Skip to main content

शशक'२०२२ - आई होताना

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 19/05/2022 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
समईची ज्योती नीट करत ,राजेशच्या फोटोसमोर दीपा शांत बसली होती.डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या .संसाराचे सुखाचे क्षण त्या भरल्या डोळ्यांतून तरारत होते.सगळ सगळं मागं पडलं होतं. साधा खोकला झाला तरी कासावीस होणारा राजेश करोनाच्या राक्षसापासून स्वतः ला नाही वाचवू शकला.त्या भयानक पहिल्या लाटेत राजेश आयसीयूत दाखल झाला.नंतर शेवटचं त्याला ती भेटूही शकली नाही. पदरात आठ वर्षांचा विराज..एकत्र कुटुंबात सगळं निभावून जाईल अशी आशा होती...पण तिच्या सासूबाईंनी वेगळाच निर्णय घेतला होता. "पप्पा आले" विराज दाराकडे धावला.दीपाने अलगद स्मित करत डोळे पुसले. दीपाच्या आयुष्याची दुसरी घडी त्यांनी घातली​ होती. लेकीला कुंकू लावून तिची ओटी भरली...सासू आता पुन्हा आई झाली होती.

वाचने 8564
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

छान +१

+१ लेकीला कुंकू लावून तिची ओटी भरली...सासू आता पुन्हा आई झाली होती. ह्रदय हेलावणारी कथा.

टिपीकल वपु पठडीतील आहे, पण तरी आवडली.

+१ आजुबाजुला​च अशी चार घर आहेत, आपल्या परीनं त्या पुढं चालल्या आहेत पण अशी आई मिळणं भाग्यच!

+१

छान कथा

+१

+१

सूनेचा पुनर्विवाह करुन देणारी सासू. काहीतरी नावीन्य आणा की...