Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 05/13/2022 - 17:30
मी माझ्या कन्येसाठी व वडिलांसाठी टॅबलेट घ्यायचा विचार करत आहे. बजेट साधारण पणे २० ते २५ हजारांमध्ये आहे. वापर युट्युब व ओटीटी स्ट्रीमिंग पाहणे ,माफक गेमिंग व वर्तमान पत्रे विशेषतः मराठी वाचणे ह्यासारख्या गोष्टींसाठी प्रामुख्याने केला जाईल. मिपांकरांच्या सल्ल्याच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
  • 6412 views

प्रतिक्रिया

Submitted by कर्नलतपस्वी on Fri, 05/13/2022 - 18:21

Permalink

सल्ला चकटफू

जास्त काही कळत नाही पण सॅमसंग वापरतो.नातीची शाळा व माझ्याकरता षुष्कळ आहे. ब्लू टुथ ने कीबोर्ड आणी माऊस जोडून मीनी लॅपटॉप होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 05/13/2022 - 18:54

In reply to सल्ला चकटफू by कर्नलतपस्वी

Permalink

सॅमसंगचा नक्की कुठला वापरता

सॅमसंगचा नक्की कुठला वापरता तुम्ही? स्पेसिफिकेशन्स काय आहेत.? नेट वर वाचलेल्या /पाहिलेल्या रिव्युज नुसार टॅबलेट कमीत कमी ४जीबी/६४ जीबी व बॅटरी ७००० एमेच इतका असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 05/13/2022 - 19:35

Permalink

मी लेनोवो जी 70

घेण्याच्या विचारात होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 05/13/2022 - 19:43

Permalink

लेनोवो नाही,Moto Tab G70 LTE

मोटो लेनोवोचाच आहे. https://www.motorola.in/moto-tab-g70/p
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 05/13/2022 - 20:21

In reply to लेनोवो नाही,Moto Tab G70 LTE by कंजूस

Permalink

मी ही हाच घ्यायचा विचार करतोय

मी ही हाच घ्यायचा विचार करतोय. पण ओवरप्राईस्ड वाटतोय म्हणुन थोडा गोंधळ होतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/13/2022 - 20:03

Permalink

आठदिवसापुर्वी.

सॅमसंग ए८ घेतला २० हजार रु फक्त. ३२ जीबी. मस्त आहे. सर्चींग, मिपा, युट्यूब, टीपी. मल्टीपल विंडो उघडल्यातरी हँग होत नाही. बॅट्री बॅकप चांगला आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Fri, 05/13/2022 - 20:50

In reply to आठदिवसापुर्वी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बिरूटे सरां सारखाच

+1
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 05/13/2022 - 20:56

Permalink

आयपॅड

आम्ही आयपॅड २ (२०११ चे मॉडेल) सात वर्षे वापरले त्यानंतर घेतलेले २०१८ सालचे आयपॅड व्यवस्थित चालू आहे. भारतात माझ्या वडिलांनी आयपॅड मिनी २ (२०१३ सालचे मॉडेल) पाच वर्षे वापरले अन आता २०१९ चे आयपॅड वापरत आहेत. या अनुभवाच्या आधारावर आयपॅड घ्यावे हे सुचवतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Fri, 05/13/2022 - 21:03

In reply to आयपॅड by श्रीरंग_जोशी

Permalink

+१००

आयपॅड बेस्ट! - (अ‍ॅप्पलचा लॉयल कस्टमर) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Fri, 05/13/2022 - 21:12

In reply to आयपॅड by श्रीरंग_जोशी

Permalink

आधारावर आयपॅड घ्यावे हे सुचवतो

तुमचे सफरचंदाचे प्रेम माहित आहे पण ते २०-२५००० च्या बजेटमधे येतात हे माहित नव्हते. असो :) मला घ्यायचा असता तर मी नोकिया टि२० घेतला असता. नोकियाप्रेम. दुसरे काही कारण नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 05/13/2022 - 22:27

In reply to आधारावर आयपॅड घ्यावे हे सुचवतो by धर्मराजमुटके

Permalink

:-)

