बंद केले होते, त्यामुळे त्यांना हा नवा प्रयोग अपेक्षित होता. मात्र, त्यांच्या इतर प्रयोगांप्रमाणे पेरियार मार्क्सवादाला सुद्धा खिडकीबाहेर फेकून देणार होते.

पण त्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वी, एक डायवर्जन घेऊया आणि आंबेडकरांसोबत पुणे येथील येरवडा जेलला भेट देऊयात.
(क्रमशः)
मुळ लेखकः- प्रविन झा.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Nov 2022 - 12:24 am | अमरेंद्र बाहुबली

क्रुपया लेख काथ्यकुट सदरातुन लेख ह्या सदरात हलवावा.