Skip to main content

मी : जाणता राजा

लेखक चौथा कोनाडा यांनी मंगळवार, 19/04/2022 या दिवशी प्रकाशित केले.
नादखुळा..!! ७१ हजारांच्या स्कूटीसाठी विकत घेतला १५.४ लाखांचा VIP नंबर, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण Vodafone युजर्सचा नंबर बंद केला, आता भरावा लागणार ५० हजारांचा दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण. जाणून घ्या कोण देत आहे ग्राहकांना सुपरफास्ट ४जी इंटरनेट? Airtel, Jio की Vi? वृषभ राशीमध्ये बुध विराजमान, जाणून घ्या कोणत्या राशीसाठी शुभ ठरेल हे मार्गक्रमण साबण कोणत्याही रंगाचा असो पण, त्याचा फेस फक्त पांढराच येतो? जाणून घ्या वरुथिनी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या स्वप्नील जोशी-शिल्पा तुळसकरने ‘तू तेव्हा तशी’पूर्वीही केलंय एकत्र काम, साकारलीय चक्क मायलेकाची भूमिका, जाणून घ्या कधी असे "जाणून घ्या" वाले १०- मथळे दररोज वाचले की मी "जाणता राजा" होईन की काय असं वाटायला लागतं !

वाचने 13075
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

अगदी मनातलं बोललात बुवा. पंखा होईन अशाने मी आपला!

अजून जास्त जाणते व्हायचे असेल तर मटा..पत्र नव्हे .त्र वाचा. तुमचे मराठी पण एकदम चांगले होईल. खाली काही निवडक शीर्षके देत आहे. actresses Beauty Tips : माधुरीपासून ऐश्वर्यापर्यंत व मलायकापासून कियारापर्यंत सर्व अभिनेत्रींची ब्युटी सीक्रेट्स झाली उघड, सकाळी सकाळी करतात..! Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीर कपूरच्या लग्नात होती एक आगळीवेगळी खासियत, जी तुम्हीही केली का नोटिस? केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय; गर्मीतही राहतील सिल्की आणि शायनी केस Vastu Tips About Tijori : तिजोरीत या गोष्टी ठेवणे असते शुभ, होते सुख समृद्धी आणि धनवृद्धी

हा हा हा इतकेही तपशिलात लिहीलेले नसते त्या क्लिकबेट हेडलायनीत. ...पर्सची किंमत ऐकून थक्क व्हाल. (आत वीस वेळा काहीतरी क्षुल्लक तपशील रिपिट करुन करुन शेवटी जागतिक रहस्य उलगडावे तशी पर्सची किंमत. इतक्या वातावरणनिर्मितीनंतर ती किंमत तशी किरकोळच निघते. ...उष्ट्या पावासाठी मोजले इतके रुपये..(थेट इंग्रजी टू मराठी वाट्टेल तश्या भाषांतराच्या चिंध्या करुन परदेशातली बातमी) ...अभिनेत्री म्हणाली "माझ्या बेडमधे तो.." (.. अधिक तपशील पाहू जाता काहीतरी फुस्स प्रसंग) जेम्स लेन म्हणाला "पुरंदरेंनी मला.." (वास्तविक त्यांनी काहीही संदर्भ पुरवले नाहीत असं असतं) एकूण काय तर बाहेर गळ टाकलेला आणि आत अत्यंत वेगळे किंवा असंबद्ध किंवा फालतू काहीतरी असते.

In reply to by गवि

बेन कबुतर .....
बेन पिजन नावाचा व्यक्ती कोसळता कोसळता बेन कबूतर होत गेला ..

😂

ज्याम हसलो हे वाचून !

In reply to by चौथा कोनाडा

मराठी भाषा आणि वाक्यरचना यांचे तर मातृभगिन्यद्वैत केलेले असते ऑनलाइन आवृत्तींमधे. कागदावरील प्रत वाचणे पूर्वीच बंद केले आहे. तिथे अजून टिकून असेल अशी आशा.

In reply to by चौथा कोनाडा

मराठी भाषा आणि वाक्यरचना यांचे तर मातृभगिन्यद्वैत केलेले असते ऑनलाइन आवृत्तींमधे. कागदावरील प्रत वाचणे पूर्वीच बंद केले आहे. तिथे अजून टिकून असेल अशी आशा.

