Skip to main content

[ठेव दरवाजा खुला...]

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 29/04/2009 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा भूषण कटककर यांची रचना ठेव दरवाजा खुला... पाडली आहे गझल, जी समजणे अवघड तुला ठेवली मुद्दाम आहे मी अलामत ही 'उ' ला मी कसा वाईट ठरलो, सांगतो आता तुम्हा (गोपिनाथाच्या बरोबर जायचो मी चौफुला) दूरदेशी आमचा हा घोळ होतो नेहमी समजतो बाईच आम्ही केशसंभारी मुला जाहले आयुष्य आहे, आमचे बुजगावणे बायको सांगेल तैसे या इथे आता डुला छापकाटा चालला आहे कधीचा हा तिचा एकदा लागेल नंबर याच आशेवर झुला हेच होते शेवटी जे आज माझे जाहले एवढे हासू नका शेकेल तुमचा ही कुला तू विडंबन पाडले आहेस भीषण "केशवा" खैर ना आता, पळाया ठेव दरवाजा खुला
लेखनविषय:

वाचने 2145
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

एक लंबर! तुम्हालाही हा खुला दरवाजा भुरळ पाडणार हे आम्हाला वाटलेच होते! ;) चतुरंग

दरवाजा खुला कसला, हे म्हणजे फ्लडगेट्स ओपन्ड असे झाले.

गुरुदेव, छान झालय. आंबोळी

हा हा.. शेवटचे दोन शेर तसेच दूरदेशीचा घोळ आवडला (शेकलेला) ऋषिकेश

पाडली आहे गझल, जी समजणे अवघड तुला ठेवली मुद्दाम आहे मी अलामत ही 'उ' ला पुढचे सर्व शेर वाचायची गरजच उरली नाही.. एवढा धमाल आहे हा शेर.:) सोनाली

प्रतिसाद देणार्‍या आणि प्रतिसाद न देणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार