✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चर्चा: बीएमसी निवडणूक २०२२

व
विवेकपटाईत यांनी
Mon, 10/03/2022 - 11:57  ·  लेख
लेख
बीएमसीच्या गत निवडणुकीत शिवसेनेला जवळपास 31 टक्के, भाजपला 28%, मनसेला ८.५० टक्के, दोन्ही काँग्रेस मिळून २१ टक्के. यंदाची निवडणूक मुंबईचा राजा कोण यासाठी आहे. निवडणुकीत काय होणार यावर चर्चा अपेक्षित.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4894 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

कोणत्याही महापालिकेची निवडणूक

श्रीगुरुजी
Mon, 10/03/2022 - 12:42 नवीन
कोणत्याही महापालिकेची निवडणूक पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार नाही असा माझा अंदाज आहे. मग कशासाठी आतापासूनच चर्चा? अंधेरीचे आमदार रमेश लटके जाऊन ११ नोव्हेंबरला ६ महिने पूर्ण होतील. कोणतीही निवडणूक ६ महिन्यांच्या आतच घ्यावी लागते. त्यामुळे ही पोटनिवडणूक शक्य तेवढी पुढे ढकलून आता केवळ नाईलाजाने जवळपास पावणेसहा महिने उलटल्यानंतर २ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. महापालिका निवडणूक किती पुढे ढकलायची यावर कोणतेही कायदेशीर बंधन नसल्याने या निवडणुका होणे अवघड आहे. सध्या आपल्या ताब्यात असलेल्या महापालिका आपण हरणार याची भाजप व सेना या दोघांनाही पूर्ण खात्री असल्याने प्रत्येक वेळी एक नवीन कायदेशीर अडथळा निर्माण करून निवडणुका घेतल्या जात नाहीत.
  • Log in or register to post comments

भाकीत पूर्ण खरे ठरले आहे.

श्रीगुरुजी
Mon, 11/11/2024 - 15:04 नवीन
भाकीत पूर्ण खरे ठरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

अमरेंद्र बाहुबली
Mon, 11/11/2024 - 16:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शिवसेनेचे ३१ टक्के कोण कसे

शाम भागवत
Mon, 10/03/2022 - 15:10 नवीन
शिवसेनेचे ३१ टक्के कोण कसे ढापतोय ते पहाणे मजेचे व उत्सुकतेचे असणार आहे.
  • Log in or register to post comments

त्याआधी भाजपचे २८ टक्के कोण,

श्रीगुरुजी
Mon, 10/03/2022 - 15:15 नवीन
त्याआधी भाजपचे २८ टक्के कोण, कसे ढापतोय ते पहावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

जरूर पहा व सविस्तर सांगा.

शाम भागवत
Mon, 10/03/2022 - 15:24 नवीन
जरूर पहा व सविस्तर सांगा. फडणवीस हे एकमेव कारण असणार म्हणा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

निवडणूक होईल (झाली तर) तेव्हा

श्रीगुरुजी
Mon, 10/03/2022 - 15:47 नवीन
निवडणूक होईल (झाली तर) तेव्हा समजेलच. पण समजून सुद्धा काही जणांना उमजणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

निवडणूक तर होणारच. तेही

शाम भागवत
Mon, 10/03/2022 - 20:15 नवीन
निवडणूक तर होणारच. तेही वेळेवरच. दिवाळीच्या सुमारास. फडणवीसांना शिव्या घालता याव्यात म्हणून काही जणांना निवडणुका नको असतील तर ते काई मला माहीत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

धन्यवाद! पुढील ३ आठवड्यात

श्रीगुरुजी
Mon, 10/03/2022 - 20:22 नवीन
धन्यवाद! पुढील ३ आठवड्यात निवडणूक होणार तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

तुम्हाला २०२३ ची दिवाळी

श्रीगुरुजी
Wed, 10/26/2022 - 16:04 नवीन
तुम्हाला २०२३ ची दिवाळी य्हणायचं होतं की २०२४ ची दिवाळी? फडणवीस तर म्हणतात की निवडणूक कधी होईल हे ईश्वर, न्यायालयालाच ठाऊक : २०२२ ची दिवाळी तर आज संपतेय. उद्धव व देवेंद्र या दोघांनाही महापालिका निवडणूक नकोय. त्यामुळे इतक्यात निवडणूक होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

मुंबई महापालिका निवडणूक होऊन

श्रीगुरुजी
Mon, 11/11/2024 - 15:05 नवीन
मुंबई महापालिका निवडणूक होऊन गेली की काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

दिल

कंजूस
Mon, 10/03/2022 - 15:33 नवीन
दिल्लीतले आप इथे येऊन सर्वांना झाडणार ( चिन्ह - खराटा) काय?
  • Log in or register to post comments

विषम लडाई आहे ...

मुक्त विहारि
Mon, 10/03/2022 - 15:59 नवीन
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट विरूद्ध भाजप अधिक शिंदे गट. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट, एक एकटे लढणार नाहीत आणि ही काळजी माननीय शरद पवार आणि सोनिया गांधी नक्कीच घेतील. भाजप आणि शिंदे गट, यांच्या बरोबर राज ठाकरे यांनी जुळवून घेतले तर, निकाल वेगळा लागू शकतो. पण, मनसे जुळवून घेण्याची शक्यता कमीच. निकाल जर, भाजपच्या विरोधात गेला तर, अपयशाचे खापर फडणवीस यांच्या माथीच फुटणार आणि भाजप जिंकली तर, यशाचा मुकूट शिंदे यांच्या शिरावर निकाल काहीही लागला तरी, ठाकरे गटाची फरफट चालूच राहणार....
  • Log in or register to post comments

भाजपने शिंदे गट, मनसे

श्रीगुरुजी
Mon, 10/03/2022 - 17:30 नवीन
भाजपने शिंदे गट, मनसे वगैरेंबरोबर युती न करता स्वतंत्र निवडणूक लढली नाही तर कमी जागा लढाव्या लागतील व २८% मतांमध्ये वाटेकरी निर्माण होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शिंदे गट आणि भाजपला,

मुक्त विहारि
Mon, 10/03/2022 - 17:43 नवीन
आता एकमेकां शिवाय पर्याय नाही .... पुढील, लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणूकीत पण, हे एकमेकांना साथ देतीलच. कारण, दुसरा पर्याय, शिंदे गटाला नाही... मनसेला ह्या गोष्टीचा फायदा करून घेता येईल. फक्त खारीच्या वाट्याला मनसे तयार व्हायला हवी. आता हातात शून्य घ्यायचे? की, खारीचा वाटा उचलायचा? हा प्रश्र्न मनसेचा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भाजपामधील फडणवीस विरोधकांना

शाम भागवत
Mon, 10/03/2022 - 20:18 नवीन
भाजपामधील फडणवीस विरोधकांना काबूत ठेवण्यासाठी शिंदे गट पाहिजेच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

फडणवीस विरोधकांना

श्रीगुरुजी
Mon, 10/03/2022 - 20:24 नवीन
फडणवीस विरोधकांना संपविण्यासाठी पक्ष सेनेच्या गोठ्यात नेऊन बांधला आणि अनुकूल परिस्थिती असूनही सत्ता घालविली. आता तर महाराष्ट्र भाजपत फडणवीस विरोधक शिल्लकच नाहीत. मग कशाला शिंदे गट हवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

तुम्हाला अजूनही असे वाटत असेल की, फडणवीस म्हणजे महाराष्ट्र भाजप

मुक्त विहारि
Mon, 10/03/2022 - 21:26 नवीन
तर, तो भ्रम आहे .... भाजपची कार्यकारणी निर्णय घेते आणि माननीय शरद पवार यांना हे ठाऊक आहे. केंद्रीय पातळीवर निर्णय घेतल्या जातात आणि इतरांना ते पाळावे लागतात. मग ते प्रमोद महाजन असोत किंवा गोपीनाथ मुंडे असोत किंवा फडणवीस.... महाराष्ट्र राज्यातील मंत्री मंडळात, कुणाचा समावेश करायचा आणि कुणाचा नाही? हे पण केंद्रीय पातळीवर ठरवल्या जाते. कॉंग्रेस देखील हेच करते.... तसेच, शिवसेना आमदार आणि खासदाराच्या उमेदवारी बाबतीत, मातोश्रीवर निर्णय घेतल्या जातात... जागा वाटप करतांना देखील, भाजपची केंद्रीय कार्यकारणी निर्णय घेत होती. जाता जाता, एक उदाहरण देतो. क्रिकेट मधलेच आहे. न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया, ह्या मध्ये एका मॅच मध्ये, ऑस्ट्रेलिया कडून शेवटचा बाॅल अंडरआर्म टाकल्या गेला. निर्णय कॅप्टनने घेतला होता आणि गोलंदाजाला त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे भाग होते... सगळा दोष गोलंदाजाला आपल्या माथ्यावर घ्यायला लागला... तीच गोष्ट साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या मध्ये झालेल्या चेंडूच्या लकाकी बाबतीत... स्मिथ आणि वार्नर अजूनही खेळत आहेत पण बळीचा बकरा मात्र बाहेरच आहे ... तुम्हाला हे पटणार नाही, त्यामुळे हा माझा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असं कसं? असं कसं?

