हेडर :
येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो .. काकांनो आणि काकुंनो, नानांनो (नानी नाहियेत आल्या आजुन ..आणि काही चान्स पण दिसत नाही.. त्यामुळे गाळतो ही जागा) तात्यांनो आणि उरलेल्या सर्व गबाळ्यांनो .. आज मी तुम्हाला ह्या कुटाकुटीतुन एक नविन विचार करायला लावणारा आणि कौल, जो न देखे रवी, संपादकिय, kala dalan याच्या पलीकडे गेलेला एक महान कुटाकुट लेख सांगणार आहे , तर तो तुम्ही शांत चित्ताने ( बाकीचं ब्राऊझिंग जरावेळ बंद करून ) वाचावा एवढीच इच्छा व्यक्त करून मी लेख लिहायला सुरूवात करतो .
त्या आधी एक सांगतो की डोक्यात हेलमेट घाला आणि कुलूप लावा त्या हेल्मेटला , जास्त विचार करायला लावल्याने मेंदू पळून जाऊ शकतो .
बॉडी:
बरेच दिवस मनामध्ये घोळत असलेला हा प्रश्न.(इतका घोळत होता इतका घोळत होता की मेंदूत लस्सी तयार झाली हो .. आणि साजूक तुपही निघालय मनभर ... त्यामुळेच की काय .. माझ्या डोक्याला हल्ली तेल लावायची गरज नाय पडत... डॉकंच तुपकट होतंय ...) याचं समाधानकारक उत्तर अजूनपर्यंत तरी मला मिळालेलं नाही. एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो. हा कुटाकुट खाणावळीच्या (मराठीत मेस) भाज्यांना कमी लेखण्यासाठी नाहीये. यावर निखळ संवाद होउ द्यावा. आणि ह्या संवादाचे प्रायोजक आहेत "परिकथेतील राजकुमार सायबर कॅफे "- अ चेन ऑफ सायबर कॅफेज अव्हेलेबल २४X७ . ह्यांची ब्रांच वेशीबाहेरच्या राक्षसाच्या गुहेबाहेरही आहे ) चला आपणही लेखात बाजारूपणाची संधी मिळाली तर घेऊ .. आणि बाकीच्यांचा बाजारू पणा काढायला मोकळे होऊ,,, पर्या ऍड्वरटाइजमेंटचे पैसे तयार ठेव बे ..
आज भर दुपारी पावट्याची सुगंधीत भाजी, रेशणिंगच्या तांदळाचा भात,इंडियन चक्का - कुजलेल्या लसणाचं बेसण, मोडाच्या मुगाची उसळ,छन्नी-हातोडीने किंवा हेक्सा ब्लेड ने कापू शकू अशा चपात्या आणि आंबलेल्या लिंबाचं तुरट लोणचं हा असला लंचबॉक्स आमच्या मेसवाल्याने आणून दिला. ते पाहून माझ्या तरी तळपायची पायतान मेसवाल्याच्या मस्तकात गेली.(पिवर कोल्हापुरी पायतान, त्यात आम्हाला तेच्च घालून क्रिकेट फुटबॉल खेळायची हौस.. मग स्पाईक्स म्हणून घोड्याची नाल बसवलेली हो... मग काय एक निबार बसली तसं २ सेंटीमिटर व्यासाचं टेंगूळ ) काय हे खाणं! काही अर्थ? पाश्चात्य खाद्य संस्कॄतीचं अनुकरण जरूर करावं पण त्याला blindly follow करणं हे चुक नाही का? उगाच "मॅकडॉणॉळ्ड/ ढॉमिणोज " ची स्टाईल मारायला जातो साला. भिकारड्याने कुठून काचेतून पिझ्झा पाहिला .. आणि त्या आकाराच्या चपात्या खाऊ घालायला लागला .. भाज्या कच्च्या ठेऊ लागला ... आता उडित मुग किंवा पावटा .. असले कच्चे प्रकार पोटात गेल्यावर काय होणार ? खूप इच्छा आहे की कार्ल्याची भाजी , उडदाची हिरविट काळी आमटी , घसा जाम करणारा सुक्का पावटा, सर्वांग सुंदर शेवगा , बेसन याच्या पलीकडे जाऊन मस्त चमचमीत पदार्थ देणारी मेस निघावी. ते जेवण गोडधोड पदार्थांसह , sweets and starters सह, त्यातल्या चविष्ट मुख्य भोजणासह मिळावे . खाणावळीचा उद्देश फक्त रेशणिंगचं आणि वाया गेलेल्या भाज्यांचं अंन्न बॅचलर पोरांच्या माथी मारावं हाच आहे का? कोणताही नवी रुचकर चव न देणारा डब्बा सूजाण बॅचलर्सने खावा का ?
तसचं Tyre shop चं.
