श्री. अरुण वडुलेकर यांनी सादर केलेले "एक होती परी" ह्या बालगीतांचे रसग्रहण वाचून आणि विशेशत: परीची कविता वाचून,
अशीच एक मनांत ठसलेली पराची कविता सादर करण्याचा मोह आवरत नाही. या कवितेचा जनक कोण आहे ते माहीत्ये का तुम्हाला .. श्री अरुण वडुलेकर हेच्च :)
पण बटाटवड्यातल्या लसणा इतकीच या कवितेची चव अजून जिभेवर लोळते आहे.
एक होता परा
एक होता परा खूप खूप गोरा
एवढासा होता पण छान जर्सी गोर्हा
एकदा काय झालं
पुण्यातल्या मुठेला पूर मोठा आला
पराचा कॅफे वाहून गेला
रड रड रडला ,वेडा पिसा झाला
आंदोबा भाऊकडे धावत गेला
आंदोबा म्हणाला
उगी उगी दात ओठ नको खाऊस
येतो मी नदी काठीं
(एकदा ऍप्रायझल होऊन दे)
कॅफे देतो बांधून
तेंव्हा पासून परा (मुळा)नदीकाठीच राहिला
( त्या गटाराच्या ) पाण्यांच्या माशांचा मालक झाला
आंदोबा आंदोबा लवकर ये
पराचा बंगला बांधून दे.
हे विडंबण म्हणजे मनोरंजन आणि तारूण्य या दोनही भावनांची विलक्षण भेसळ आहे. छान जर्सी गोर्हा या केवळ तीन शब्दांनी पराचे भरदार डौलदार व्यक्तिमत्व वशिंडा सकट डोळ्यापुढे उभे राहयचे. पराचा कॅफे वाहून गेला म्हटले की परा बरोबरच आम्हीही रडवेले होत असूं. मग आंदोबाने पराला पुन्हा कॅफे बांधून देण्याचे अश्वासन दिले की हायसं वाटायचं. पण ह्या रेसेशन मधे त्याला आउंदा इंक्रिमेंट मिळेल की नाही, ऍप्रायझल होईल की नाही असा विचार करून भितीही वाटत असे.
पण अजूनही जेंव्हा जेंव्हा एखाद्या नदीकाठी जाणं होतं तेंव्हा त्या पाण्याच्या माशांचे झुंड पहातांना त्यांचा मालक परा मला अजूनही आठवतो आणि आंदोबाने त्याचा शब्द अजून पाळला नाही म्हणून अजूनही त्याच्याशी कट्टी कराविशी वाटते. ए आंद्या कट्टी रे तुझ्याशी. मग त्या माशांना गट्टम केलं की त्यांतून परा बाहेर येऊन मला भेटेल असे मला अजूनही वाटत राहते.
तळटिप : परिकथेतील राजकुमार आणि आणंदयात्री हे आम्हाला अणूक्रमे मोठ्या आणि छोट्या भावासारखे आहेत (तिघांना घेउन अमर-अकबर-अँथोनी रिमेक निघेल .. असो) त्यामुळे त्यांना हलकेच घ्या असं औपचारीक सांगावसं वाटलं नाही. श्री. अरुण वडुलेकर सरांच कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी हार्दिक आभार
- टारू(ण) पिंपळेकर
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5526
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
!!!
+१
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +१ by नितिन थत्ते
टारुभौ
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
भाड्या !!
कालच आम्ही
In reply to भाड्या !! by आनंदयात्री
हाहाहाहा
झक्कास
महान आहात!
हेच म्हणते..
In reply to महान आहात! by क्रान्ति
अफलातून
हुच्च हुडगा!!
आयला
आयला हसून
लै म्हंजी
हेच
In reply to लै म्हंजी by अवलिया
ह्हा ह्हा
In reply to हेच by सहज
१+
रे टार्या
च्यायला
च्यायला
In reply to च्यायला by परिकथेतील राजकुमार
कोन्ला सांगु नको
In reply to च्यायला by परिकथेतील राजकुमार
सही!
छान विडंबन ...
बाकी
मस्त रे!!!