शाम भागवत
Mon, 10/03/2022 - 21:53 नवीन
असं कसं? असं कसं? निर्णय कोणीही घेवो. फडणवीसच जबाबदार असतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

भाजपची केंद्रीय कार्यकारणी निर्णय घेते.. कृपया खालील बातमी वाचा

मुक्त विहारि
Mon, 10/03/2022 - 21:59 नवीन
अंधेरी पोटनिवडणूक भाजपच लढणार "because of lack of election symbol with Shinde group by-election of Andheri East assembly seat going to contest by BJP | Loksatta" https://www.loksatta.com/politics/because-of-lack-of-election-symbol-with-shinde-group-by-election-of-andheri-east-assembly-seat-going-to-contest-by-bjp-print-politics-news-asj-82-3168143/ मात्र याबाबत विचारता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ‘ लोकसत्ता ‘ शी बोलताना म्हणाले, ही जागा भाजपने लढवायची की शिंदे गटाने आणि भाजप लढल्यास उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय केंद्रीय संसदीय मंडळाकडून घेतला जाईल. ------- अपयशाचे खापर फडणवीस यांच्या माथीच फुटणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

बरं, क्षणभर असं गृहीत धरू की

श्रीगुरुजी
Mon, 10/03/2022 - 22:05 नवीन
बरं, क्षणभर असं गृहीत धरू की महाराष्ट्रात फडणवीस विरोधकांना संपविण्याचा निर्णय मोदी-शहांचा होता. त्यासाठी त्यांनीच पंकजा मुंडेंविरूद्ध तथ्यहीन चिक्की प्रकरण, विनोद तावडेंविरूद्ध तथ्यहीन पदवी प्रकरण, खडसेंविरूद्ध पाकिस्तानवरून आलेला दूरध्वनी व भ्रष्टाचाराची तथ्यहीन प्रकरणे काढायला लावली. मोदी-शहांनीच बावनकुळे, तावडे, खडसेंना उमेदवारी नाकारली. मोदी-शहांनीच पंकजा मुंडे व खडसेंच्या मुलीला पाडले. पण मग फडणवीस विरोधकांना संपविण्यासाठी मोदी-शहांना इतके सर्व करण्याची काय गरज होती? त्यांना थेट मंत्रीपदावरून काढता आले असते की. आणि या सर्वांना संपविल्यानंतर पक्षात फडणवीस विरोधक शिल्लकच नाहीत. मग शिंदे गटाला वापरून भाजपतले कोणते फडणवीस विरोधक संपविणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

केंद्रीय पातळीवर निर्णय

गणेशा
Mon, 10/17/2022 - 20:00 नवीन
केंद्रीय पातळीवर निर्णय घेतल्या जातात आणि इतरांना ते पाळावे लागतात. मग ते प्रमोद महाजन असोत किंवा गोपीनाथ मुंडे असोत किंवा फडणवीस.... महाराष्ट्र राज्यातील मंत्री मंडळात, कुणाचा समावेश करायचा आणि कुणाचा नाही? हे पण केंद्रीय पातळीवर ठरवल्या जाते. कॉंग्रेस देखील हेच करते....
यावर मला एक प्रश्न पडतो, काँग्रेस काळात महाराष्ट्र नेते दिल्लीला जाऊन निर्णय घेतात, म्हणजे ते काँग्रेस अध्यक्षांचे तळवे चाटतात.. त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाहित वगैरे... आणि हेच भाजप करत असल्यास केंद्रीय कार्यकारणी? भाजप समर्थक लोकांना, स्वतःच आपल्या या डबलढोलकी मतांचे काहीच वाटत नाही का? कि आपण स्वतःला कोणाच्या तरी दावणीला बांधून घेतलं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

भाजप समर्थक वैचारीक गंडलेले

पॉल पॉट
Mon, 10/17/2022 - 22:40 नवीन
भाजप समर्थक वैचारीक गंडलेले आहेत. काॅंग्रेसचे नेते दिल्लीत तळवे चाटतात नी भाजप नेते पक्षादेशाचे पालन करतात. एकनाथ खडसेंना पक्षाने सर्व दिलं पण एकनाथ शिंदेंनी पक्ष वाढवला. असो. अंधेरीत यशस्वी पलायन केलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

कारण आहे

मुक्त विहारि
Tue, 10/18/2022 - 09:11 नवीन
ते गांधी घराण्याचे निर्णय असतात भाजपच्या केंद्रीय पातळीवर, घराणेशाही नाही असो, घराणेशाही आणि समिति, ह्यांत फरक आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

