Skip to main content

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ५)

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 21/07/2022 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने अभिनंदन! या निवडणुकीत महाराष्ट्रातील २८७ आमदारांपैकी २७९ मते वैध ठरून त्यातील १८१ मते मुर्मूंना मिळाली. ९८ मते यशवंत सिन्हांना मिळाली. मुर्मूंना महाराष्ट्रातून किमान २०० आमदारांची मते मिळणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते. प्रत्यक्षात १९ मते कमी पडली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे एकत्रित ९६ मते आहेत. परंतु यशवंत सिन्हांना ही ९६ अधिक सप, एम आय एम वगैरे मिळून १०१ मते अपेक्षित होती. परंतु त्यांची फक्त ३ मते फुटलेली दिसतात. पूर्वीच्या सेनेच्या सर्व ५५ आमदारांनी, भाजपच्या १०४ आमदारांनी व अपक्ष आणि ३ फुटीर आमदार धरून अजून २२ मते मुर्मूंना मिळाली. एकंदरीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसची पडझड जवळपास थांबलेली दिसते. सेनेला कधी राष्ट्रवादी-कॉंग्रेसमागे तर कधी भाजप-शिंदे गटामागे फरपटत जावे लागणार आहे असं दिसतंय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या सेनेला भाजप उमेदवारालाच मत द्यावे लागण्याची शक्यता आहे कारण प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा ख्रिश्चन आहेत व त्यांना मत देणे म्हणजे आपलं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व, आम्हीच अस्सल हिंदुत्ववादी वगैरे बडबडीला छेद देणे होईल. अर्थात १९६६ मध्ये पांघरलेली मराठी बाण्याची झूल १९९० मध्ये अचानक कचरापेटीत फेकून हिंदुत्वाचे सोंग आणलेल्या सेनेला आणि २०१९ मध्ये हिंदुत्वाचा मुखवटा उतरवून निधर्मी बुरखा पांघरलेल्या सेनेला मार्गारेट अल्वा ख्रिश्चन असल्याचे वावडे नसावे. तसेही पूर्वी बाळ ठाकरेंनी प्रीतिश नंदी नामक उत्तर भारतीय ख्रिश्चनाला महाराष्ट्रातून सेनेच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार केले होतेच. बघूया काय होतंय ते.

वाचने 16893
प्रतिक्रिया 136

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

राणेपुत्राची केसरकरांवर टिका, नंतर चंपांचं वक्तव्य हे फडणवीस पुरस्कृतच आहे. शिंदे मामू बनल्याचं त्यांना आजिबात सहण झालं नाहीये मी मामू बननार नसेल तर कशाला हवी सत्ता? ह्या विचारातून काही दिवसांतचते शिंदेंना घरचा ना घाटचा करून ठेवतील नी परत विरोधात जाऊन बसतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बोलणे झाले, तुझी शैली म्हणजे बाबा एकदम तू त्यांच्यासोबत मिटींगला होता अन आलेलं वैफल्य अन विषाद फडणवीसांनी तुला बोलून दाखवल्यागत असते, त्याला हरकत नाही, फक्त तुला असे का वाटते त्याची कारणमीमांसा तू खरोखर चर्चेत उत्सुक असल्यास देणे तुझे काम आहे. प्रतिवाद त्याच मुद्द्याचा होणार, नाहीतर इथं कोणाला अंतर्गत बाबी माहिती नाहीत. तसा आवही कोणी आणू नये. म्हणायला तर इथंच यशस्वी मिपाकर तुला एकनाथ शिंदेंना फडणवीसांनी सीएम केल्याचे तुला सहन झाले नाही असेही म्हणतील. लॉल, तू उलट ते सिद्ध करतोयस, कळलं अन पटलं तर बघा नाहीतर काय सर्वज्ञता तुला आहेच नाही का ! &#129315 &#129315 &#129315

केंद्र सरकारने पुन्हा( मागील ५+१ वर्षाचा करार संपायला काही महिने बाकी आहे) तुर आणि उडीद आयातीचा ५ वर्षाचा करार केला. एकीकडे आत्मनिर्भर भारताच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना डाळ उत्पादनास प्रोत्साहन देण्याऐवजी परदेशातील स्वस्त डाळी आयात करून डाळींचे भाव पाडायचे. जरा कुठे शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळायची वेळ येते तेव्हाच भाव पाडले जातात आणि गेली पाच वर्ष हेच चालू आहे. ह्याचा अर्थ आपल्या चुकीच्या धोरणामुळे पुढील पाच वर्ष देशातील डाळींचे उत्पन्न वाढणार नाही ह्याची सरकारला खात्री आहे.