सफरचंदापेक्षा माझे प्रेम करवंदावर अधिक होते, आहे आणि राहील ;-). टॅब्लेट प्रकारात आयपॅडला तोड नाही. अ‍ॅमेझॉनवर हे मॉडेल ₹२९,३९० दिसत आहे. अनेक वर्षे (बरेचदा ५+) ओएस अपडेट्स अन सातत्यपूर्ण कामगिरी बघता हे मूल्य मला तरी ठिक वाटते. तसेच कृष्णजुम्म्यासारखे दिवस अधून मधून येतात तेव्हा सूट मिळून अधिक स्वस्तात मिळू शकतंच.
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Sat, 05/14/2022 - 00:03

In reply to :-) by श्रीरंग_जोशी

Permalink

कृष्णजुम्म्या

कृष्णजुम्मा
पंत .. नमस्कार घ्यावा . . सर्वधर्म समभाव तो हाच :-)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 05/14/2022 - 00:49

In reply to कृष्णजुम्म्या by सुक्या

Permalink

धन्यवाद

मिपाकर रेवतीतै यांच्या मिश्रभाषिक रोचक शब्दनिर्मितीकौशल्यापासून प्रेरित होऊन मला हा शब्द सुचला आहे :-). गेली अनेक वर्षे कृष्णजुम्मा, अ‍ॅमेझॉन प्राइम डे अशा दिवशी उपलब्ध होणार्‍या ऑफर्स वर मी डोमकावळ्यासारखे लक्ष ठेवून असतो अन गरज असणार्‍या उपकरणांची खरेदी करतो. इतर वेळी पूर्ण किंंमत देवून उपकरणांची खरेदी जमेल तेवढी टाळतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Sat, 05/14/2022 - 00:07

In reply to आयपॅड by श्रीरंग_जोशी

Permalink

आयपॅड बेस्ट . .

आयपॅड बेस्ट . . मी अजुनही दुसर्‍या पिढिचा आयपॅड वापरतो आहे. वयामाना नुसार थोडा स्लो झाला आहे पण कामाला अजुनही ठिक आहे. बरेच अ‍ॅप चालत नाहीत पण ब्राउसिंग अजुनही उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 05/13/2022 - 20:59

Permalink

Samsung आणि Lenovo

१. सॅमसंग S६ लाईट याच्यासोबत पेनसुद्धा मिळतो. २. लेनोवो योगा अँड्रॉइड टॅब याला एक टेकू आहे, ज्याने हा एका कुशीवर उभा राहू शकतो. हे दोन उत्तम मॉडेल आहेत. मला वैयक्तिक Samsung ची अँड्रॉइड os आवडत नाही. माझं प्राधान्य मोटो, असुस आणि लेनोवो यांना असतं.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 05/14/2022 - 07:34

Permalink

बजेट महत्त्वाचे.

अन्यथा कितीतरी मॉडेल्स आहेत. १) साइज Tab चा खरा उपयोग पीडीएफ पुस्तकं वाचणे. नेटवर शोधलं त्यात लिहिले आहे की त्यासाठी साईज दहा इंची असावी. पीडीएफ चे रपांतर epub/mobi मध्ये केलं तर मोबाईलमध्येही वाचता येतात. पण मल्टीकॉलम अधिक चित्रे पीडीएफ रूपांतरीत होत नाहीत. म्हणजे Tab मोफखच हवा. २) स्क्रीन बराच वेळ पुस्तक वाचायचं तर डोळ्यांना त्रास न होणारा स्क्रीन हवा. ३) tab हा laptop सारखा वापरता येणे - याबद्दल समजलं की तशी सोय असणे चांगले असले तरी तसा काही उपयोग नाही. "Laptop is for creation, tab is for content viewing. Tablet cannot replace power of a laptop. " Tab मध्ये androidची सर्वच apps मोबाइलात फुल फोर्सनी चालतात तशी tab मध्ये चालतीलच असं नाही. काही apps tab साठी compromise केलेली असतात. (( नेट माहितीवर आधारित.))
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Sat, 05/14/2022 - 19:47

Permalink

टॅब प्रकार मलातरी फारसा आवडला नाही

ऑफिससाठी टॅब घ्यायच्या विचारात होतो. पण नंतर त्याची मर्यादा लक्षात आली (की बोर्ड /माउस सुटसुटीत नसणे, छोटा स्क्रीन) आणि विचार बारगळला. आता २०२० मध्ये कोविड मुळे घरात माणशी १ असे लॅपटॉप झाले आणि जरा पैसे वाचवण्यासाठी लहान मुलाच्या शाळेसाठी सॅम्संग ए८ टॅब घेतला (अंदाजे २०,०००/-) ऑनलाईन शाळा/क्लासेस, तुनळी बघणे, पेपर वाचन, माफक गेमिंग यासाठी चांगला आहे. पण लॅपटॉपच्या स्क्रीन्शी तुलना करु शकत नाही. डोळ्यांचा नंबर वाढणार सतत बघितल्यावर.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 05/14/2022 - 19:57

Permalink

Tab कसा दिसतो

हे पाहण्यासाठी vijay sales, reliance digital, digi 1, इथे गेलो तर ते मोटो'ची मॉडेल्स डिस्प्लेसाठी ठेवत नाहीत. लेनोवोवालेही फक्त बंद बॉक्स दाखवतात. त्यामुळे स्क्रीन कसा आहे बघता आले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Sat, 05/14/2022 - 20:39

Permalink

मोटो टॅब जी ७० फ्लिपकार्ट

मोटो टॅब जी ७० फ्लिपकार्ट ऑर्डर केला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 05/27/2022 - 09:52

Permalink

आला का?

कसा वाटला?
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 05/27/2022 - 18:39

In reply to आला का? by कंजूस

Permalink

आला. चांगला वाटतोय.

आला. चांगला वाटतोय. वडिल वापरतात. त्यांच्या सिरियल्स वगैरे पाहत असतात. गेमिंग साठी अजुन एक्प्लोअर केला नाहीये. थोडा महागडा वाटला. पण ठिक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 05/27/2022 - 10:20

Permalink

मला काही मराथीत लिहीणे

मला काही मराथीत लिहीणे आणि प्रेझेन्टेशन्स करणे आणि वाचणे इतकी कामे आहेत. लॅपटॉप बरा की टॅब?
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 05/27/2022 - 18:51

Permalink

मी उज्जैनला असतो आणि माझे

मी उज्जैनला असतो आणि माझे वडिल सध्या माझ्याकडे आले आहेत.उज्जैन च्या उन्हामुळे घरातच बसावे लागते आणि सध्याच्या न्युक्लिअर कुटुंबाच्या कल्चर अनुसार टीवी तर आमच्यापैकी कोणीच पाहत नाही. सगळ्या गोष्टी एकतर लॅपटॉप अथवा मोबाईल मुळे उपलब्ध होत असल्याने टीवीची गरजच नाही. सध्या कुठल्याश्या मराठी चॅनेलवर चालणार्या ज्ञानेश्वर माऊली,नवनाथ,ताराबाई सिरियल्स हा वडिलांसाठी विरंगुळा होता आणि तोच न राहिल्यामुळे वडिलांना जाम कंटाळा येत होता आणि दोन आठवड्यातच जातो रे बाबा इथुन म्हणु लागले.त्यामुळे टॅब घ्यायचा विचार केला व त्यामध्ये फार चोखंदळ न राहता जो साधारण योग्य वाटेल तो मागवला नाहीतर त्यातच जास्त वेळ जायचा आणि वडिलांचे मत अजुन पक्के व्हायचे. ऑर्डर दिल्यापासुन दोन तीन दिवसांतच टॅब आला आणि वडिलांना लागणार्या चॅनेलचे सबस्क्रिप्शन घेतलेय. वडिलांनी ह्या सिरियल्सच सगळा बॅकलॉग भरुन काढला आणि त्यांचाही एकुण टाईमपास मस्त होतोय. एकुण टीवी सारखे एका ठिकाणी न बसुन राहता कुठेही पाहता येते व केव्हाही पाहता येतेय ह्यामुळे वडिल खुश आहेत.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com