Skip to main content

आवाज कोणाचा???

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 30/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1719
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

माझे मतः स्थिर (बहुमतातील) राष्ट्रीय लोकशाहि आघाडी सरकार स्वरूपः भाजप + निवडणूकपूर्व मित्रपक्ष बसपा ए.आय्.डीएम्.के (शिवाय आयत्यावेळी कदाचित बिजद, नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा) सपा + बसपा हे एका आघाडीत जाणे अथवा द्रमुक/अद्रमुक एका आघाडीत जाणे हे जवळ जवळ अशक्य आहे तेव्हा बाकी आघाड्या मार खातील असे वाटते. भाजप मायावती यांना उपपंतप्रधानपद देतील असे वाटते. ऋषिकेश

क्लींटनसाहेबांना लेटेस्ट अंदाज वर्तवायला सांगा. खराटा (रंग माझा वेगळा)

ही चौथी आघाडी वगैरे काय भानगड आहे? जरा सविस्तरपणे लिहीलंत तर बरं होईल. हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

In reply to by अनंता

हि एक काल्पनिक आघडी आहे जिचे निमंत्रक लालु-मुलायम आहेत. या आघाडीचे वर्णन साधारण काँग्रेस, भाजपा व डावे विरहित आघाडी असे करता येईल. चौथी आघाडी = सपा + बसपा + द्रमुक + अद्रमुक + राष्ट्रवादी + नॅशनल कॉ. + बिजद + राजन + रिपाई इत्यादी + आध्रातील चिरंजीवीचा पक्ष (नाव विसरलो)+अपक्ष, इतर अश्या लहान लहान पक्षांची मोट हि आघाडी सत्तेत आली तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतील ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

आध्रातील चिरंजीवीचा पक्ष (नाव विसरलो) प्रजाराज्यम. माईंड इट्ट !! परांजीवी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

म्हंजे ३० तार्खेच्या सध्याकाल पर्यन्त थांबुन हा काठ्याकुट टाकल्याबद्दल आपले आभार कारन असे पोल लोकांन्च्या मनावर परीणाम करतात. आनि लोक मतदान कोनाला करायचं त्याचा निर्नय बदलु शकतात. हे मी मुक्तसूनीत रावान्ला लागाव म्हनुन बोलत नाही पन एन्ट्री आनि एक्जिट पोल हे निवडनुकीची वेळ सम्पे पर्यन्त टाळलेल बर. आता काल इतरानी कोनाला मत दिल वाचुन सर्वाना वाटल असेल कि मनसे इतराना आवडते तर आपनपन मन्से निवडुन द्याव. मी माझ मत हत्तीला दिल कारन बहन मायावती नक्की कायतरी चांगल करतील आनि देशाचा पीयेम पन त्याच निवडतील अस माला ठाम वाटत. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

अस्थिर (अल्पमतातील) संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार बिपिन कार्यकर्ते

अरे वा! अजून तरी बहुसंख्यांना स्थिर(बहुमतातील) सरकार येईल असं वाटतंय ऋषिकेश

यातले सर्वच पर्याय व्यर्थ आहेत. जोपर्यंत एकाच राष्ट्रीय पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार येत नाही तोपर्यंत आपली अधोगती होतच रहाणार आहे. अधोगती मोजायला कोणताच तळ नसतो. ती एक न संपणारी प्रक्रिया आहे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|