Skip to main content
लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 12/08/2022 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
करायला गेले नारळाची वडी झाली नारळाची चिक्की असो. साहित्य: S एक फुलपात्रं ओल्या नारळाचा चव अर्धे फुलपात्रं साखर दोन चमचे तूप विलायची पावडर रोझ सिरप २-४ चमचे मिल्क पावडर/दुधाची साय सजावटीसाठी सुका मेवा नानस्टिक कढईत साजूक तूप किंचित गरम करायचे. ओल्या नारळाचा चव (काळा भाग नको शक्यता) आणि साखर एकत्रित करून कढईत परतायची.मंद आच ठेवायची. साखर विरघळली की त्यात विलायची पूड,रोझ सिरप टाकायचा.मिश्रण परतत राहायचे. न्यूटनचा नियमानुसार उचटन सरळ उभं राहिलं की गॅस बंद करायचा किंवा मिश्रणाचा छोटा पेढ्या एवढा गोळा झाला की बंद करायचा. तूप लावलेल्या ताटात किंवा बटर पेपर असलेल्या केकच्या भांड्यात गरम वड्या थापायच्या. सुकामेव्याने सजावट करायची. गुलाबी मस्त ओल्या नारळाची बर्फी तयार. 9 A (माझा संशय मिल्क पावडर वर आहे मी ती जास्त वापरली म्हणून चिक्की तयार झाली,पण चवीला मस्त झाली ) -भक्ती

वाचने 8642
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

लहानपणी काजुकंदाची वडी खायचो,अशीच दिसायची. आजुनही चितळ्यांकडे मीळते. स्वयंपाक घराशी वावडे असल्याने रेसिपीज कथे सारख्या वाटतात. कथा एका नारळाच्या बर्फीची. फोटो मस्त.

मस्त पाककृती आहे. होय मिल्क पावडर घातली की रवाळपणा येत नाही. मला पण नेहमी हा प्रॅाब्लेम येतो, जेव्हा मिल्क पावडर वापरायला लागते.

In reply to by सरिता बांदेकर

होय मिल्क पावडर घातली की रवाळपणा येत नाही.
उलट पदार्थाचा चिकटपणाच वाढला. प्रतिसादासाठी धन्यवाद!

In reply to by राघव

मला आवड आहे वेगवेगळे प्रयोग करायची.आणि तो रंग ‌नाही गुलाब सिरप आहे :) सर्वांना धन्यवाद :)