Skip to main content

ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग २)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 21/09/2022 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात दोनशेहून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे (वाट पाहून) हा भाग काढत आहे. नवीन प्रतिसाद ह्या भागात द्यावेत, जुन्या प्रतिसादांना प्रति-प्रतिसाद द्यायचे असतील तर पहिल्या धाग्यावर द्यावेत. --- आधी मद्य विक्रीत, मग बससेवेत आणि आता शौचालय बांधकामात घोटाळा! - केजरीवाल सरकारवर काँग्रेसचा आरोप ऑपइंडियाची बातमी एका वृत्तवाहिनीचे संबंधित ट्विट:

वाचने 18701
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

ख्या ख्या ख्या. गांधी परिवाराबद्दल ते मुसलमान असण्याची ढुसकी व्हाट्सअप वर फिरत असते हे माहीत असून खरेंनी पारशी/मुसलमान असे लिहिले आहे. आता तुम्हाला डोळे झाकायचे असले तर घ्या झाकून.

In reply to by कॉमी

@कॉमी प्रा. राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैय्या हे १९९४ ते २०० पर्यंत सरसंघचालक होते ते जनेयुधारी ब्राम्हण होते काय हो? हा मूळ द्वेषमूलक प्रश्न होता. त्यातून पारशी लोकांत गांधी हे आडनाव नसतं. ते घांडी असतं. धड एक आडनाव नाही. मतांसाठी जनेयुधारी ब्राम्हण म्हणवून घ्यायचं स्वतः XX खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं

In reply to by कॉमी

@कॉमी प्रा. राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैय्या हे १९९४ ते २०० पर्यंत सरसंघचालक होते ते जनेयुधारी ब्राम्हण होते काय हो? हा मूळ द्वेषमूलक प्रश्न होता. त्यातून पारशी लोकांत गांधी हे आडनाव नसतं. ते घांडी असतं. धड एक आडनाव नाही. मतांसाठी जनेयुधारी ब्राम्हण म्हणवून घ्यायचं स्वतः XX खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं

In reply to by सुबोध खरे

१९७० मध्ये कॉम्रेड कृष्णा देसाई कम्युनिस्ट पक्षाच्या आमदाराचा खून झाला . या खुनाचे आरोपी शिवसेनेचे सदस्य होते आणि या खुनात श्री बाळ ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप केला होता. या नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत परळ मतदार संघात कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई या उभ्या राहिल्या असताना त्यांच्या विरुद्ध झंझावाती प्रचार करत श्री बाळ ठाकरे यांनी १५ सभा घेतल्या आणि आपल्या उमेदवार श्री वामनराव महाडिक यांनी विजयी केले होते. तेंव्हा बिचारी विधवा सारखे कोणी अरण्यरुदन केल्याचे आठवत नाही. https://www.loksatta.com/mumbai/know-all-about-history-of-shivsena-firs… https://en.wikipedia.org/wiki/Krishna_Desai

In reply to by सुबोध खरे

शिवसेनेने ऊमेदवार देऊ नका असं कधीही सांगीतलं नाही. पराभव दिसू लागल्याने भाजपने पळ काढलाय मैदानातून. स्वयंसेवकांनो, आजचा धडा काय?? पराभवापेक्षा पळ बरा.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत फडणवीस व रामदास कदम यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. आम्ही वाघाच्या तोंडात हात घालून वाघाचे दात मोजतो असे फडणवीस बोलल्यानंतर रामदास कदमांनी काहीतरी झोंबणारे उत्तर दिले होते. यावर तुमचा पगार किती ... बोलता किती असे फडणवीस बोलले होते. त्यावर उत्तर देताना कदम म्हटले होते की मी विरोधी पक्षनेता असताना तुम्ही माझ्या हाताखाली काम करायचा. पण कल्याण-डोंबिवली महापालिका निकालानंतर सेनेला पाठिंबा देऊन शेपूट घालून फडणवीसांनी समर्थकांना व मतदारांना तोंडावर पाडलं. संभाजीनगर महापालिका निवडणूक निकालानंतर याचीच पुनरावृत्ती झाली. नंतर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सेनेला पाठिंबा देऊन शेपूट घालून समर्थकांना व मतदारांना तोंडावर पाडलं. आता अंधेरी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा तेच. फडणवीसचे कट्टर समर्थक आता तोंड फुटून घ्यायला सरावले असतील. हा मास्टर स्ट्रोक आहे असे पडेल चेहऱ्याने सांगत राहतील. भविष्यात अजून अनेकदा तोंडावर आपटायची तयारी ठेवा. कार्यकर्त्यांना उचकवायचं, राणा भीमदेवी थाटात घोषणा करायच्या, कार्यकर्त्यांना लढायची पूर्ण तयारी करायला सांगायचं, मोठमोठ्या मिरवणुका काढायच्या आणि कार्यकर्ते चिलखत, ढाल, तलवार घेऊन रणांगणात उतरले की सपशेल माघार घेऊन त्यांना तोंडघशी पाडायचं हे यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. पण आता यामुळे भाजपमध्ये फडणवीस विरोधात उघड उघड आवाज उमटू लागतील. हा माणूस अजिबात भरवसा ठेवण्याच्या लायकीचा नाही व हा आपल्याला कधीही तोंडघशी पाडू शकतो हे आता भाजपेयींना समजायला प्रारंभ होईल. भाजपने स्वत:चं नाक कापून घेतलंय. १५-२० हजाराच्या मिरवणुकीने अर्ज भरायला गेले, ऋतुजा लटकेंना अर्ज भरता येऊ नये यासाठी लांड्यालबाड्या केल्या, राजीनामा लटकवत ठेवला, आदल्या दिवशी तक्रार दाखल केली आणि अर्ज मागे घेण्यास जेमतेम २ तास शिल्लक असताना माघार घेतली. त्यासाठी संस्कृती वगैरे जो तात्विक मुलामा चढवलाय त्यावर तान्हे मूल सुद्धा विश्वास ठेवणार नाही. काहीतरी सौदेबाजी नक्कीच झाली आहे. मुरजी पटेलला बिचाऱ्याला मिरवणुकीचा खर्च सोसावा लागला. फडणवीस सहकाऱ्यांना असेच तोंडघशी पाडणार. आता राज ठाकरेच भाजपचे निर्णय घेणार, पराभवाच्या भीतिने भाजप पळाला असे टोमणे सुरू झालेत. मुळात राज या नगण्य माणसाच्या पत्राची दखल घ्यायचं कारणंच काय होतं? याची अजून एक बाजू म्हणजे मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक अविरोध पार पडावी यासाठी शेलार व पवारांनी संगनमत करून अंधेरीतून भाजपने अर्ज मागे घेतला म्हणे. पण पवार व शेलार यांच्या साटेलोट्यात सेनेला फायदा कशाला द्यायचा? यामागे अजून एक तिसरी थिअरी आहे. ही पोटनिवडणूक भाजपने जिंकली असती तर आशिष शेलारांचं महत्त्व वाढेल व त्यातून आपल्याला अजून एक प्रतिस्पर्धी निर्माण होईल असे फडणवीसांना वाटले. शेलार मुख्यमंत्री होत असतील तर आम्ही पाठिंबा देऊ असे पवारांनी मोदी-शहांना सांगितल्याची बातमी काही काळापूर्वी आली होती. त्यामुळेच फडणवीसांनी या जागेवरून मुरजी पटेलांना माघार घ्यायला लावली जेणेकरून शेलारांचं महत्त्व वाढू नये. २०१७ मध्ये आशिष शेलारांनी मुंबई महापालिकेत ८२ नगरसेवक निवडून आणले. तेव्हा राष्ट्रवादी, मनसे असे पक्ष फोडून मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आणणे सहज शक्य होते. पण त्यामुळे आशिष शेलारांचं महत्त्व वाढून आपल्याला एक प्रतिस्पर्धी निर्माण होईल, या समजूतीतून फडणवीसांनी तेव्हाही मुंबई महापालिका सेनेला देऊन टाकली. एकनाथ शिंदेंबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर आशिष शेलारांना मंत्रीमंडळात घेतलेले नाही. आपल्या पहिल्या ५ वर्षात खडसे, पंकजा मुंडे, तावडे व बावनकुळे या आपल्या तथाकथित प्रतिस्पर्ध्यांना संपविल्यानंतर आता फडणवीस आपले उर्वरीत प्रतिस्पर्धी चंद्रकांत पाटील व शेलारांना संपविण्याच्या प्रयत्नात आहेत. पाटलांचे राज्याध्यक्ष पद काढून घेऊन व अत्यंत दुय्यम खाते देऊन लांबवर फेकले आहे. आता शेलारांना वर येऊ न देण्याचा प्रयत्न आहे. अर्थात डोळ्यांवर झापड बांधलेल्या फडणवीसांच्या अंधभक्तांना ही माघार हा सुद्धा एक दणदणीत मास्टर स्ट्रोक वाटला असणार. प्रत्येक वेळी तोंडावर आपटून तोंड काळे झाले तरी तो मास्टर स्ट्रोकच असतो.

