कोकण रेल्वे खरोखरच महाराष्ट्रातील कोकणासाठी आहे का?
ही रेल्वे म्हणजे रोहा ते मंगळूरू भाग. रोह्याअगोदर आणि मंगळुरूपुढे रेल्वे होतीच. मग घाट टाळून सह्याद्रीच्या पोटातून बोगदे खणून रेल्वे सुरू झाली. ताशी १५०किमी वेगानेही गाडी जाऊ शकणारे एकेरी मार्ग झाले. याचे श्रेय मधू दंडवते,श्रीधरन आणि प्रभूंना दिले गेले. जपानी तंत्रज्ञान विकत घेतल्याने श्रेयाची भानगड नाही.
पण आता २०२२ जानेवारी नंतर काय झाले ते पाहा.
महाराष्ट्रात फक्त कोकणात जाणाऱ्या गाड्या तीनच.
१)पहिली जनता गाडी 10105 हिला 'दिवा-सावंतवाडी passenger' मधून 'सिंधुदूर्ग express' केली. पेण स्टेशन गाळले! पण सावंतवाडी पोहोचण्याच्या वेळापत्रकात काहीही बदल नाही. सोळापैकी पूर्वी दोन डबे आरक्षित होते ते सर्व आरक्षित केले. तिकिटे दुप्पट झाली.
२)दादर -रत्नागिरी passenger ही passengerच ठेवली पण दादरऐवजी दिवा येथून सोडली. म्हणजे या दोन्ही गाड्यांसाठी दक्षिण आणि पश्चिम मुंबई उपनगरांतील प्रवाशांना लोकल ट्रेनने दिव्याला आले पाहिजे.
३)दादर - सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस 11003. यात काही बदल नाही.
४) सकाळी सहाच्या दरम्यान सुटणाऱ्या
जनशताब्दी एक्सप्रेस 12051
तेजस एक्सप्रेस 22119
डबलडेकर कुर्ला मडगाव 11085 या गोव्याच्या गाड्या आहेत.
५)इतर सर्व गाड्या कोकणातून पुढे कर्नाटक, केरळ जाणाऱ्या आहेत. फक्त कोकणच्या नाहीत. कोकण हा शब्द फक्त महाराष्ट्रात बोलतात- गोवा,कर्नाटक, केरळात नाही.
६) इथे जसे घाट नाहीत तसे गुजरातकडेही नाहीत. मग तिथे किती passenger गाड्या धावतात पाहा.
मग असा प्रश्न येतो की रेल्वे मंडळात कुणी मराठी अधिकारी उरला नाही / कुणी नेता आता लक्ष घालत नाही?
वर्गीकरण
वाचने
6220
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
कोकण रेल्वे
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला
बरोबर
In reply to दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला by कंजूस
काही भिजत पडलेली घोंगडी
मा. नारायण राणे, जे सद्या
जालीम उपाय आहे ....
मुंबईकरांना रेल्वेबद्दल जितकी आस्था आहे, तितकी ईतरत्र नसावी
हा एक विशेष प्रश्न आहे.
In reply to मुंबईकरांना रेल्वेबद्दल जितकी आस्था आहे, तितकी ईतरत्र नसावी by राजेंद्र मेहेंदळे
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात
In reply to हा एक विशेष प्रश्न आहे. by कंजूस
इनमिनतीन passenger गाड्या
In reply to एक महत्त्वाची गोष्ट लक्षात by सुबोध खरे
गरीब रथ गाडी
देशांतील बहुतेक रेलवे मार्ग
म्हणजे आहे त्या सेवा
In reply to देशांतील बहुतेक रेलवे मार्ग by साहना
कोव्हीड चा फायदा घेऊन
In reply to म्हणजे आहे त्या सेवा by कंजूस
होय.
In reply to कोव्हीड चा फायदा घेऊन by सुबोध खरे
Union Railways Minister
In reply to होय. by कंजूस
चिपळूण - लोकल ट्रेन धावली.