Skip to main content

फिनिक्ससाठी मराठी शब्द सुचवता येईल?

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 29/04/2009 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
फिनिक्स हा आपल्याच राखेतून जन्माला येणारा पक्षी आहे, असं ऐकलं आहे. मला फिनिक्स या शब्दासाठी मराठी प्रतिशब्द हवा आहे. मला सुचलेले काही शब्द इथे देतेय, ते योग्य आहेत का, हेही सुचवावं. मला सुचलेले शब्द :- अग्निपाखी, अंगारपक्षी, भस्मजन्मा. आणखी नव्या शब्दांचं स्वागत आहे.

वाचने 15799
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

ऍश्+वर+या :) याहून चांगला सुचला की सांगतो.

In reply to by जृंभणश्वान

च्या मारी यॉनिंग डॉग.... लय भारी पी जे !

राखखग

अग्निपंखच चांगलं वाटतं. किंवा रक्षाविहग,..रक्षापक्षी... ऍश्-वर-या.. हे ही छान आहे. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मृत्युज कसे वाटते? मृत्युतून न्माला येणारा मृत्युज ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

हे म्हणजे हल्ली विकलं जाणारं सॉफ्टड्रिंक... निंबूज ... निंबू पासून निर्माण झालेला =))

भस्मज अवांतरः फिनिक्सच म्हणायला काय हरकत आहे? खराटा

In reply to by नितिन थत्ते

फिनिक्स म्हणायला काय हरकत आहे? तसंही ते विशेष नाम आहे. काहीच हरकत नाही खरंतर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by नितिन थत्ते

मलाही भस्मज हेच नाव आवडले.... पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by नितिन थत्ते

सहमत प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आख्यायिकेनुसार हा पक्षी ज्वाळांमध्ये झेप घेऊन युवा बनुन झेप घेत असे- एक प्रकारचा अवतारच हा. मराठी नाव हवेच असेल तर ह्या पक्षाच्या ह्या पुनर्जन्म घेण्याच्या विषेश गुणावरुन त्याचे नांव असणे योग्य वाटेल. जसे युवावतारी, किंवा अवतारी पक्षी.

विश्वनाथ नाव द्या. मला एक हिंदी सिनेमा आठवतो आहे या नावाचा. त्यात शत्रुघन सिन्हा "विश्वनाथ" या नावाच्या वकिलाचा अभिनय करतो आणी त्यातच एक डायलॉग आहे. जली को आग कहते है, बुझी को राख कहते है. और राख से जो बारुद उभरता है उसे विश्वनाथ कहते है. =)) =)) =)) =)) =)) =)) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

=D> =D> =D> अवांतर - फिनिक्सच म्हणावं (असं मला तरी वाटतं -- उगाच ओढून ताणून मराठी शब्दात कशाला बसवायच ?) 'टाय'ला टायच म्हणावं -- उगाच 'कंठ लंगोट' कशाला? :)

In reply to by संदीप चित्रे

हा मध्येच कंठलंगोट कसा आला तो फिनिक्स काय कंठलंगोट घालतोय का ?

राखुंड्या!!! :) बिपिन कार्यकर्ते

सहज बोलता बोलता बन्धुराजांनी आव्हान केलं, "शब्द जमवण्याचा तुझा छंद आहे, तर फिनिक्सला मराठी प्रतिशब्द शोध". त्या निमित्ताने ही चर्चा! [चुकुन्माकुन कधीकाळी काव्यासंग्रह वगैरे काढला, तर त्यासाठी नावं ठेवणं सुरू होतं.] माझ्या कविता या अक्षरशः राखेतून पुन्हा उमललेल्या असल्याने फिनिक्स सुचला. अग्निपंख हे डॉ. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचं मराठी भाषांतर असल्याने ते थोडं बाजूला राहिलं. भस्मज किंवा मृत्युज हे नाव छानच आहे. बाकीची विनोदी नावंही मजेदार आहेत. अवांतर :- या पक्ष्याची खरी आख्यायिका नक्की काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

मृत्युंजय ?? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

फणिश म्हटला तर. पटत का. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !