शशक'२०२२ - रँगो

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
9 May 2022 - 1:10 pm

गरुडाच्या भीतीने बाटलीत लपलेल्या सरड्याची अवस्था भयंकर झाली जेव्हा गरुडाने बाटलीच उचलून आकाशात भरारी घेतली आणि उंचावरून खाली सोडून दिली.

आपला मृत्यू अटळ आहे याची त्याला खात्री पटली. घाबरून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले.

मृत्यूचे जवळून दर्शन त्याने यापूर्वीही घेतले होते जेव्हा काचेच्या “सुरक्षित” पिंजऱ्यातून सुटका होऊन तो मुक्त जगात दाखल झाला.

बाटली पडली पण फुटली नाही, कारण ती एका बेडकावर पडली.

बाटलीत शिरण्याची केविलवाणी धडपड करणाऱ्या बेडकाचा गरुडाने क्षणार्धात घास घेतला.

याच बेडकाने त्याला ऐनवेळी गरुडापासून सावध केले होते आणि तो बाटलीत लपला होता.

मृत्युंजय सरडा मोठ्या दिमाखात बाटलीतून बाहेर आला

आणि पुन्हा एकदा निघाला ......... एकटाच...... मृत्युच्या दिशेने.......

प्रतिक्रिया

श्वेता व्यास's picture

9 May 2022 - 2:47 pm | श्वेता व्यास

+१

ज्या सिनेमातला प्रसंग आहे त्याचे नाव कथेला दिले हे बरे केले :)

चौथा कोनाडा's picture

12 May 2022 - 5:41 pm | चौथा कोनाडा

+१

तर्कवादी's picture

12 May 2022 - 6:01 pm | तर्कवादी

युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी ?

काचेच्या “सुरक्षित” पिंजऱ्यातून सुटका होऊन तो मुक्त जगात दाखल झाला

युक्रेन रशियापासून मुक्त झाला तो संदर्भ आहे का ?
गरुड = अमेरिका ?
आणि रशिया म्हणजे बाटली का ?
पण मग बेडूक कोण ? अमेरिकेने कोणाचा घास घेतला ? ते ही असे राष्ट्र जे रशियाच्या गोटात सामील होणार होते ?

कॉमी's picture

12 May 2022 - 6:17 pm | कॉमी

https://youtu.be/wGYnGdmyub0

इथे बघा.

डाम्बिस बोका's picture

13 May 2022 - 6:31 pm | डाम्बिस बोका

बरी आहे

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 8:00 am | तुषार काळभोर

प्रसंगक्रम : गरूड सरड्याला खायला येतो, तेव्हा बेडूक सरड्याला बाटलीत लपायची आयडिया देतो.
मग गरुड ती बाटली आकाशातून सोडून देतो (सरड्याला खायला न जमल्यानं), ती नेमकी बेडकावर पडते.
जखमी बेडूक स्वतः बाटलीत शिरायचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात गरूड त्याला खाऊन टाकतो.
आपण वाचलो, असे वाटून सरडा बाटलीबाहेर येतो. पण कदाचित, गरुडाची पुढची शिकार तोच आहे. त्याची नियती बदललेली नाही.\
की काही सुचित गर्भितार्थ आहे?