पुन्हा एक बाजारू ऍड्वरटाईज (टारझन टायरवाले आण्णा : आमचेकडे सर्व प्रकारच्या टायरांचा बँड वाजवला जाईल , आतून बाहेरून पंक्चर काढले जाईल, तसेच स्टोव्ह आणि मोबाईल रिपेर करून दिला जाईल, कंप्यूटर्सचे सुट्टे भाग विकतो , मुंबै-पुणे-सातारा-शिर्डी-धूळे-जळगाव-नाशिक-जालना गाड्यांच्या बुकींसाठी भेटा, मुळव्याधीवर रामबाण औषध मिळेल)
पंक्चर काढणे जर साऊथ इंडियन्स ची अस्मिता असेल, स्पंदन असेल तर त्याचा खुला बाजार मांडणे योग्य आहे का? आपल्या नव्या कोर्या गाडीचे नविन टेक्नॉलॉजीचे रॅडियल अँड ट्यूबलेस टायर्स ह्या अण्णा लोकांना practice करण्यासाठी असते का ? आपल्याला गाडीए हाय परफॉर्मन्स ऑन हाय स्पीड द्यावा ह्यासाठी असते ? आणि हेच डब्बेवाले डबडे -महाडबडे त्यांना डब्बे विकतात. तिस - चाळीस रुपयांना. मग हेच आण्णा लोक असल्या डब्यातल्या आरबट चरबट भाज्या खाऊन प्रत्येक टायरवर पॅच मारण्यासाठी आपल्या कडून १०० रुपये घेतात. एक सुद्धा असा टायरवाला आण्णा नसावा जो तत्वासाठी एका पंक्चरचे चार पंक्चर्स काढणार नाही? आपणचं यांना हायवे च्या कडेला बसवतो ना(पेपरवर नव्हे) ? धावा करतो आडचणीच्या वेळी समोर दिसावा म्हणून गाडीची (टायरची) वाट लागू नये म्हणून. का? त्यांच्यावर बंधन घालणारे आपण कोण? पण किबोर्ड ला तर आहे ना माझ्या संगणाकाच्या ? (स्वगत : कितीवेळ झाले जास्तित जास्त बावळट पणे लिहीण्याचा खटाटोप करतोय .. पण साला काय यश येत नाय .. तो ओरिजिनल लेख वाचला की तसं का लिवता येत नाय बॉ .. म्हनून ण्यूणगंड( मराठीत काँप्लेक्स) यायला लागलाय ) यांना पैसा कमी पडतो म्हणून हे बिनपंक्चर टायराला ४ पॅच एक्स्ट्रा लावायची काम करतात. यांना असं टायरांची वाट लावायला आणि आपल्याला लुबाडायला इथे आणलयं का? हे असे पैसे वाटल्यावर financial equality राहील? (ह्या वाक्यासाठी टाळ्या)
80% of the wasted and bad quality food is eaten by 20% of the people , that is bachelors . हे equation बदलणं यामुळे थोडं तरी शक्य होइल का?
फुटर :
एवढा वेळ माझी ही बेसंबंध बडबड अत्यंत शांत चित्ताने (मनात भलेही बुकलून काढण्याचे विचार असोत) ऐकून घेतल्याने मी सर्वांचा ऋणी आहे .. एवढे लिहून मी माझी कुटाकुट संपवतो, जय हिंद , जय म्हाराष्ट्र !!!
-टारोमारो
जाता जाता (हे उगाच मास्तर कडून उधार) : जर आयपीएल-पप्पू कांट डांस साला ह्यांत संबंध असू शकतो तर मेसवाला-टायरवाला मधे का नाही ?
वाचने
9908
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
नहींऽऽऽऽऽ
ठ्ठोऽऽऽ!!!!!:)
हाहाहा
(विषय दिलेला नाही)
In reply to हाहाहा by स्वप्निल..
ज ब रा
खरच
हा हा हा
खोखो आणि धोधो
टारोमारो
मी
+१,
In reply to मी by भडकमकर मास्तर
टारोमारो, ल
फोटो
In reply to टारोमारो, ल by प्राची
(विषय दिलेला नाही)
In reply to फोटो by नितिन थत्ते
ठ्ठ्यॉ!!!
In reply to फोटो by नितिन थत्ते
झकास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मेटाकूट
वा एका गंभीर विषयाला वाचा......
हुजुर
हे काय हे...!!
टार्या!!!
बेक्कार
जबराट....
छान!!
टाळ्या!
वाकडा
=))
टारझण
गुड
भारी..
खास टारु
अरे टारु
=)) =)) =)) =)) =))
भिकारड्या
टारोमारो
भन्नाट
इतकं!!
टारोमारो...
फो फो फोडलयस रे टार्या!!
(विषय दिलेला नाही)
धन्य आहेस!
हाण
बरं झालं
सर्व
भारी