बागुल बुवा चा चुलत भाऊ गुगल बुवा. मोबाईल वर गुगल शोधंत्र उघडले की आसेच मथळे दिसतात.याच बरोबर ऑप्टिकल इलूजन, माकड शोधा,ससे मोजा, पहिल्यांदाच काय दिसले तुमचे व्यक्तीमत्व समजेल वगैरे.काही नाही येडा बनवतात.

अजून क्लिकबेटी गमती. आयफोन १२ घ्या अमेझॉन वर फक्त ३५०० ला. (पूर्ण बातमी वाचल्यावर कळते ३५०० हा महिन्याचा हप्ता आहे.) मारुतीची सगळ्यात जास्त अवरेज वाली कार फक्त १.५० लाखात. (ही सेकंड हॅण्ड कार्स विकणारे पोर्टल आहे) हिरो ची सगळ्यात जास्त खपणारी बाईक मिळवा फक्त १५ हजारात. (१५ हजार ही डाऊन पेमेंट रक्कम आहे.) ओप्पो चां १०८ मेगा पिक्सेल नवीन फोन फक्त २२ हजारात. ( त्यावर असलेल्या सगळ्या म्हणजे झाडून सगळ्या ऑफर ची बेरीज करून ती मूळ किमतीत वजा करतात. खरे पाहता त्या सगळ्या ऑफर्स एकाचवेळी कधीही ॲपलिकॅब्ल नसतात.)

काल परवा एक बातमी वाचली "अमक्या अमक्या अभिनेत्रीला सेट वर झाली गंभीर दुखापत" जरा खोलात जाउन वाचले तर अभिनेत्री चा अंगठा मुरगाळला होता व नखातुन रक्त आले होते. काय ती गंभीर दुखापत .. मटा यात फार वाहवत गेला आहे हे मात्र खरे ...

😀 बातमीदारीचा दर्जा खालावत चाललाय!

In reply to by टर्मीनेटर

त्यामुळे आता फक्त बातम्या वाचायच्या, अग्रलेख म्हणजे एक प्रकारची पक्षीय धोरणेच असतात .... समुद्रात बुडत असलेली Enron आणि संजय दत्त, यांच्या वरती लिहून आलेले पक्षीय अग्रलेख, नंतर जादूने बदलल्या गेले.... अग्रलेख वाचून, मते बनवणे, मी तरी कधीच सोडून दिले आहे .... गडया आपली, एक रूपयाची झुणकाभाकर गेली आणि जलेबी-फाफडा पोस्टरवर आले ....

पाहिलात का ह्या अभिनेत्रीचा 'हॉट' अंदाज या अभिनेत्रीचा नवरा करतोय ह्या अभिनेत्रीला... या अभिनेत्याची बायको इतकी सुंदर आहे, जाणून व्हाल थक्क

In reply to by पुंबा

जाणून व्हाल थक्क
हा "जाणून व्हाल थक्क" प्रकार भारी अस्सतो, बातमी उघडून वाचली की हसावं की रडावं ते कळत नाही !

In reply to by चौथा कोनाडा

बातमी उघडून वाचली की हसावं की रडावं ते कळत नाही !
दोन्हीपैकी काय करावं हेच कळत नाही म्हणजेच तुम्ही थक्क झालेले असता.

सगळ्या ऑनलाईन पेप्रात असल्याच फाल्तू हेडलाइन्स आणि बातम्या असतात. सगळे ऑनलाईन बातमीदार एकाच युनिव्हर्सिटीतून शि़कून आलेत की काय अशी शंका येते. कधी कधी मराठीचा असा चुथडा करतात , वाक्यरचना इतकी भयानक किंवा अर्थहीन असते की उगाचच बातमीवर टीचकी मारली असे वाटते. उदा. काल एका बातमीचा मथळा होता, लिना चंदावरकर यांनी किशोरकुमार यांना पहिल्यांदा दिला होता नकार.जाणुन घ्या कारण. मथळा वाचतानाच असे वाटते कि लिहावे आम्हाला नाही घ्यायचं कारण जाणून, झक मार तुझी तू :-) तर त्या बातमीत लिहिले होते, वडीलांनी तिचा त्रास सांगितला म्हणुन घर सोडायचा निर्णय घेतला आणि किशोर कुमारांना होकार कळविला . तिचा त्रास सांगितला म्हणजे काय? धन्य तो बातमीदार !! चौ को, तुम्ही जाणते राजे झाल्यावर तुमची पण एक ई आवृत्ती काढा. आणि हेडलाईन द्या, मिपावर घमासान, जाणुन घ्या. आणि आतमध्ये काहीतरी फुसका मजकूर टाका :-)