वरील प्रतिसाद, गणेशा यांनाच आहे

मुक्त विहारि
Tue, 10/18/2022 - 09:16 नवीन
इतरांनी चोंबडेपणा करायला येऊ नये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

क्रिकेट शी काडीचा संबंध

पॉल पॉट
Tue, 10/18/2022 - 10:58 नवीन
क्रिकेट शी काडीचा संबंध नसलेला जय शहा बीसीसीआय मध्ये जातो. राजनाथ सिंगचा मूलगा आमदार/खासदार. आमदारपूत्र नी मंत्री काकूंचा पुतण्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा मामू होतो. रावसाहेब दानवेंचा मूलगा आमदार. नारायण राणे ह्या भाजप मंत्र्याचा मूलगा खासदार आमदार गणेश नाईक ह्या भाजप आमदाराचा मूलगा आमदार, खासदार, महापौर. विजयकूमार गावीत ह्या भाजप आमदाराची मूलगी हिना गावीत खासदार. भाजपमध्ये घराणेशाही मात्र नाही अध्यक्ष महोदय. भाजप समर्थक वैचारीक गंडलेले का असतात ते आता कळालेच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री...

mayu4u
Tue, 10/18/2022 - 15:07 नवीन
त्या ताईंचं नाव राहिलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉल पॉट

भाजपामधील फडणवीस विरोधकांना काबूत ठेवण्यासाठी शिंदे गट पाहिजेच.

मुक्त विहारि
Mon, 10/03/2022 - 21:00 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा ठाकरे गटाला पाठिंबा...

मुक्त विहारि
Mon, 10/03/2022 - 17:38 नवीन
"andheri east by poll election sharad pawar ncp support shivsena uddhav thackeray ssa 97 | Loksatta" https://www.loksatta.com/maharashtra/andheri-east-by-poll-election-sharad-pawar-ncp-support-shivsena-uddhav-thackeray-ssa-97-3167502/ शरद पवार, हे दूरदृष्टी असलेले व्यक्तीमत्व आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शंभर खोके कोणाकडे जाणार?

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 10/03/2022 - 16:16 नवीन
निवडुन कोणीही आले तरी फक्त चेहरा बदलणार. महीना शंभर खोके कोणाला जाणार ईतकाच काय तो फरक. बाकी मुंबईतील वाढती गर्दी, अतिक्रमणे, झोपडपट्टी, रस्त्यावरचे खड्डे, अनधिकृत बांधकामे यात काही फरक पडणार आहे का? किंबहुना वरीलपैकी कोणत्याही पक्षाला/नेत्याला तशी ईच्छा आहे का? हा खरा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

पुढील काही वर्षे भाजप आणि

चौथा कोनाडा
Mon, 10/03/2022 - 18:32 नवीन
पुढील काही वर्षे भाजप आणि शिंदे गटाच्या मुंबईतील अस्तित्वाची, प्रगतीची वर्षे आहेत, दोघेही सहकार्य करत चांगली कामगिरी करतील, डबल इंजिन बनवतील असं वाटतं.
  • Log in or register to post comments

शिंदे आणि फडणवीस, यांना...

मुक्त विहारि
Mon, 10/03/2022 - 19:33 नवीन
केंव्हा बोलायचे? आणि कसे बोलायचे? हे उत्तम समजते... पण, इतर मंडळींना ते जमले पाहिजे .... केसरकर तसे बरे बोलतात पण, सत्तार सारखी मंडळी बोलून घालवण्याची शक्यता जास्त ... ह्या बाबतीत, माननीय शरद पवार यांना मानले पाहिजे....माननीय शरद पवार जास्त बोलत नाहीत... अतिशय मुरब्बी राजकारणी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

शरद पवार, यांचे खालील वक्तव्य जरूर वाचा ....

मुक्त विहारि
Mon, 10/03/2022 - 20:11 नवीन
https://www.loksatta.com/pune/will-ncp-participate-in-rahul-gandhis-bharat-jodo-yatra-sharad-pawars-role-is-clear-msr-87-3167431/lite/ तुम्ही, तुमच्या घरी सुखी आणि मी माझ्या घरी सुखी ... हे योग्य भाषेत सांगीतले .. ------ ह्या उलट, नारायण राणे यांचे वक्तव्य बघा... https://www.loksatta.com/maharashtra/narayan-rane-comment-on-uddhav-thackeray-dussehra-melava-presence-prd-96-3167924/ अनावश्यक पंगा .... ---------- ज्याला योग्य वेळी, मौन धारण करता येते आणि योग्य वेळी हजरजबाबी , तो खरा राजकारणी... प्रत्येक वेळी, तलवार काढून चालत नाही, कधी कधी सुईने पण काम करावे लागते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा