पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अळुच्या वड्या बनवायलाच पाहिजेत. या वेळेस मी गुजराती पद्धतीचा अळूच्या पत्र्या असे त्याला म्हणतात अशा ही करायच्या ठरवल्या.
या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेता येईल की इतके दिवस जो माझा पदार्थ चुकत होता, ज्या प्रकारे त्याला लेयर पडत नव्हते .लक्षात आले की जे बेसन पीठ आहे ते घट्ट मळायचे आहे मळायचे म्हणण्यापेक्षा ते त्याचं जे बेसन पीठ आहे ते त्याचा घोळ जो आहे तो घट्ट करायला पाहिजे.
चला तर करूया मग अळूच्या पानाच्या वड्या
पहिल्यांदा अळूची दहा-बारा पाने घ्यायची पाणी स्वच्छ करून घ्यायची आणि त्याची देठे काढून घ्यायची अळुच्या पानांना आता तेल लावून घ्यायचे.
आता बेसन पीठ साधारणतः तीन वाट्या घ्यायचे.
त्यात दोन चमचे मिरची आलं लसूण पेस्ट ,ओवा, तीळ, हळद ,हिंग ,मीठ असे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी टाकत घट्टसर मळून घ्यायचे.
आळूची पानं घशाला खवखवणे म्हणून ती त्रिकोणी असतील असलेली हवी याकडे लक्ष द्यायचे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये चिंच गुळाचा एक छोटी वाटी कोळ घालायचा आहे .
आता आता आळूचे एक पान घेऊन त्यावर हे बेसन पिठाचे घोळ पसरवायचा आहे हातानेच आणि त्यावर दुसरे पान ठेवून तो देखील घोळ त्याच्यावरती पसरवायचा आहे तुम्हाला जेवढे जास्त लेअर्स हवे तेवढे जास्त पाने एकावर एक ठेवत जायच आहे. मी इथे साधारणता तीन पाने एकत्र घेतलेली आहेत.
त्यानंतर याची गुंडाळी करायची आहे .
ह्या अळूच्या पानांची केलेले गुंडाळी आता डायरेक्ट बारीक चिरून तळू शकतो म्हणजे न उकडता ही पहिली पद्धत.
दुसर्या पद्धतीमध्ये आळूची ही रोल केलेली पाने उकडून घ्यायचे. अर्थात शिट्टी न लावता ते भांड्यात किंवा इडली पात्र मध्ये उकडून घ्यायचे.
आता उकडलेली पाने गोलसर चिरून ती खमंग खुसखुशीत डीप फ्राय करून घ्यायचे.
अशा पद्धतीने दोन पद्धतीने अळूच्या वड्या झटपट तयार होऊ शकतात.
अळूच्या देठांची कोशिंबीर
आता आता अशी एक गंमत की अळूच्या देठांचं करायचं काय ?
तर शोधता शोधता एक पारंपरिक रेसिपी सापडली.
यामध्ये पहिल्यांदा आळूच्या देठाचे ज्या शिरा आहेत वरच्या त्या काढून घ्यायच्या, वरचा आवरण काढून घ्यायचे.
ते आवरण काढून घेतल्यानंतर त्याचे एक ते दोन सेंटीमीटर चे तुकडे करून घ्यायचे.
या देठांपासून ही दोन रेसिपीज तयार करू शकतो.
१. ज्या पद्धतीने इतर भाज्या करतो त्या पद्धतीने परतवून हे देठ हलकेसे भाजून परतवून शेंगदाण्याचा कूट घालून भाजी करू शकतो.
२. किंवा याची आपण कोशिंबीर किंवा रायता करू शकतो.
तर मी कोशिंबीर केली यामध्ये ही देठ पाण्यामध्ये उकळून घ्यायची .
उकळलेल्या देठांमध्ये दोन किंवा एक चमचा दही घालायचे आहे.
दोन चमचे दाण्याचा कूट ,मीठ ,साखर (कधीही कोणत्याही लिंबू किंवा दह्याचा वापर केल्यावर एक चमचा साखर घालावी जेणेकरून ती चव जी आहे ती अतिशय आंबट न होता बॅलन्स होते )
आता फोडणीसाठी तेल गरम करायचे.
गरम तेलामध्ये जिरे, हिंग आणि तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि गॅस बंद केल्यावर कोथिंबीर टाकायची चिरलेली कोथिंबीर टाकायची.
ही फोडणी तयार केलेल्या रायत्याला/कोशिम्बीरला द्यायची.
करता करता आणखी एक आठवलं की फ्रिजमध्ये एक वाटी सोललेले डाळिंब आहे आणि मग अचूकच त्याच्यामध्ये मी डाळिंब दाणे टाकले.
अशी ही आळूच्या देठांची अधिक डाळिंबाची कोशिंबीर तयार तुमच्याकडे पेरू, सफरचंद जे फळ असेल ते बारीक चिरून ही तुम्ही ते टाकून ही कोशिंबीर तयार करू शकता.
परंतु ही कोशिंबीर फळांमुळे जास्त वेळ न ठेवता लगेच खावी लागते
अळू वड्या,अळू देठ डाळिंब दाणे कोशिंबीर,घरी बनवलेली पनीर चिली मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
-भक्ती
वाचने
21008
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
अळू वड्या उत्तम झालेल्या
धन्यवाद गवि!
In reply to अळू वड्या उत्तम झालेल्या by गवि
"बायप्रॉडक्ट" पदार्थ म्हणजे
In reply to अळू वड्या उत्तम झालेल्या by गवि
कद्दूच्या सालींंचे बारीक
In reply to "बायप्रॉडक्ट" पदार्थ म्हणजे by वामन देशमुख
सहमत
In reply to "बायप्रॉडक्ट" पदार्थ म्हणजे by वामन देशमुख
अळूच्या वड्या (आणि पातळ भाजी
अळूची पातळभाजी हा अनेकदा
In reply to अळूच्या वड्या (आणि पातळ भाजी by वामन देशमुख
हेच लिहायला आले होते ;) अळूची
In reply to अळूची पातळभाजी हा अनेकदा by गवि
मराठवाड्यातील लग्नांमध्ये
In reply to हेच लिहायला आले होते ;) अळूची by Bhakti
😜
अवांतर: पालकाच्या (उत्पादनाची सुलभता, वर्षभर एकसारखा पुरवठा, बाजारातील सतत मागणी, कदाचित ग्राहकांची बदलत असलेली मानसिकता इ. कारणे) सतत उपलब्धतेमुळे कदाचित - इतर अनेक भाज्या मागे पडत चालल्या आहेत का? शेवगा, राजगिरा, चमकोरा, शेपू, करडी, काटेमाट, तांदुळगा, तरवंटा, बारीक घोळ, मोठा घोळ, हादग्याची फुले या पालेभाज्या, वीस वर्षांपूर्वी ज्या प्रमाणात बाजारात विकायला यायच्या / इतरत्र उपलब्ध असायच्या, त्या प्रमाणात आज येतात का? पस्तिशीपर्यंतचे ग्राहक त्या भाज्या (पालक, चुका, अंबाडीच्या तुलनेत) त्या प्रमाणात विकत घेतात का?मराठवाड्यात तर लग्नातही आणि
In reply to मराठवाड्यातील लग्नांमध्ये by वामन देशमुख
भाजी की पिठलं?
In reply to मराठवाड्यात तर लग्नातही आणि by Bhakti
किती बेसन घालेपर्यंत ती भाजी
In reply to भाजी की पिठलं? by वामन देशमुख
हल्ली बेसनला पर्याय म्हणून ओट्स पावडर वापरली जाते.
In reply to किती बेसन घालेपर्यंत ती भाजी by Bhakti
बेसनाऐवजी ओट्स पावडर? काय हो
In reply to किती बेसन घालेपर्यंत ती भाजी by Bhakti
एकदम सहमत.....
In reply to मराठवाड्यातील लग्नांमध्ये by वामन देशमुख
लहानपणीच्या भाज्याही नाही आणी बनवणारे सुद्धा.
In reply to एकदम सहमत..... by कर्नलतपस्वी
चमकोरा +१ धन्यवाद वा दे.
In reply to अळूच्या वड्या (आणि पातळ भाजी by वामन देशमुख
अरबी
+१ आता अळूचा कंद मिळवणं आलं :
In reply to अरबी by कर्नलतपस्वी
कहर!!
आम्ही उकडलेले अळूच्या पानांचे रोल्स पण आवडीने खातो.
In reply to कहर!! by तुषार काळभोर
थोडीफार भांडी घासून देता
In reply to आम्ही उकडलेले अळूच्या पानांचे रोल्स पण आवडीने खातो. by धर्मराजमुटके
झक्कास रेसिपी
वाह! कोकणचा देखील अळूचा
In reply to झक्कास रेसिपी by सतिश गावडे
शेणकीच्या बाजूला किंवा गवंडात उगवणार्या "तेरीशी" प्रचंड साम्य आ
In reply to झक्कास रेसिपी by सतिश गावडे
हायला !
In reply to झक्कास रेसिपी by सतिश गावडे
जेम्स वांड धन्यवाद
In reply to हायला ! by जेम्स वांड
वरिल फळ
In reply to हायला ! by जेम्स वांड
हेच अळूचे फळ...
In reply to वरिल फळ by प्रसाद_१९८२
हे करांदा/करांदे आहे
In reply to हायला ! by जेम्स वांड
माझा उडतोय गोंधळ
In reply to हे करांदा/करांदे आहे by सतिश गावडे
प्रतिसाद अनाथ झाल्यामुळे
In reply to माझा उडतोय गोंधळ by जेम्स वांड
अळूच्या देठांच्या कोशींबिरी बद्दल धन्यवाद
वाह
बाकी, फोटो आवडले हे सांगायचं
मैत्र जिवांचेमैत्र जेवणाचे...पालेभाज्या
नुकतीच "टाकळयाची भाजी" माहित पडली आहे. एकदा चव घेऊन बघावी लागेल.
In reply to पालेभाज्या by धर्मराजमुटके
मायबोलीवर वाचताना "भारंगी"
In reply to पालेभाज्या by धर्मराजमुटके
मस्तच झाल्यात की अळू वड्या
सर्वांनी नक्की पाकृ बनवा !_/\
भक्तीताई
कर्नल तपस्वी सर आणि मुटके साहेब
अळू /चमकुरा चा एक चवदार
अळूवडी हा अत्यंत आवडता पदार्थ!
देठी
योगायोग...
In reply to देठी by अनन्त्_यात्री
वर टाकळा कुर्डू आणि तत्सम
गणपा यांची नारळाच्या दुधातील
अळू वड्या आणि कोशिंबीर मस्तच!
५० वा...
मेन्यू आवडला, भक्ती!
मागच्याच आठवड्यात चापल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022सर्वांचे धन्यवाद! सुंदर धागा