स्मृती ईराणी ह्यांच्या मूलीचा गोव्यात भ्रष्टाचार. तपास अधिकार्याची मोदी सरकारने केली तडकाफडकी बदली. https://solapurvarta.in/congress-made-serious-allegations-of-corruption…

भाजपच्या ऊपाध्यक्षा द्वारे चालवल्या जाणारा कूंटणखान्यातून सहा बालकांची सूटका. https://www.livemint.com/news/india/6-children-rescued-from-brothel-in-… भाजप देशाला बर्बाद करूनच सोडनार. काय बोलावं ते सुचेना

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Rimpu Bagan, a farmhouse owned by militant-turned-politician Marak
बाप रे, म्हणजे डोग्रा रेजिमेंटचे हत्याकांड, आसाम रायफल्सच्या कॅम्पसमध्ये हल्ले वगैरे करणाऱ्या लोकांच्यातील एकाला पवित्र करुन घेतले ? ते ही चक्क राज्य उपाध्यक्ष म्हणून ? ह्यांच्यापुढे तर एकनाथ शिंदे, किंवा अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करणेही काहीच वाटत नाही. खरंच काय बोलावे ते सुचेना

In reply to by जेम्स वांड

बाप रे, म्हणजे डोग्रा रेजिमेंटचे हत्याकांड, आसाम रायफल्सच्या कॅम्पसमध्ये हल्ले वगैरे करणाऱ्या लोकांच्यातील एकाला पवित्र करुन घेतले ? सत्ता मिळनार असेल तर ऊद्या ते कसाबलाही देशभक्त सिध्द करू शकतात, तो जिवंत असता तर त्यालाही पवित्र करून घेतलं असतं. भाजपेयींसाठी सत्ता म्हणज सर्व काही.

इराणी पुत्री ने मेलेल्या माणसाच्या नावावर बार चालवला ... लई तापणार आता हे.. पण शेठ चा राज्य असल्याने सगळं खपून जाणार

In reply to by कपिलमुनी

इराणी पुत्री ने मेलेल्या माणसाच्या नावावर बार चालवला ... सहमत. स्मृती ईराणीने ते राष्ट्रहीतासाठी केलं, पाकिस्तानचा कट ऊधळले वगैरे आय टी सेलच्या फोरवर्ड्स काही दिवसांतंच येतील. लई तापणार आता हे.. पण शेठ चा राज्य असल्याने सगळं खपून जाणार शेठ ने आधीच तपास अधिकार्यांची तडकाफडकी बदली केलीय.

https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/cities/chandigarh-n… In a new twist, the lawyer of arrested accused Ikkar, the helper of the truck which ran over the Tauru DSP Surender Singh on July 19, has claimed his client is mentally ill. Ikkar was arrested on the day of the incident. Bhuru alias Taufiq, and Asru alias Assaruddin, both residents of Pachgaon village, and Lambu alias Isuf of Gandwa village in Rajasthan’s Alwar district were arrested on Saturday, officials said.

In reply to by मुक्त विहारि

काका, ऊतारेच्या ऊतारे कोपी पेस्ट करण्यापेक्षा दोन चार शब्द स्वत:च्या मनाचे लिहीत चला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शिन्देसाहेब हे व्यंगचित्रकाराला चित्र काढायला आणि व्यंग करायला एकदम सोपा विशय असणार आहेत. केसांच्या काळ्या गोलात एक चेहर्‍याचा छोटा गोल, त्यात चष्मा आणि पिटुकले नाक बसवले की झाले.

In reply to by सुरिया

सहमत. शिवाय विषय ही भरपूर मिळताहेत. जे २००४ ते २०१४ मध्ये दिल्लीवारी करनार्या महाराष्ट्र नेत्यांचे होते तेच टाॅपीक जसेच्या तसे ऊचलले तरी चालतंय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

व्यंगचित्र दिसत नै ये. प्रॉपर लिंक प्लीज. किंवा इथे डकवता येत असेल तर डकवावे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ईथे डकवता येत नाहीये. मोबाईल फोन मध्ये ऊघडून पहा. तरा थोडक्यात सांगतो. प्यून मुख्यमंत्री शिंदेंना विचारतो, ”चहा घेणार की काॅफी?“ शिंदे - “दिल्लीला फोन करू विचारतो.” :)

https://ibb.co/kH0SwYC लै भारी. पण एकाच किटलीतून चहा आणि कॉफी असे दोन पर्याय कसे देता येतील ? मग बारकाईने चित्र पाहिले असता त्यातील मर्म कळाले. डाव्या हातातील ३ ग्लास म्हणजे भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. एका ग्लासात कॉफी पावडर, दुसर्‍या ग्लासात चहा पावडर आणि तिसर्‍या ग्लासात केवळ रिकामा असणार. आणि किटलीत वाघीणीचे दुध असणार. कोणतेही काँबीनेशन घ्या. एखादे तरी पेय नक्की बनणार. अवांतर : किटली आणि कप घेऊन येणारी व्यक्ती कोण असेल यावर विचार करतोय. अति अवांंतर : व्यंगचित्र आणि त्यावरील विवेचन खिलाडूपणाने स्वीकारले जाईल अशी अपेक्षा.

In reply to by धर्मराजमुटके

पण धार्मिक आधारित नकोत .... (निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली ती पण एका व्यंगचित्रा मुळेच, हा एक आठवलेला किस्सा .....)

In reply to by मुक्त विहारि

त्या व्यंगचित्रात आक्षेपार्ह भाषा वापरली होती म्हणे.

सोलापूर-विजयपूर बायपासवरून अजून म्हणावी तेवढी वाहतूक सुरू झालेली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या बायपासचे लोकार्पण करून तीन महिनेही झाले नाहीत. तोवर बायपासला पुलाजवळील रस्त्याला भेगा पडल्या आहेत. https://www.esakal.com/maharashtra/cracks-the-900-crore-solapur-vijaypu… भाजप नेते आणखी किती भ्रष्टाचार करनार?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे सेना यांनी हा प्रश्न लावून धरून भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे.

In reply to by रात्रीचे चांदणे

मग त्यांच्या मागे ईडी लावून त्रास देण्यात येईल. देशात अघोषीत हुकूमशाही सुरू आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ईडी लावून त्रास देण्यात येईल जर आपले नाणे खंणखणीत असेल तर ईडी लावून काही फरक पदणार आहे का ? की आपली करतुत बाहेर येईल म्हणुन आतापासुनच रडारड? जा की कोर्टात? कुणी अडवले आहे? की तेव्हडी हिंम्मत नाही?

In reply to by सुक्या

जर आपले नाणे खंणखणीत असेल तर ईडी लावून काही फरक पदणार आहे का ? की आपली करतुत बाहेर येईल म्हणुन आतापासुनच रडारड? जा की कोर्टात? कुणी अडवले आहे? की तेव्हडी हिंम्मत नाही?
+१ मराठीत म्हण आहे ना की खाई त्याला खवखवे.

In reply to by सुक्या

आजच्या राजकारणात कुणीही स्वच्छ नाही हे सगळ्यांनाच माहीतीय. राजकारणात भरमसाठ पैसा ओतून पैसा कमावला जातो, ह्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही. गोपीनाथ मुंडे एका सभेत बोलले होते की ३० कोटा खर्चून खासदार झालो. त्यामुळे सावच्छ वगैरे नेता, कधीही पैसे न खाल्लेला नेता भिंग घेऊन शोधला तरी सापडनार नाही. भाजपचा विरोधकांवर ईडी सोडायचा हेतू प्रामाणाक आहे का? भाजपात आलेयावर ईडी चौकशा कश्या बंदं होतात? आता प्रताप सरनाईक, भावना गवळी हांना का बोलावलं जात नाहीये ईडी कार्यालयात? संजय राऊतांनाच का बोलावलं जातंय? सरकार पडल्या बरोबर रस्ते घोटाळ्यातून बच्चू कडूंना कशा क्लिनचीट मिळाली? मुंबई बॅंक घोटाळ्यातून फडणवांसांनी दरेकरांना कशी केलिनचीट दिली? सिंचन घोटाळ्याचे पुढे काय झाले? तेयामुळे नाणं खणखणीत वगैरे ह्या गोष्टी हवेतील लाथा आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भाजपात आलेयावर ईडी चौकशा कश्या बंदं होतात? आता प्रताप सरनाईक, भावना गवळी हांना का बोलावलं जात नाहीये ईडी कार्यालयात? संजय राऊतांनाच का बोलावलं जातंय? सरकार पडल्या बरोबर रस्ते घोटाळ्यातून बच्चू कडूंना कशा क्लिनचीट मिळाली? माहीती अधिकार नावाचा कायदा आहे. बघा वापरता येतो का? वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. इथे हे विचारुन फायदा नाही .. इथे कुणीही सरकारी अधिकारी नाहिये उत्तर द्यायला ..

In reply to by सुक्या

खी खी खा माहीती अधिकाराचा कायदा नी ईडीच्या चौकशा. तुम्ही चौथी नापास माणसाला पंतप्रधान बनवलं ह्यात मला काहीच आश्चर्य वाटत नाही.

In reply to by सुक्या

असले प्रश्न माहितीच्या अधिकारात उत्तरीत होतात का ? उगाच काहीही काय बोलताय ? दुसरं म्हणजे प्रत्येकच प्रश्नाला माहितीचा अधिकार वापरा, अमुक सरकारी अधिकारी नाही, तमुक मुलकी अधिकारी नाही तिसरा लष्करी अधिकारी नाही असेच म्हणायचे असेल तर मिपावर राजकीय चर्चा कराव्याच कश्याला ? सरळ माहितीचा अधिकार वापरा/ इथं कोणी सरकारी अधिकारी नाही म्हणून मिसळपावला टाळे ठोकण्याचा अर्ज करावा काय मग मिपा मालकांकडे ? भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार हे प्रवर्तन निदेशनलयाचा गैरवापर करत आहेत अशी बोंब विरोधक मारतायत, ह्याला उत्तर द्यायला माणूस सरकारी अधिकारी असण्याची गरज नाही किंवा हे माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत येत नाही. जाता जाता हिंट, क्लिंटन, चंद्रसूर्यकुमार असे ज्यांचे आयडी आहेत त्यांचे रिप्लाय वाचत चला जुने नवे सगळे, ते क्लिअरली सरकारी अधिकारी पण नाहीत अन माहिती अधिकार कार्यकर्ते पण नाहीत, पण किमान लिहितात बऱ्यापैकी.

In reply to by जेम्स वांड

वांड भाउ .. तुम्ही टेंन्शन घेउ नका. भाउबली सायेबांना तसलीच भाषा चालते. ते नाही का यच्चयावत मामु / पंतप्रधान / सुप्रीम कोर्ट / राष्ट्रपती / अमेरिकेचे राष्ट्रपती सगळ्यांना सल्ले देत असतात. तसेच आहे ते .. :-)

In reply to by सुक्या

मी तर पी. चिदंबरम ह्यांना ह्याबाबतीत मानतो. केंद्राने कितीही चौकश्या मागे लावल्या तरी सरकारच्या चुका दाखवण्यात कुठेही कमी पडत नाहीत. मुख्य म्हणजे त्यांचे मुद्दे खोडून काढायला एकही नेता बीजेपीकडे नसावा ह्याचे आश्चर्य वाटते.

In reply to by रात्रीचे चांदणे

लाचार विरोधीपक्ष... ED च्या भीतीपोटी लपुन बसलेत... जे काम करायला हवं ते पण करेनासे झालेत.

शिवसैनिंकांचा रोष पाहून सुहास कांदेंना काढावा लागला पळ. https://mmkmedia.in/शिंदेगटाच्या-आ-कांदेंना/amp/

काळजावर दगड ठेऊन शिंदेंना मुख्यंमंत्री केलं. - चं. पाटील https://berartimes.com/153380/ भाजपची सत्तेची हाव किती हे ह्या वाक्यातून कळते. शिंदेंना स्वाभिमान असेल तर ते पद सोडायला हवे त्यांनी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सत्तेत जे नसतात त्यांना ही हाव असतेच... सत्तेत जे असतात त्यांना अजून जास्त हवच असत. केजरवालांना हाव नसती तर पंजाब मध्ये कशाला लढले असते... सध्या हाव नसलेला एकमेव पक्ष काँग्रेस आहे असं एकूण त्यांच्या वागण्यावरून वाटतं.

In reply to by मुक्त विहारि

काका मागे तुम्हा पुणे पालिकेतील भ्रष्टाचाराची लिंक टाकली होती त्यावर राज्य सरतारला दोषी धरले होते, नंतर कुणीतरी मिपाकराने तुम्हाला आठवण करून दिली की पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे. नंतर तुम्हावत्या भ्रष्टाचारावर अवाक्षरही काढलं नाही, असं का?, पुढे त्या भ्रष्टांवर कारवाई झाली का? काही अपडेट?

स्मृती इराणींच्या मुलीच्या नावे नेमका काय वाद सुरु आहे? काँग्रेस नेत्यांना नोटिसा का पाठवल्या आहेत? https://www.loksatta.com/explained/explained-what-is-the-controversy-ov… स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांना नोटिसा बजावल्या आहेत. आपल्या मुलीवर निराधार आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी त्यांनी केली आहे. जर त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही आणि आरोप मागे घेतले नाहीत तर दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू करु असा इशारा त्यांनी दिला आहे.

In reply to by मुक्त विहारि

हेया पेक्षा मोदींना सांगून ईडी सोडू अशी धमकी दिली असती तरी चाललं असतं.

शपथविधी होऊन २५ दिवस उलटल्यानंतरसुद्धा मंत्रीमंडळ स्थापन झालेले नाही. मला जरा वेगळीच शंका येतीये. शिंदे गटाची बाजू काहीशी दुर्बळ आहे हे भाजप नेत्यांच्या लक्षात आले असावे. अश्या परिस्थितीत शिंदेनी राजीनामा देऊन राष्ट्रपती राजवट आणण्याआधी आरे, बुलेट ट्रेन सारखे स्थगित प्रकल्प पुनरूज्जीवित करावे, हव्या असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करून आपल्याला हव्या त्या ठिकाणी त्यांना आणावे, नको असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करावी, प्रशासनात हवी ती माणसे हव्या त्या जागी आणावी, काही विरोधकांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून द्यावे, विरोधी पक्षात जमेल तेवढी फूट पाडावी या दृष्टीने काम सुरू आहे असं दिसतंय. एकदा हे झालं की राष्ट्रपती राजवट आली तरी चालेल, हा हेतू असावा. म्हणजे थोडक्यात पोल पोझिशनवर येऊन मग राष्ट्रपती राजवट आणावी या दिशेने काम सुरू असावे.

In reply to by श्रीगुरुजी

तर भाजपला मोठा फटका पडेल. शिंदे कदाचित स्वगृही परत जातील आणि शिंदेंना भाजपने फसवले असे चित्र उभे केले जाईल. त्यात भाजप सगळी सहानूभुती गमावेल.

In reply to by अनन्त अवधुत

शिंदे परत सेनेत जाणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात येत असावी. अश्या परिस्थितीत शिंदे गटातील बहुसंख्यांना भाजपत सामावून घेतले जाईल. न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकार टिकू शकले नाही हे अधोरेखित केले जाईल.

तस्करांनी बिहारच्या अररिया जिल्ह्यातील सीमावर्ती शहर जोगबानी मार्गे सीमा ओलांडून भारतात जाण्याची योजना आखली होती. नेपाळमधील विराटनगर येथील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या अटक तस्करांच्या ताब्यात दोन किलो युरेनियम आणि इतर वस्तू सापडल्या. सीमा ओलांडून भारतात येण्याच्या उद्देशाने ते काठमांडूहून निघाले. जप्त करण्यात आलेल्या युरेनियमची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. मोरंगचे एसपी शांतीराज कोईराला यांनी नेपाळमधील युरेनियमच्या अटकेची आणि जप्तीची पुष्टी केली. ते म्हणाले की, तस्कर मुक्कामी असलेल्या विराटनगर येथील दोन हॉटेलमधून सुमारे दोन किलो वजनाचे युरेनियम आणि इतर संशयित साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याने पुष्टी केली की तस्कर साहित्यासह भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. हा फार मोठा धोका वाटतो. युरेनियमचा वापर अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जातो.
  1. युरेनियम मुळात यांच्या हाती आलेच कसे?
  2. याचा वापर करून डर्टी बॉम्ब तयार केले गेले तर?

