Skip to main content

श श क २०२२ - नवा काळ..

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 12/05/2022 या दिवशी प्रकाशित केले.
शंकरराव एक सुखी गृहस्थ, त्यांची पन्नाशी जवळ आली होती. बायको, दोन मुली नी एक मुलगा असा सुखी संसार. दोन्ही मुलींच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती. नवा काळ, त्यामुळे मुलींनाच विचारावं “कुणी मनात आहे का?, कुणी आवडलंय का?” असं त्यांनी ठरवलं, दोन्ही मुलींना त्यांनी बोलावलं. मोठी मुलगी:~ “पप्पा, मी लेस्बियन आहे, मला मूलं आवडत नाहीत मूली आवडतात, मी मुलीशीच लग्न करनार” शंकररावांना धक्का बसला त्यांनी लहान मूलीकडे पाहीलं, “पप्पा, मी देखील लेस्बियन आहे, मलाही मूली आवडतात.” शंकरराव कोसळलेच. संताप, तडफड, अनेक भावना एकाच वेळी ऊचंबळून आल्या. “ह्या घरात मूलगा कुणालाच आवडत नाही का?” ते संतापात ओरडले. “पप्पा, मला आवडतात”… :चिरंजीव ऊद्गारले.

वाचने 14578
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

लैच भयानक प्लॉट ट्विस्ट झाला की हो हा लॉल

अरे देवा. लै भारी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे देवा. लै भारी.
कॉमेंट आवडली. ही दोन वाक्ये एक स्वतंत्र कथा म्हणूनही घेता येईल

शीर्षकात "शशक २०२२"असे शब्द वगळले गेले आहे. तसेच कथा "स्पर्धा" विभागात प्रसिद्ध न होता "जनातलं, मनातलं" मध्ये प्रसिद्ध झालीये.

असू दे शंकरराव, तसा बॅलन्स बरोबर आहे फक्त एक सून जास्त येणार ;)

In reply to by कॉमी

स्पर्धेतली अथवा बाहेरची आसो पण आवडली. काॅमी भाई गोळाबेरीज मस्त. कथा मस्त प्रतीसाद चुस्त.

In reply to by कॉमी

स्पर्धेतली अथवा बाहेरची आसो पण आवडली. काॅमी भाई गोळाबेरीज मस्त. कथा मस्त प्रतीसाद चुस्त.

नवा काळ पढके दैनिक समझा क्या ? दैनिक नही बोल्ड स्टोरी हु मै :)

लोल !

खतरनाक

ह्यांच्या घरी कोनत्या गिरणीतून पीठ येत असंल?

+१

+ १. आवडली. एका मित्राच्या मुलाने जातीबाहेर लग्न केले. मित्र म्हणाला मुलीशीच केले हे नशीब.

+१

+१

+1

मला वाटलं मुलगा म्हणेल - 'मी पण लेस्बियन आहे. मलाही मुलीच आवडतात.'

माफ करा पण जोक म्हणून हा संवाद साधारण १० वर्षांपासून वेगवेगळ्या इंग्रजी साईट्सवर अनेकदा वाचलेला आहे. अजूनही अनेक फेबुग्रुप्सवर असेल. कोणीही आधी वाचलेला नाही याचे आश्चर्य वाटले. -१

In reply to by अनिंद्य

मी वर दिलेला समांतर शेवट हा पण असाच एक जोक म्हणून वाचला होता. पूर्वी ह्याबद्दलची फारशी माहिती नसताना हसू येत असे, पण आता नाही.

+१

मतदान