In reply to by श्रीगुरुजी

पटले. फडणवीस हा व्यक्ति भाजपचे प्रचंड नूकसान करत आहे. खरं तर भाजप शिवसेना युती फिसकटली ती फक्त ह्या व्यक्तीच्या ईगोमूळे. अनेक भाजपचे मतदार नाराज आहे फडणवीसवर. एकतर शिवसेनेसोबत यपती करायला नको होती, केलीच तर बंडखोर ऊभे करायला नको होते, सेनेला एक वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं तरी सेना तयार झाली असती. पण पाच वर्षांच्या हट्टापायी स्वतः चे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपदही घालवून घातले. १०५ घरी बसवले म्हणून संजय राऊतांच्या नावाने गळे काढनारे फडणवीस ह्या व्यक्तिस मात्र दोष देत नाहीत. खडसे बावनकूळे, तालडे, मूंडे ह्यांना थोडा स्पेस दिला असता तर ह्या लोकानी स्वतः सोबत आणखी १५ आमदार तरी जिंकवले असते. १०५ अधीक १५ १२० आमदार झाले असते भाजपचे. पण विनाशकाले विपरीत बूध्दे…..

In reply to by पॉल पॉट

पण विनाशकाले विपरीत बूध्दे….. पण भाजपाचा असा विनाश झाला तर मनातून तुम्हाला आनंदच होत असेल ना ?

In reply to by धर्मराजमुटके

भाजपला महाराष्ट्रात किमान पुढील २ विधानसभा निवडणुकीत अजिबात संधी नाही. स्वबळावर १२२ जागा जिंकणाऱ्या भाजपला आता १ आमदार असलेल्याचे अनाहूत सल्ले ऐकावे लागत आहेत यापेक्षा दुर्दैव ते काय. अनेक नेत्यांनी अनेक वर्षे परीश्रम करून स्वबळावर बहुमताच्या जवळ आणलेला पक्ष फक्त एका व्यक्तीच्या सत्तेच्या वखवखीमुळे घसरणीला लागला आहे आणि अत्यंत भ्रष्ट, जातीयवादी, गुन्हेगार असलेल्यांना जवळ करून डोक्यावर घेत आहे, हे माझ्यासाठी अतिशय दु:खदायक आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेऊन स्वत:ची छी थू करून घेऊन नाक कापून घेतले, ते सहज टाळता येण्यासारखे होते. एकतर निवडणुकीत उमेदवार द्यायलाच नको होता. दिला तर शेवटपर्यंत लढायचे होते. पण उमेदवार दिला, पक्षकार्यालय उघडले, जोरदार प्रचार सुरू केला, अर्ज भरताना दणक्यात मोठी मिरवणूक काढली आणि कोणीतरी पत्र लिहिले म्हणून अचानक माघार घेऊन पळ काढला. त्या उमेदवाराला, कार्यकर्त्यांना, समर्थकांना तोंडावर आपटवून संस्कृती वगैरे गप्पा ठोकायला हे मोकळे आणि हा जोरदार मास्टर स्ट्रोक म्हणून माघारीचे समर्थन करायला फडणवीस भक्त व समर्थक पत्रकारही मोकळे.

In reply to by श्रीगुरुजी

आणि कोणीतरी पत्र लिहिले म्हणून अचानक माघार घेऊन पळ काढला. राज ठाकरेंची मुंबई पालिका निवडणूकीत मेहेरबानी व्हावी म्हणून भाजपने त्यांच्या पत्रानंतर लगेच ऊमेदवार मागे घेतला असावा का? “ठाकरे” ब्रॅंड किती गरजेचाय भाजपला?

In reply to by धर्मराजमुटके

जोपर्यंत फडणवीस सारखे नेते राज्यात आहेत तोपर्यंत भाजपचा विनाशच व्हावा असेच वाटते. कोरोना काळात केलेले गलिच्छ राजकारण, सुशांतसींग प्रकरणात मुंबई पोलिसांची केलेली बदनामी, साधू हत्याकांडावरून घातलेला तमाशा, वेंदाता प्रकल्प गुजरातला हलवणे हे पाहीलं की भाजपचा कट्टर समर्थक असनारे आमच्यासारखे लोक भाजपचा सत्यानाश व्हावा ह्या मतापर्यंत आलोय.

"किती पाऊस पडला पाहिजे हे ठरविणे हे महापालिकेच्या हातात नाही" हे विधान आणि "धरणात पाणी नाही तर मग आम्ही मु**चे का?" ही दोन्ही विधाने एकसारख्या पध्दतीने असंस्कृत आणि बेमुर्वतखोर पणा दाखवणारी आहेत.