झारखंडमध्ये लव्ह जिहादची एक नवीन घटना. मो. नईम मियाँ याने सुरुवातीला एका हिंदू महिलेला त्याचा धर्म लपवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तरुणीला संदीप सिंग असे नाव भासवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. नईम मियाँ याने महिलेच्या अल्पवयीन बहिणीवरही बलात्कार केला. इतकेच नाही तर आणि हे कृत्य रेकॉर्ड केले आणि आता तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​आहे. समाजाने या बाबतीत सावधान राहणे फार आवश्यक आहे.

फेसबूक वर वचलेली बातमी "मुंबईत २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ६०१ होती. २०१९ मध्ये यात घट होऊन ५ हजार ८४९ झाली. २०२० मध्ये यात आणखी घट होऊन ५ हजार ६३३ मृत्यू नोंदले गेले. जानेवारी ते जून २०२१ या सहा महिन्यांच्या काळातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. या काळात १७ हजार ८८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीमधून वरील बाब निदर्शनास आली असल्याचे वृत्तात नमूद केले आहे. " केसेस वाढण्याचे कारण काय असावे। माझ्या मते करोना उपचारसाठी वापरलेली चुकिची औषधि। ज्यांच्या हृदयगति वर परिणाम झाला।

In reply to by विवेकपटाईत

१. फेसबूक वर वचलेली बातमी - अर्धा उत्साह इथेच मावळतो २. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीमधून वरील बाब निदर्शनास आली असल्याचे वृत्तात नमूद केले आहे. - माहितीच्या अधिकारात ही माहिती कशी अन कुठून मागवता येईल ? ३. केसेस वाढण्याचे कारण काय असावे। माझ्या मते करोना उपचारसाठी वापरलेली चुकिची औषधि। ज्यांच्या हृदयगति वर परिणाम झाला। तुमच्या मताला आधार काय ? दोनचार वैयक्तिक एनेकडोट्स सोडून काही पियर रिव्युड स्टडीज असल्या तर विदा द्यावा ! मुळात तुम्ही सरकारी नोकर आहात ना ? मेडिकल सायन्सला हलक्यात घ्यायला त्याचं किती नॉलेज आहे तुमच्याकडे ? संपादक मंडळ, वरील प्रतिसादाच्या विरुद्ध माझी हरकत आहे, एकतर हे महाशय वैद्यकीय क्षेत्रातील नाहीत किंवा स्वतः वैद्य/ डॉक्टर इत्यादी पण काहीच नाहीत, तरीही दोनचार वैयक्तिक उदाहरणे पाहून खुशाल वैद्यकीय मते देत आहेत, हे वेजबाबदारच नाही तर कोणाच्या जीवावर बेतणारे पण ठरू शकते, तरीही कृपया इथे लक्ष द्यावे ही नम्र विनंती

एकनाथ शिंदे सुध्दा फडणवींसांप्रमाणे कुचकामी मुख्यमंत्री सिध्द होत आहेत, अनेक प्रशासकीय कामो रखडलीत.

मुलीला वर्गात रागवल्या म्हणून शिक्षिकेला निर्वस्त्र करुन मारहाण, 200 जणांचा जमाव आला शाळेवर चालून, 35 जणांविरोधात FIR https://www.tv9marathi.com/national/teacher-beaten-up-for-making-girl-a… पश्चिम बंगालमधील (W. Bangal)दक्षिण दिनाजपूर येथे हा प्रकार घडला आहे. ही मुलगी अल्पसंख्याक समाजातील होती, असे सांगण्यात येते आहे...... ---------

In reply to by मुक्त विहारि

ह्या प्रकरणातली मुलगी व शिक्षीकेला निवस्र करणारे २०० हे शांतीदूत समाजाचे होते. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवुन घ्यायला नकार दिला होता, पण हिंदू समाजाने रस्ता रोको सुरु केल्यावर नाईलाज झाला व तक्रार नोंदवुन घेतली.