In reply to by बबन ताम्बे

तुम्ही जाणते राजे झाल्यावर तुमची पण एक ई आवृत्ती काढा. आणि हेडलाईन द्या, मिपावर घमासान, जाणुन घ्या. आणि आतमध्ये काहीतरी फुसका मजकूर टाका :-)

😜

भारी आयडिया .....

भन्नाट विनोद, भन्नाट आयडिया, भन्नाट गुपित, भन्नाट अजून काहीतरी... एकेकाळी, "भन्नाट रानवारा" हे गाणं ऐकायला आवडायचं पण असल्या इ आवृत्त्यांमुळे भन्नाट या शब्दाचाच आजकाल तिटकारा येतो.

मी आता मिपावरील प्रत्येक नवीन पोस्टच्या खाली कॉमेंट लिहिणार: "हा भन्नाट लेख वाचलात का? वाचकांच्या पडतायत उड्या..! जाणून घ्या.." आणि पुढे माझ्या जुन्याजुन्या पोस्टींचे दुवे डकवणार.


मार्कस मीही ते वाचलं अन उडालो हादरलो अगदी सहमत

हे काय कमी आहे ?
सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही करू नका हे काम, आयुष्य खूप अवघड होईल!
अरे बापरे ! काय खरं नाही आयुष्याचं .....

हे ग्रहण ३० एप्रिलच्या मध्यरात्री १२.१५ पासून सुरू होईल आणि पहाटे ०४.०८ पर्यंत राहील. सूर्यग्रहणाच्या वेळी, गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये कारण यावेळी बाहेर पडणारी हानिकारक किरणे त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. आणि हा लेख लोकसत्तेत आला आहे. अरे कुठे नेऊन ठेवला आहे आपला शा फु आ चा महाराष्ट्र

आजची कचरा टाईम्समधील बातमी - मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज, भारताचा मॅचविनर गोलंदाज नवव्या सामन्यासाठी मैदानात उतरणार बातमीत नाव आहे धवल कुलकर्णी या गोलंदाचाचे. हा अतिसामान्य गोलंदाज भारतासाठी फक्त १२ एकदिवसीय व २ ट-२० सामने खेळला व तो एकाही सामन्यात मॅन ऑफ द मॅच नव्हता. १२ एकदिवसीय सामन्यात त्याने जेमतेम १४ फलंदाज बाद केलेत. भारतासाठी तो शेवटचा सामना २०१६ मध्ये खेळला. ज्याला संघात फारच क्वचित स्थान मिळाले व मिळालेल्या सामन्यात ज्याची कामगिरी सर्वसाधारण आहे तो भारताचा मॅचविनर कधी झाला? https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/good-news-for-m…

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजच्या कामांच्या प्रगतीसाठी JIRA हे सॉफ्टवेअर अगदीच ओळखीचे असेल. ट्विटरवर एक धागा JIRA clickbait titles बद्दल: https://twitter.com/amdev/status/1499374242755919878 एन्जॉय :)

https://www.loksatta.com/auto/second-hand-maruti-alto-in-70-thousand-kn… २००८ मॉडेल : ७० हजार २००९ मॉडेल : ८५ हजार .. आम्ही २०२१ - २०२२ चे मॉडेल बघत होतो .. फुगा फुटला ...

परवा एका संकेतस्थळावर "अमक्या तमक्या नटीला बेडरूममध्ये 'हे' करायला आवडते... असा हिट अँड हॉट मथळा होता. मी अतीव उत्कंठेने प्रवेश केला व 'जाणून घेतले'. तिथे '..वाचन करायला आवडते' असे लिहिले होते.