In reply to by डँबिस००७

हे असंच चालू राहीलं तर पुढच्या निवडणुकात बंगालात भाजपाचा मुख्यमंत्री नक्की. बंगाली लोकांना थोडासा त्रास सहन करायला लागेल पण त्याला इलाज नाही. ध्रृविकरणात असं होतच असतं. आले नियतीच्या मना…..

In reply to by प्रसाद_१९८२

आजच्या मौखिक जत्रेत खालील वाक्य कहर म्हणजे भलतच TRP खेचणारे होते ब्वा " सगळ्यात मोठं टेन्शन होते की डास चावला, मुंगी चावली की खाजवायच कसं??" लयच भारी.. अशी ही खाजवा खाजगी

In reply to by यश राज

म्हणजे, स्वयंपाक हे शास्त्र असेल तर, तो पचवणे ही एक कला आहे. केर काढणे हे शास्त्र असेल तर, केरसुणी पकडणे, ही एक कला आहे ... इत्यादी ...

In reply to by प्रसाद_१९८२

@ संपादक मंडळ, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री ठाकरो साहेब व श्री राऊत साहेब ह्यांना प्रसाद १९८२ हा आयडी द्वेषातून विदूषक म्हणतोय ना खाली तशी लिंकही दिलीय. कृपया संबंधीत आयडीवर योग्य ता कारवाई करावी.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांविरोधात आरोपपत्र दाखल https://www.esakal.com/desh/farooq-abdullah-chargesheeted-in-money-laun… आरोप सिद्ध झाला तर, दोषींवर कारवाई व्हायलाच हवी....

राणे कुटुंबाला कोकणाबाहेर, विशेषतः सिंधुदुर्गच्या बाहेर व त्यातसुद्धा कुडाळ, कणकवली व मालवण हे २-३ तालुके सोडले तर कोठेही अस्तित्व नाही. एका अर्थाने राणे हा राज्यपातळीवर तर सोडाच, एका जिल्हा पातळीवरचा सुद्धा नेता नाही. राणे कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुंडगिरी, माज, ब्राह्मणविरोधी कारवाया, सत्तेसाठीची वखवख व आक्रमक स्वभाव भाजपला नक्कीच गोत्यात आणेल. कॉस्ट-बेनेफिट विश्लेषण केले तर राणेमुळे होणार्‍या फायद्याच्या तुलनेत होणारे तोटे प्रचंड आहेत.
वरील परिच्छेद हा गुरुजींच्याच एका जुन्या प्रतिसादातील आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुंडगिरी, माज, ब्राह्मणविरोधी कारवाया, सत्तेसाठीची वखवख व आक्रमक स्वभाव वरील सगळे गुण शुचिर्भूत होऊन आता फटकेबाजी झालेत म्हणायचं का गुरुजी ?? २-३ तालुके प्रभाव असणारा नेता अन कुटुंबिय असे आपणच म्हणाले होते असे ही दिसते आहे.... तेव्हा "राणे हा जिल्हा पातळी नेता ही नाही" आता "राणे फटकेबाजी करताहेत बस क्या ?" तुम्ही म्हणे विधानसभेत भाजपला मतदान करणार नाही घोषित केले आहेत ? अरे हो, खफवर लिहायचे राहिले होते आता तो नारायण पासून ते नारायणराव झालेले राणे जी

मोदींच्या कॅबिनेटमध्ये लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री आहेत न ?


विश्व प्रसिद्ध ब्लुंबर्ग ने येऊ घातलेल्या जागतीक आर्थिक मंदीत जगातील महत्वाच्या देशांची संभाव्य स्थितीवर आपला अहवाल सादर केलेला आहे. ब्लुंबर्गच्या अश्या अहवालाला जगात खुप महत्व दिल जात. ब्लुंबर्गच्या अहवाला प्रमाणे भारताला जागतीक आर्थिक मंदीची झळ बसण्याची शक्यता ०% आहे. भक्कम परकीय वित्तीय गंगाजळी व रीझर्व बँकेच्या कठोर व योग्य नियोजनामुळेच हे शक्य आहे अस ब्लुंबर्गच म्हणण आहे. https://youtu.be/9X_SSPFtPPA

In reply to by डँबिस००७

हायला .. मोदींनी ब्लुंबर्ग पण विकत घेतले ?